तुम्ही पाहिले असेल की, भारतात बहुसंख्येने लोक रस्त्याच्या कडले राहतात. तर काही जण रेल्वे स्थानकाजवळ किंवा प्लॅटफॉर्मवर आपल्या आयुष्याचे दिवस काढत असतात. भरतात अशी बरीचशी लोक आहेत ज्यांकडे आपल्या स्वत:च्या हक्काचे घर नाही आहे आणि ते बेघर आहेत. अशीच स्थिती अमेरिकेत सुद्धा आहे. येथील सुद्धा बहुतांश जणांकडे राहण्यासाठी घर नाही आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का, अमेरिकेतील ज्या लोकांकडे राहण्यासाठी घर नाही ते लोक काय करतात? कसे आपले आयुष्य जगतात की ते सुद्धा भारतातील बेघर लोकांप्रमाणेच राहतात का अशा सर्व प्रश्नांची उत्तर आपण आज जाणून घेणार आहोत.(US homeless people)
अमेरिकेतील किती लोक बेघर आहेत?
अमेरिकेतील बेघर असणाऱ्या लोकांची संख्या खुप मोठी आहे. या लोकांकडे राहण्यासाठी घरच नव्हे तर ते आपले शरिर एका ठिकाणी शांत राहिल अशी स्थायी जागा सुद्धा नाही. अशा लोकांबद्दल बोलायचे झाल्यास अमेरिकेतील या लोकांची संख्या लाखांमध्ये आहे. काही रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेतील एकूण बेघर लोकांची संख्या २ लाख २६ हजार आहे. यामध्ये बहुतांशजण हे एकटेच राहतात आणि त्यांची संख्या २ लाख ९ हजारांच्या आसपास आहे.
तर, जवळजवळ १७ हजार लोक असे आहेत जे आपल्या परिवारासोबत राहतात. म्हणजेच संपूर्ण परिवारासोबत राहण्यासाठी जागा नाही. या व्यतिरिक्त अमेरिकेत असे ही काही बेघर आङेत त्यांच्याकडे अजिबातच कोणती स्थायी जागा राहण्यासाठी नाही. अशातच प्रश्न उपस्थितीत होतो की, अखेर ऐवढे लाखोंच्या संख्येने असलेले बेघर नक्की राहतात तरी कसे?
हे देखील वाचा- OK शब्द नेमका कुठून आला आणि प्रत्येक भाषांमध्ये का वापरला जातोय?

कसे राहतात बेघर लोक?
डीडब्लूच्या एका रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेतील ज्या लोकांकडे घर नाही ते लोक कधी रस्त्यांवर, कधी टेंटमध्ये तर काही वेळा गाड्यांमध्ये किंवा पार्किंग परिसरात राहतात. कोरोना व्हायरसच्या संकटानंतर अमेरिकेतील बेघर लोकांचा आकडा वाढला आहे. यामध्ये सुद्धा बहुतांश जण असे आहेत त्यांचा राहण्याचे ठिकाणच नाही आहे. त्यांच्यासाठी विविध शहरांमध्ये टेंटची व्यवस्था करण्यात आली आहे. काही कॅम्प ही तयार करण्यात आले आहेत. त्यांना कॅम्पमध्ये ठेवण्यावरुन सुद्धा वाद निर्माण होतो.(US homeless people)
जे लोक त्यांच्यासाठी टेंटची व्यवस्था करतात ते असे सांगतात की, बेघर लोकांना राहण्यासाठी जागा मिळते. त्यांना स्वच्छ टेंटमध्ये राहण्यासाची सोय केली जाते. दरम्यान, जे लोक याच्या विरोधात आहेत ते असे म्हणतात की, कॅम्पमध्ये लोकांना ठेवणे हे एक अपराधासारखे आहे. खरंतर या कॅम्पमध्ये कचरा, स्वच्छतेची व्यवस्था असते. दरम्यान, अमेरिकेतील बहुतांश शहरांमध्ये या कॅम्पांच्या विरोधात कायदा सुद्धा आला आहे. त्यामुळे त्यांना हटवण्यात येत आहे. अशा स्थिती लोकांना सुद्धा भारतात ज्या प्रमाणे बेघर लोक राहतात त्याच पद्धतीने आपल्या राहण्याची जागा शोधत भटकावे लागते.