अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेन्स सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. जेडी वेन्स हे चार दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यादरम्यान जेडी वेंस यांच्यासोबत त्यांच्या पत्नी उषा वेंस आणि त्यांची तीन मुले, इवान, विवेक, मीराबेल देखील भारतामध्ये आले आहेत. या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी जेडी वेन्स यांनी दिल्लीच्या जगप्रसिद्ध अशा अक्षरधाम मंदिराला भेट दिली. (Akshardham Temple)
जेडी वेन्स (J. D. Vence) कुटुंबासह अक्षरधाम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या मुलांनी भारतीय वेष परिधान केला होता. जेडी वेन्स यांची पत्नी उषा या भारतीय वंशाच्या आहेत. जेडी वेन्स यांनी अक्षरधाम मंदिराला भेट दिल्यानंतर हे मंदिर पुन्हा एकदा खूपच चर्चेत आले आहे. चला तर मग जाणून घेऊया याच मंदिराबद्दल काही रंजक माहिती. (Marathi)
नवी दिल्लामधील स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर हे हिंदू लोकांचे मंदिर आहे. हे मंदिर ६ नोव्हेंबर २००५ रोजी स्वामी महाराज, तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, मनमोहन सिंग, लालकृष्ण अडवाणी आणि बीएल जोशी यांच्या उपस्थितीत या मंदिराचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांनी अर्थात ८ नोव्हेंबर २००५ रोजी सामान्य जनतेसाठी हे मंदिर अधिकृतपणे उघडले गेले.(Marathi Latest News)
=========
हे देखील वाचा : Historical Buildings : भारतातील महिला शासकांनी बांधलेल्या ऐतिहासिक वास्तू
=========
अक्षरधाम हे जगातील सर्वात मोठे मंदिर असून, या मंदिराचा परिसर तब्बल १०० एकरचा आहे. भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये यमुनेच्या काठी हे मंदिर स्थित आहे. अद्वितीय स्थापत्य कला, प्राचीनतेसोबतच आधुकनिकतेचा उत्तम संगम, मंदिराची भव्यता यासाठी हे मंदिर जगप्रसिद्ध आहे. दिल्लीतील हे अक्षरधाम मंदिर कायमच सर्व दिल्लीकरांसोबतच बाहेरील पर्यटकांचे देखील एक प्रमुख आकर्षणाचे ठिकाण आहे. (Top Stories)
दिल्लीला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्येही हे अक्षरधाम मंदिर खूपच प्रसिद्ध आहे. हे मंदिर दिल्लीचे मोठे वैशिष्ट्य आणि दिल्लीतील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. पूर्व दिल्लीतील अक्षरधाम मंदिर हे देशातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराचे मुख्य आणि मोठे वैशिष्ट्य म्हणजे अक्षरधाम मंदिराचे नेत्रदीपक असे सौंदर्य आणि भव्यता. हे मंदिर पाहणाऱ्या सर्वांनाच याची भव्यता पाहून आश्चर्य वाटते. अक्षरधाम मंदिराची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील करण्यात आली आहे. (MArathi Top News)
अक्षरधाम मंदिर हे १४१ फूट उंच, ३१६ फूट रुंद आणि ३५६ फूट लांब आहे. या मंदीरात फुले, प्राणी, पक्षी, नर्तक, संगीतकार आदींचे अतिशय सुंदर आणि रेखीव असे कोरिव काम केलेले आहे. मंदिरात २३४ सुशोभित खांब, ९ घुमट आणि तब्बल वीस हजार संत, अनुयायी आणि आचार्यांचे पुतळे आहेत. मंदिराच्या पायथ्याशी एक गजेंद्र पीठ आणि हत्तीला श्रद्धांजली वाहणारा एक स्तंभ देखील आहे. मंदिरात अनेक सुशोभित द्वार बनवण्यात आले आहेत. या ठिकाणी मयूर द्वार, भक्ति द्वार, दश द्वार नावाचे द्वार आहेत. मयुर दारावर भव्य तोरण आणि खाबांवरती जवळपास 869 मोर नृत्य करताना दिसतात. (MArathi Trending News)
हिंदू साहित्य आणि संस्कृतीत याला खूप महत्त्व दिले जाते. यामध्ये १४८ मोठे हत्ती बनवण्यात आले आहेत ज्यांचे वजन अंदाजे तीन हजार टन असल्याचे सांगितले जाते. या अक्षरधाम मंदिराच्या मध्यवर्ती घुमटाखाली भगवान स्वामिनारायण यांची पद्मासनस्थ, भव्य ११ फूट उंच आकर्षक मूर्ती प्रतिष्ठित आहे. ती पंचधातूंची घडवलेली असून सुवर्णमंडित आहे. या मंदिराच्या निर्मितीसाठी सुमारे ११,००० कारागिरांनी दिवस रात्र काम करत त्यांचे १ कोटी २० लाख तास श्रम केले आहेत. (Swaminarayan Akshardham Temple)
या मंदिराच्या निर्मितीसाठी ११ हजार शिल्पकारांची फौज तयार करण्यात आली होती. या शिल्पकारांना मंदिर पूर्ण करायला ५ वर्षे लागली. सर्वाधिक महत्वाची आणि आश्चर्यचकित करणारी महत्त्वाची बाब म्हणजे या मंदिराच्या निर्मितीत आणि बांधकामामध्ये कोठेही सिमेंट आणि स्टीलचा वापर करण्यात आलेला नाही. पूर्ण बांधकाम केसरी पाषाणांना जोडून तयार केले आहे. (Social News)
या मंदिराच्या चारीही बाजूला नारायण सरोवर आहे. यात १५१ सरोवरांचे पाणी असून १०८ गोमुखे आहेत. ही गोमुखे म्हणजे १०८ हिंदू देवताचे प्रतिक मानले जाते. कमळाच्या आकाराचा प्रचंड बगीचा तयार केला गेला आहे. दोन मजली मंदिरात चारीबाजूनी प्रदक्षिणा मार्ग असून ३ हजार फुटाच्या या मार्गावर १२०० खांब आणि १५५ शिखरे आहेत. (Social Update)
=========
हे देखील वाचा : Mobile : मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय करावे?
=========
या अक्षरधाम मंदिरात जगातील सर्वात मोठे कमळाच्या आकारातील यज्ञकुंड आहे. सायंकाळी मंदिरात म्युझिकल फाउंटन शो देखील होतो. दिल्लीला येणा-या पर्यटकांपैकी ७० टक्के पर्यटक अक्षरधाम मंदिराला भेट देतात. १०० एकर एवढ्या विस्तीर्ण भूभागावर वसलेल्या या मंदिराची तुलना अन्य वास्तुशी करता येणार नाही, असे हे एकमेवाद्वितीय मंदिर आहे. जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर असल्याने, स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराचे नाव बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. (Delhi Akshardham Temple Information)