अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प जेव्हा रिंगणात उतरले तेव्हापासून अमेरिका फर्स्ट हे घोषवाक्य त्यांनी उच्चारायला सुरुवात केली. यातूनच USAID या शब्दाचा वापर जास्त होऊ लागला. आपण राष्ट्राध्यक्ष झाल्यावर प्रथम हे USAID बंद करणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली. या घोषणेच्या आधारानं त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यावर प्रथम या USAID बंदीच्या मागे ट्रम्प लागले आहेत. USAID म्हणजे युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असून या विभागातून अमेरिका जगभरातील अनेक सामाजिक संस्थांना निधी देते. मात्र यातून पैशाचा गैरवापर होत असल्याचा ट्रम्प यांचा आक्षेप आहे. या USAID ने गाझामध्ये कंडोमसाठी 50 दशलक्ष डॉलर्स पाठवल्याचे स्पष्ट झाल्यावर ट्रम्प यांनी अमेरिकन करदात्यांच्या पैशाचा हा गैरवापर थांबवण्यासाठी पावले उचलायला सुरुवात केली आहे. (Donald Trump)
USAID ची स्थापना ही चांगला हेतू ठेऊन करण्यात आली होती. त्यातून जगभरातील अनेक सामाजिक संस्थांना एकत्र आणले गेले. मात्र कालांतरानं या विभागावर जॉर्ज सोरोस सारख्या व्यक्तींचा प्रभाव आला आणि त्यातून USAID मधील पैशाचा गैरवापर सुरु झाला. ट्रम्प यांनी USAID चा उल्लेख “कट्टरपंथी वेड्यां” द्वारे चालवली जाणारी संस्था असे वर्णन करत या एजन्सीतून मंजूरी मिळालेल्या सर्वच आंतरराष्ट्रीय खर्चांना 90 दिवसासाठी गोठवले. शिवाय USAID मधील 10 हजार कर्मचा-यांनाही कामावरुन सुट्टी दिली आहे. आता भारतासह 130 देशांमध्ये काम करणा-या या USAID मध्ये फक्त 290 कर्मचारी असून त्यांच्या प्रत्येक निर्णयाला प्रथम ट्रम्प यांची मान्यता लागणार आहे. ट्रम्प यांच्या जवळचे सहकारी एलॉन मस्क हे या एजन्सीच्या कामकाजावर लक्ष ठेवणार आहेत. (International News)
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष होताच USAID या एजन्सीचा सर्वाधिक उल्लेख होऊ लागला आहे. ही USAID आपल्या भारतीयांसाठी अधिक परिचयाची आहे. कारण भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या लष्कर-ए-तैयबाशी संबंधित फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशनलाही याच USAID च्या माध्यमातून निधीचा पुरवठा करण्यात आल्याचा आरोप आहे. याच संघटनेनं 2008 साली मुंबईवर दहशतवादी हल्ला केला होता. USAID मार्फत अशा पद्धतीनं अनेक बेकायदेशीर कामांना निधीचा पुरवठा होत असल्याचे आता उघडकीस येत आहे. या एजन्सीमध्ये अमेरिकन करदात्यांचा पैसा गोळा होतो. हा पैसा जॉर्जिया, युगांडा, अल्बेनिया, सर्बिया सारख्या देशांमध्ये पाठवला जातो. आता या USAID ची पुर्नरचना करण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी एलॉन मस्क यांच्यावर आहे, त्यामुळे USAID च्या माध्यमातून जगभरातील दहशतवाद्यांना निधी देणा-या जॉन सोरोस सारख्यांचे धावे दणाणले आहे. (Donald Trump)
USAID मधून सुरुवातीला एलॉन मस्क यांनी आत्तापर्यंत झालेल्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करायला सुरुवात केली. तेव्हा यूएसएआयडीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी मस्क यांना हा डेटा देण्यास नकार दिला होता. मात्र मस्क यांनी यूएसएआयडीच्या दोन वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केल्यामुळे आता यूएसएआयडीच्या अन्य कर्मचा-यांमध्ये खळबळ उडाली आहे. जवळपास 10 हजार कर्मचा-यांना नोकरी सोडायचे आदेश काढण्यात आले. त्यावरुन ट्रम्प हे यूएसएआयडी मधील आर्थिक घोटाळ्यांचा तपास कशापद्धतीनं करणार आहेत, हे स्पष्ट झालं आहे. यूएसएआयडीच्या कारभारावर आत्तापर्यंत अनेकवेळा आरोप झाले आहेत. (International News)
=============
हे देखील वाचा : Donald Trump : ट्रम्पना कुठे करायची आहे, रिसॉर्ट सिटी
Interstellar : आपण ‘ब्लॅक होल’मध्ये जिवंत राहू शकतो का ?
=============
युक्रेनमध्ये यूएसएआयडीकडून $1 दशलक्ष पेक्षा जास्त निधी गेल्याचा आरोप आहे. शिवाय ऑगस्ट 2024 मध्ये, बांगलादेशी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध USAID आणि सोरोस गटांनी बंड घडवून आणण्यासाठी निधी दिल्याचा आरोप आहे. हंगेरीमधील सरकार पाडण्यासाठीही याच यूएसएआयडीच्या माध्यमातून 7.6 दशलक्ष डॉलर्स दिल्याचा आरोप आहे. फारकाय यूएसएआयडी मधूनच ट्रम्प विरोधी खटल्यांवर 27 दशलक्ष डॉलर्स खर्च केल्याचा आरोप आहे. त्यामुळे या यूएसएआयडीच्या विरोधात ट्रम्प काय भूमिका घेतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे. अनेक देशात पैशांचा व्यवहार करुन राजकीय घडामोडी करणा-या यूएसएआयडीची स्थापना खरंतर चांगल्या हेतूनं झाली होती. जॉन केनेडी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतांना 1961 मध्ये यूएसएआयडीची स्थापना झाली. 1998 मध्ये यूएसएआयडीला एजन्सीचा दर्जा मिळाला. आता या यूएसएआयडीला परराष्ट्र खात्यात विलीन करण्याचा निर्णय ट्रम्प घेऊ शकतात. (Donald Trump)
सई बने