Home » America : आता सोशल मीडिया अकाऊंट पाहून अमेरिका देणार विद्यार्थ्यांना व्हिजा

America : आता सोशल मीडिया अकाऊंट पाहून अमेरिका देणार विद्यार्थ्यांना व्हिजा

by Jyotsna Kulkarni
0 comment
America
Share

आजकाल अनेक भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्यासाठी जातात. बऱ्यापैकी भारतीय विद्यार्थ्यांचा ओढा हा अमेरिकेमध्ये जाण्याचा असतो. मात्र परदेशात शिकायला जाणे वाटते तितके सोपे अजिबातच नाहीये. रस्ताही मोठी प्रोसेस आहे, जी आपण पूर्ण केली तरच आपल्याला परदेशात जाऊन शिक्षण घेता येते. जर तुमचे मुलं देखील अमेरिकेमध्ये शिकण्यास जाणायचा विचार करत असतील तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. (America)

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष काय झाले आणि त्यांनी दररोज नवनवीन नियम काढण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रत्येक नवनवीन नियमांमुळे इतर देशांना धडकीची भरते. ट्रम्प यांनी प्रत्येक गोष्टींसाठी मोठी नियमावली जाहीर केली आहे. त्यांच्या एका नियमातून लोकं बाहेर येत नाही तोवर ट्रम्प दुसऱ्या नवीन नियमाचा बॉम्ब टाकत आहे. अशातच आता ट्रम्प सरकारने अमेरिकेमध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक नवीन नियम काढला आहे. या नियमामुळे अमेरिकेत शिकण्याचे स्वप्न असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले आहे. (Todays Marathi Headline)

झाले असे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना व्हिजा मिळवण्यासाठी सर्वात आधी सोशल मीडियाची तपासणी अनिवार्य केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना युएस मध्ये शिकण्यास जायचे आहे, त्यांनी त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट पब्लिक करणे आवश्यक करण्यात आले आहे. कारण याच सोशल मीडिया अकाऊंटवरून त्या विद्यार्थ्यांबद्दल अनेक प्रकारची माहिती मिळवता येईल. हे विद्यार्थी राष्ट्राच्या विरोधात चालणाऱ्या कोणत्याही कारवायांमध्ये सामील नाही ना किंवा त्यांनी कोणतीही आपत्तीजनक पोस्ट शेअर केलेली नाही ना हे तपासले जाणार आहे. (Marathi News)

America

अमेरिकेच्या दूतावासाने नवीन गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. या गाइडलाइन्स त्या लोकांसाठी आहेत, जे स्टुडन्ट आणि एक्सचेंज व्हिसिटर व्हिजा घेऊ इच्छिता. नवीन नियम आता लागू करण्यात आले आहेत. जे F, M आणि J कॅटेगिरीच्या नॉन अग्रीमेंट व्हिजा मिळवणाऱ्यांसाठी आहे. या कॅटेगिरीतल्या व्हिजासाठी आवेदन करणाऱ्यांना त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट ‘पब्लिक’ करणे आवश्यक आहे. अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी F-1 व्हिजा मिळतो. तर M-1 व्हिजा हा व्होकेशनल किंवा नॉन-अकॅडमिक ट्रेनिंगसाठी दिला जातो.आणि J-1 व्हिजा हा एक्सचेंज विद्यार्थ्यांना मिळतो. (Marathi Latest News)

सोशल मीडिया प्लेटफॉर्म असलेल्या एक्सवर एक पोस्ट शेअर करत यूएसच्या दूतावासाने म्हटले आहे की, “F, M आणि J नॉन-इमिग्रेंट व्हिजासाठी अर्ज करणाऱ्यांना सर्वच लोकांना आम्ही विनंती करतो की, त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या प्रायव्हसी सेटिंग ‘पब्लिक’ करा. जेणेकरून अमेरिकेच्या कायद्यानुसार त्याची यूएसमध्ये त्यांची ओळख पटवण्यासाठी योग्य पडताळणी केली जाईल. हा निर्णय लगेच लागू करण्यात आला आहे. २०१९ सालापासूनच अमेरिका व्हिजाचा अर्ज करणाऱ्या लोकांकडे सुरक्षेच्या तपासणीसाठी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या डिटेल्स मागत आहे. व्हिजाच्या तपासणी दरम्यान आम्ही सर्वच प्रकारच्या माहितीचा वापर करतो. कारण यावरूनच आम्ही ठरवू शकतो की कोणाला अमेरिकेमध्ये एन्ट्री मिळाली पाहिजे आणि कोणाला नाही.” (Top Marathi News)

=================

हे देखील वाचा : Kolhapuri Chappal: राज्या-महाराजांच्या पायाची शोभा वाढवणाऱ्या कोल्हापुरी चप्पलेचा जाज्वल्य इतिहास

=================

दरम्यान अमेरिकेमध्ये मागच्यावर्षी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पॅलेस्टाईन समर्थक लोकांनी प्रदर्शने केली होती. सरकारच्या बाजूने दावा केला होता की, हमाससारख्या अतिरेकी संघटनांना पाठिंबा देणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनी या निदर्शनांमध्ये सहभाग घेतला होता. सरकारने असेही म्हटले होते की परदेशी विद्यार्थ्यांनी इस्रायल आणि अमेरिकेवर टीका देखील केली होती. आता सरकारला अशा विद्यार्थ्यांना अमेरिकेमध्ये प्रवेश करण्यापासून रोखायचे आहे. यासाठी, प्रत्येक व्हिसा अर्जदाराच्या सोशल मीडियाची तपासणी केली जाईल जेणेकरून जर त्याने यहूदीविरोधी, हमास समर्थक किंवा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारे काही पोस्ट केले असेल तर त्याला व्हिसा नाकारता येईल. (Social Updates)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.