Home » Diwali : ‘या’ सोप्या टिप्स वापरून दिवाळीची स्वच्छता करून लक्ष्मीला करा प्रसन्न

Diwali : ‘या’ सोप्या टिप्स वापरून दिवाळीची स्वच्छता करून लक्ष्मीला करा प्रसन्न

by Jyotsna Kulkarni
0 comment
Diwali
Share

दिवाळी अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपली आहे. दिवाळी म्हटले की सर्वात आधी सुरु होते ती दिवाळीची साफसफाई. दिवाळीमध्ये फराळासोबतच आवश्यक असते ती घराची स्वच्छता. ज्या घरात साफसफाई आणि स्वच्छता असते तेथे लक्ष्मीचा वास असतो. असे आपल्याकडे नेहमीच म्हटले जाते. त्यामुळे दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाच्या आधी घर एकदम चकाचक करणे आवश्यक आहे. या शुभ सणासाठी प्रत्येकाला त्यांचे घर नव्यासारखे चमकवायचे असते. (Diwali)

मात्र आता ऑफिस सांभाळून घराची साफसफाई करणे तसे अवघड असते. यासाठी आपण आपले हे कमी कमी वेळात कसे पूर्ण करता येईल याकडे लक्ष देत असतो. आज आम्ही तुम्हाला घराच्या साफसफाईसाठी काही सोप्या मात्र अतिशय उपयुक्त अशा काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्स वापरून तुम्ही नक्कीच तुमचे हे काम कमी वेळात प्रभावी पद्धतीने पूर्ण करू शकता. (Marathi News)

नियोजनासह दिवाळीची साफसफाई करणे अतिशय चांगले असते. जर तुम्ही योग्य नियोजन करून काम केले तर नक्कीच तुमचे काम सोपे होईल. यासाठी तुम्ही रोज घराची एक खोली स्वच्छ करण्याचे टार्गेट ठेवा. जेणेकरून संपूर्ण घर आठवडाभरात स्वच्छ करता येईल. सर्व सामान एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी आणि खोली स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल.

काही लोकांना घरात अनावश्यक वस्तू ठेवण्याची सवय असते. यामुळे दिवाळीत साफसफाईच्या वेळी काम अधिक वाढते. जितके जास्त सामान असेल तितका जास्त वेळ स्वच्छ करायला लागेल. त्यामुळे रद्दी वस्तू काढून मगच साफसफाई करावी. जेणेकरून तुम्हाला कमी गोष्टी स्वच्छ कराव्या लागतील. आपण वापरत नसलेल्या गोष्टी घरात साठवण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे घरही भरलेले दिसते. तुटलेली क्रोकरी, भांडी, जीर्ण झालेले शूज, चप्पल इत्यादी फेकून द्या. एखाद्या गरजूला जुने कपडे द्या. (Todays Marathi Headline)

Diwali

जर तुमच्याकडे बरेच लोक असतील आणि साफसफाईसाठी भरपूर वेळ असेल तर तुम्ही सर्वकाही स्वच्छ करू शकता. घरातील वस्तू स्वच्छ करण्यासाठी फक्त सुती कपडे वापरा. तसेच बेकिंग पावडर, अर्धी बादली सर्फ वॉटर, व्हाईट व्हिनेगर, ब्रश, स्पंज ठेवा, कारण साफसफाई करताना या गोष्टी आवश्यक असतात.

=======

Diwali 2025 : दिवाळीत गोडधोड खाताना साखरेचे प्रमाण कसे नियंत्रणात ठेवावे? वाचा टिप्स

=======

काही घरांमध्ये वर्षभर घरातील इलेक्ट्रिक स्विच बोर्ड स्वच्छ केले जात नाहीत. त्यामुळे ते काळे पडतात. स्वीच बोर्ड साफ करताना मुख्य वीज बंद करा असे न केल्यास पाण्यामुळे विजेचा शॉक लागू शकतो. स्विच बोर्ड देखील स्वच्छ करण्यासाठी डिटर्जंट पाण्याचा वापर करा. त्यात एक कापड भिजवा, पाणी पिळून घ्या आणि स्वीच बोर्ड स्वच्छ करा. (Latest Marathi News)

स्टीलच्या पृष्ठभागावरील घाण काढण्यासाठी बेकिंग सोड्यामध्ये काही लिंबाचे थेंब मिसळा आणि त्याने स्क्रब करा. रसायन न वापरल्याने निसरगाचेही नुकसान टळेल आणि तुमच्या हातालाही त्रास होणार नाही. पेपर टिश्यू किंवा नॅपकिन्स वापरण्याऐवजी कापडाचे डस्टर वापरा. हे दीर्घ काळ टिकेल आणि तुम्हाला वारंवार कागदाचे टिश्यू खरेदी कारवाई लागणार नाहीत. रासायनिक आणि प्लास्टिकने भरलेले सिंथेटिक स्क्रब वापरण्याऐवजी नारळाच्या सालीपासून बनवले गेलेले कॉयर स्क्रब वापरा. हे पर्यावरणास आणि तुमच्या हातांसाठीही अनुकूल आहे.

