अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच त्यांचे टेरिफ कार्ड उलटे पडले आहे. अमेरिकन कोर्टाने ट्रम्प यांची ही टेरिफ निती बेकायदेशीर असल्याचे घोषित केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना त्यामुळे मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेच्या अपील न्यायालयाने ट्रम्प यांचे शुल्क बेकायदेशीर ठरवले आहे. ट्रम्प यांनी लादलेले शुल्क कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही असा निर्णय अमेरिकन न्यायालयाने दिला. अमेरिकन न्यायालयाचा हा निर्णय ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांना दुहेरी धक्का देणारा ठरला. कारण ट्रम्प यांनी भारताला नमवण्यासाठी टेरिफ कार्ड फेकले होते. पण हे कार्ड त्यांच्यावर उलटवण्यात एका भारतीयाचा मोठा वाटा आहे. एका भारतीय व्यक्तीमुळेच ट्रम्प यांचा अमेरिकन न्यायालयात पराभव झाला आहे. ट्रम्प यांना टेरिफ कार्डाच्या या खेळात पराभूत करणा-या भारतीयाचे नाव आहे, नीलकुमार कात्याल. (Donald Trump)
अमेरिकेच्या फेडरल सर्किटच्या अपील न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले शुल्क बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांना शुल्क लादण्याचा अधिकार नाही. ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायद्या अंतर्गत त्यांच्या मर्यादा ओलांडल्याचे न्यायालयानं सांगून ट्रम्प यांना चांगलीच चपराक दिली. ट्रम्प यांना असे शुल्क लादता येईल इतके व्यापक अधिकार नसल्याचे सांगून न्यायालयानं ट्रम्प यांना तुम्ही आणीबाणीच्या अधिकारांचा गैरवापर करून शुल्क लादले आहे, पण असे शुल्क किंवा कर लादण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट शब्दात सांगतिले आहे. (International News)
आता ट्रम्प प्रशासन सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहेत. मात्र फेडरल सर्किटच्या अपील न्यायालयाच्या निर्णयानं एकाअर्थी डोनाल्ड ट्रम्प यांचा पार नक्षा उतरवला आहे. या सर्वात भारतीय वंशाचे नीलकुमार कात्याल यांची भूमिका महत्त्वाची आहे. नील कात्याल हे व्यवसायाने वकील आहेत. कात्याल हे अमेरिकेच्या फेडरल सर्किटच्या अपील न्यायालयात याचिकाकर्त्याच्या वतीने वकील होते. त्यांनी त्यांच्या युक्तिवादांच्या आधारे टेरिफच्या खेळात डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत केले. नीलकुमार कात्याल हे एक अमेरिकन वकील आणि कायदेतज्ज्ञ आहेत. (Donald Trump)
नीलकुमार कात्याल हे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत. त्यांचे पालक भारतीय वंशाचे आहेत. आईचे नाव डॉ. प्रतिभा आहे. तर वडिलांचे नाव सुरेंद्र असून ते इंजिनिअर होते. आता नील यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. अमेरिकन संविधानानुसार, शुल्क किंवा कोणत्याही प्रकारचा कर लादण्याचा अधिकार केवळ अमेरिकन संसदेकडे म्हणजेच काँग्रेसकडे आहे, राष्ट्रपतींकडे नाही. याच मुद्द्यावरुननील कात्याल यांनी न्यायालयात डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध जोरदार युक्तिवाद केला. यामुळे न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध निर्णय दिला. नीलकुमार कात्याल हे अमेरिकेत चांगलेच प्रसिद्ध आहेत. नीलकुमार यांची कायदेशीर कारकीर्द खूपच उल्लेखनीय राहिली आहे. (International News)
त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रशासन काळात अमेरिकेचे कार्यवाहक सॉलिसिटर जनरल म्हणून काम केले आहे. सॉलिसीटर जनरल हे सरकारचे एक वरिष्ठ कायदेशीर पद आहे. आता ट्रम्पच्या टेरिफ धोरणाबाबत अमेरिकन कोर्टात लढा देतांना नीलकुमार कात्याल हे लघु व्यवसायांच्या गटाचे आणि डेमोक्रॅटिक-नेतृत्वाखालील राज्यांचे प्रमुख वकील होते. आता हे सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे गेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील हे टेरिफ असंवैधानिक घोषित केले तर ट्रम्प प्रशासनाला अब्जावधी डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागू शकते. ट्रम्प सरकाराला आधीच वसूल केलेले टेरिफ परत करावे लागू शकतात. ट्रम्प सरकारने केवळ जुलैपर्यंत या माध्यमातून 159 अब्ज डॉलर्स कमावले आहेत. (Donald Trump)
=======
America : पीटर नवारो…भारताचा खलनायक !
=======
डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याची घोषणा केली आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर न्यायालयाच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. हा निर्णय अमेरिकेचा नाश करेल असे सांगून ट्रम्प यांनी न्यायालयाचा निर्णय पक्षपाती असल्याचे म्हटले आहे. मात्र या सर्वात डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिमा त्यांच्या देशात घसरली आहे. ट्रम्प यांचे निर्णय अमेरिकेच्या विश्वासाला तडा देणारे ठरत असल्याचे मत अमेरिकेतील मान्यवर मिडिया हाऊसमधून व्यक्त होत आहे. त्यातही सर्वोच्च न्यायालयानेही ट्रम्प यांच्या विरोधात निकाल दिल्यास जगभरात अमेरिकेचे हसू होईल, शिवाय मोठा आर्थिक फटका बसेल अशी चिंताही व्यक्त करण्यात येत आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics