Home » मृत नवऱ्याच्या दु:खात लिहिले पुस्तक… पण आता हत्येच्या आरोपातच पत्नीला अटक

मृत नवऱ्याच्या दु:खात लिहिले पुस्तक… पण आता हत्येच्या आरोपातच पत्नीला अटक

by Team Gajawaja
0 comment
US
Share

US: सिनेमांमध्ये किंवा एखाद्या पुस्तकार थ्रीलर स्टोरी ऐकतो किंवा वाचतो. पण खऱ्या आयुष्यात ही काही थ्रीलर अनुभव येतात. असेच काहीसे अमेरिकेत एक हैराण करणारे प्रकरण समोर आले आहे. येथील एका पत्नीने कथित रुपात आपल्या नवऱ्याला विष देऊन ठार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. नवऱ्याच्या मृत्यूनंतर महिलेने मुलांनी आपल्या प्रियजनांचा मृत्यू झाल्यानंतर स्वत: ला कसे सावरावे यावर एक पुस्तक लिहिले आहे. आर यू विथ मी? नावाचे तिचे हे पुस्तक आहे.

KUTV च्या एका रिपोर्ट्सनुसार समिट काउंटी मध्ये राहणारी ३३ वर्षी कॉरी डार्डर रिचिंस हिने आपल्याच घरी नवऱ्याला विष देऊन ठार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. कॉरी ही तीन मुलांची आई असून तिच्यावर फर्स्ट डिग्री हत्येच्या आरोप लावण्यात आला आहे. त्याचसोबत महिलेवर एखाद्याला कंट्रोल करणाऱ्यासाठी वापरले जाणारे पदार्थ ठेवण्यात आल्याचा ही आरोप लावला गेलाय.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एरिक याचा मृत्यू ४ मार्च २०२२ रोजी झाला होता. पत्नीची तक्रार मिळाल्यानंतर जेव्हा पोलीस त्यांच्या घरी मध्यरात्री आले होते तेव्हा तो बेडवरुन खाली पडलेला दिसला. त्यानंतर एरिकची त्यावेळीची स्थिती पाहून त्याला काही औषधं दिली गेली पण त्यााच मृत्यू झाला. बीबीसीच्या एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, ४ मार्चच्या रात्री पत्नी रिचिंसने मध्यरात्री पोलिसांना फोन केला होता. तेव्हा तिने असे म्हटले होते की, तिच्या नवऱ्याचे शरिर पूर्णपणे थंड पडले आहे. पत्नीने पोलीस अधिकाऱ्यांना हे सुद्धा सांगितले होते की, तो दारु प्यायला होता.

नंतर जेव्हा शवविच्छेदन रिपोर्ट आले तेव्हा कळले की, त्याचा मृत्यू फेंटानिल ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे झाला आहे. चौकशीत पत्नीने असे सांगितले की, नवऱ्याची प्रकृती बिघडण्यापूर्वी तो दारु पित होता. पण शवविच्छेदन रिपोर्टमध्ये तर व्यक्तीच्या पोटात पाच पट अधिक लेथल डोज मिळाले होते. (US)

हेही वाचा- आपल्या भावाचे शिर कापल्यानंतर खुप रडला होता औरंगजेब

कोर्टाच्या कागदपत्रांनुसार डिसेंबर २०२१ आणि फेब्रुवारी २०२२ दरम्यान रिचिंसने एका व्यक्तीला मेसेज केला होता. ज्यााल ड्रग्ज ठेवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. रिचिंसने त्याचसोबत काही अन्य औषधं सुद्धा मागवली होती. तर पुस्तकाबद्दल महिलेने एक मुलाखत दिली होती. त्यात तिच्या या पुस्तकात तिच्या परिवाराच्या दु:खद घटनेपासून थोडा आराम मिळेल असे म्हटले होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.