ओव्हन जास्त ऑयली झाले असल्यास मिठाच्या पाण्याने पुसून घ्यावे. मिठाचे पाणी टाकून कपड्याने पुसून घ्यावे. काचेचे ग्लास स्वच्छ करण्यासाठी मिठाच्या पाण्यात १० मिनिट ग्लास बुडवून ठेवा. त्यानंतर लिंबू आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. ग्लास चमकू लागतील. प्रेस करण्याच्या आयरनला गंज लागला असल्यास मिठाने स्वच्छ करून घ्या. गंज निघून जाईल. (Marathi Top News)

दिवाळीची साफसफाई करण्यासाठी सिलिंग फॅन, खिडक्या आणि दरवाजे स्वच्छ करा. तसेच भिंतीवर कानाकोपऱ्यातील जाळ्या, धूळ स्वच्छ करा. साफसफाई करताना फरशीवर धूळ पडते. तेव्हा घराची सर्व साफसफाई पूर्ण झाल्यावर सर्वात शेवटी फरशी पुसून घ्या.

गॅस शेगडी स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला बेकिंग सोडा आणि व्हिनेगर आवश्यक आहे. सर्वांत प्रथम बेकिंग सोड्यामध्ये व्हिनेगर मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट गॅस शेगडीला लावा. त्यानंतर थोड्या वेळानं स्क्रबरच्या मदतीने ही पेस्ट स्वच्छ करा. हे करत असताना हलक्या हातांनी गॅस शेगडी घासावी. त्यानंतर ओल्या कापडाने शेगडी स्वच्छ करा. तुमची गॅसशेगडी पूर्वीपेक्षा खूपच स्वच्छ होईल.

Diwali

लोखंडी तवा, कढईला अनेकदा गंज लागतो. मात्र, तुम्ही ती स्वच्छ करण्यासाठी क्लिनिंग हॅकचा अवलंब करू शकता. यासाठी प्रथम तवा किंवा कढई व्यवस्थित स्वच्छ करा, आणि नंतर कापडाने कोरडी पुसून टाका. आता त्यात तेल टाका आणि कापडाच्या साहाय्याने ते तवा, कढईला चोहोबाजुने लावा. त्यामुळे तुम्ही संबंधित लोखंडाचं भांडं गंजणार नाही. (Marathi Trending Headline)

दार आणि खिडक्यांचे ग्रील साफ करण्यासाठी सर्वात आधी झाडूने वरची धूळ काढून घ्या. यानंतर १ बादली कोमट पाणी घेऊन त्यात डिशवॉशिंग लिक्विड, व्हिनेगर, टाका. यानंतर या पाण्याने खिडक्या, दार आणि ग्रील पुसून घ्या. पुन्हा शेवटी कोरड्या कापडाने सर्व स्वच्छ करून घ्या. यामुळे धूळ आणि चिकटपणा नाहीसा होईल.

========

Temple : वर्षातून केवळ दिवाळीतच उघडले जाणारे रहस्यमयी मंदिर

========

स्वयंपाकघरातील भिंती, टाईल्स अनेकदा चिकट झालेल्या असतात. नुसते पुसल्याने हा चिकटपणा जात नाही. अशा वेळी काही घरगुती साहित्य वापरून तुम्ही झटकन ते स्वच्छ करू शकता. यासाठी बेकिंग सोडा, व्हिनेगर, लिंबाचा रस आणि थोडे पाणी हे सर्व काही मिक्स करा. हे पाणी एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये काढून घ्या. हे पाणी भिंत, टाईल्सवर स्प्रे करून ५ ते १० मिनिटे तसेच राहूद्या. नंतर स्वच्छ पुसून घ्या. यासाठी तुम्ही जुना टूथब्रश किंवा स्क्रबर देखील वापरू शकता. (Top Marathi Stories)

जर तुमच्या घरात लाकडी फर्निचर, टेबल किंवा स्लॅब असतील तर ते चमकदार करण्याचा एक सोपा मार्ग आहे. यासाठी तुम्हाला सुती कापडाच्या मदतीने लाकडी वस्तूंवर थोडे ऑलिव्ह ऑईल लावावे लागेल. त्यानंतर ५ मिनिटांनी स्वच्छ कापडाने पुरून टाका. यामुळे मुळ चमक परत येईल.

टॉयलेट साफ करण्यासाठी बेकिंग सोडा खूप फायदेशीर मानला जातो. टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी, एका कंटेनरमध्ये बेकिंग सोडा, व्हाईट व्हिनेगर, आवश्यक तेलाचे काही थेंब आणि थोडे पाणी मिसळा. नंतर हे द्रावण टॉयलेटमध्ये घाला आणि ३० मिनिटे तसेच ठेवा. यानंतर ब्रशच्या मदतीने घासून पाण्याने स्वच्छ करा.

सगळ्यात शेवटी तुम्ही बेडरूम आणि लिव्हिंग रूम स्वच्छ करा. खोलीतील पडदे, बेडशीट तसेच सोफा कव्हर बदला. खोलीत ठेवलेल्या सजावटीच्या वस्तू नीट स्वच्छ करा. (Latest Marathi Headline)

चांदी आणि पितळेच्या भांड्यांना चमक परत मिळवण्यासाठी, त्यांना पीठ किंवा मुलतानी मातीने घासून घ्या. हा एक जुना उपाय आहे जो साचलेली घाण काढून टाकतो आणि त्यांना चमकदार बनवतो. कारण यापासून आपल्या दिवाळीची खरी सुरुवात होते.

कोपऱ्यात आणि कपाटात कापूरचे काही तुकडे ठेवा. कापूर केवळ ओलावा आणि कीटकांना दूर ठेवत नाही तर त्याचा तीव्र आणि शुद्ध सुगंध संपूर्ण घरात पसरतो. हे घरात सकारात्मक ऊर्जा भरते आणि एक आल्हाददायक वातावरण निर्माण करते.

Diwali

वाळलेल्या कडुलिंबाची पाने कापडात बांधा किंवा थेट कपाटात आणि स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात ठेवा. कडुलिंब हे एक शक्तिशाली नैसर्गिक कीटकनाशक आहे. त्याचा तीव्र वास झुरळे आणि मुंग्यांसारख्या कीटकांना दूर ठेवतो. हा उपाय तुमच्या घराचे वातावरण रासायनिक फवारण्याशिवाय स्वच्छ आणि सुरक्षित ठेवतो. (Top Marathi News)

लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा मिसळून जाड पेस्ट बनवा. स्वयंपाकघरातील सिंक, बाथरूमच्या टाइल्स आणि नळांवरून डाग काढण्यासाठी या पेस्टचा वापर करा. लिंबातील आम्ल आणि बेकिंग सोडाचे स्वरूप अगदी हट्टी डाग देखील सहजपणे काढून टाकते.

घरातल्या तुटक्या वस्तू नकारात्मक उर्जा साठवतात. जुनं घड्याळ, फुटलेली मूर्ती किंवा तुटलेली भांडी ‘या’ वस्तू लक्ष्मीचा प्रवाह थांबवतात. यामुळे घरात तुटलेल्या वस्तू ठेऊ नका, स्वच्छ वस्तूच ठेवा. कपाटं आणि स्टोअररूममध्ये सर्वाधिक स्थिर ऊर्जा साठते. जुने कपडे, अनावश्यक फाईल्स, वापरात नसलेल्या वस्तू दूर करा. प्रत्येक कपाटात थोडं कापूर ठेवा. हे केल्याने वातावरण शुद्ध होतं. (Latest Marathi Headline)

=======

Organizing Tips For Home : कपाट, किचन आणि घर व्यवस्थित ठेवण्याच्या ५ ट्रिक्स 

=======

पूजाघर म्हणजे घराचं आध्यात्मिक केंद्र. ते स्वच्छ, सुवासिक आणि दिव्य ठेवा. जुन्या अगरबत्त्या, वापरलेली फुलं किंवा धूळ साठणार नाही याची काळजी घ्या. रोज सकाळी घरामध्ये बेलपत्र किंवा तुळशीच्या पानाने थोडं गोमूत्र शिंपडा. सुगंधी मेणबत्त्या, दिवा आणि नैसर्गिक अगरबत्त्या वातावरणात शांती आणि आनंद निर्माण करतात. दररोज संध्याकाळी एका कोपऱ्यात तुपाचा दिवा लावल्याने घरातील ऊर्जा वाढते. (Top Trending News)

घरात तुटलेला आरसा ठेऊ नका कारण खिडक्या आणि आरसे हे घरात प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा परावर्तित करतात. धूळ, डाग आणि घाण यामुळे प्रकाश अडतो. लिंबू आणि पाण्याने पुसल्यास आरसे नैसर्गिकरीत्या चमकतात. तुळस, मनी प्लांट, किंवा बांबू सारख्या झाडांमुळे घरात ताज ऑक्सिजन आणि सकारात्मक भावना येतात. पूर्व किंवा उत्तर दिशेला झाडं ठेवा हे दिशात्मक ऊर्जेसाठी शुभ मानलं जातं. (Social News)

(टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.