Home » ‘रौद्र’साठी संस्कृत शिकली उर्मिला जगताप

‘रौद्र’साठी संस्कृत शिकली उर्मिला जगताप

by Team Gajawaja
0 comment
संस्कृत
Share

सध्या सोशल मिडीयावर अभिनेत्री उर्मिला जगतापच्या संस्कृत श्लोकांच्या व्हिडीओची बरीच चर्चा आहे. उर्मिलाने या संस्कृत भाषेच्या पोस्टचा आधार घेतला आहे, तो आपला आगामी ‘रौद्र’ या सिनेमासाठी. या सिनेमात उर्मिला मृण्मयी नावाच्या भूमिकेत आहे.

मृण्मयी जून्नर जवळ गावात राहाणारी मुलगी आहे. तीला चार भींतीतून बाहेर पडायचे आहे. ती धाडसी आहे, हळवी आहे, पण घरच्यांच्या धाकात आहे. पण, मृण्मयीचा आणखीन एक गुण आहे, ते म्हणजे तिला संस्कृत भाषा येते.

या भूमिकेबद्दल बद्दल उर्मिला जगताप सांगते, “या सिनेमाची कथा पन्नासच्या दशकातील आहे. आणि एका रहस्याचा शोध आहे. त्यात काही संस्कृतच्या श्लोकांचा समावेश आहे. मृण्मयीची भूमिका ही ब्राह्मण घरातील संस्कृत येणा-या मुलीची भूमिका आहे. त्यामुळे या सिनेमासाठी मी संस्कृत शिकले.

====

हे देखील वाचा: राहुल-उर्मिलाची जोडी ‘रौद्र’ चित्रपटामध्ये

====

माझ्या एका मित्राने माझ्याकडून संस्कृतची शिकवणी घेतली. शाळेनंतर संस्कृत भाषेचा संबंध आला नव्हता. त्यामुळे मला त्यावर मेहनत घ्यावी लागली. त्या श्लोकातून कोड्याचे उत्तर मिळणार आहे आणि हेच सिनेमाचे सार आहे.” या सिनेमात रहस्मृय तर आहेच, पण मृण्मयी आणि त्र्यंबक यांची लवस्टोरीही पाहायला मिळणार आहे.

उर्मिलाने याआधी ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘स्पेशल पोलिस फोर्स’ या मालिका तसेच ‘एक सांगायचंय’, ‘ऊसान’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

चित्रपटाची कथा मंगेश बाळासाहेब गटकळ यांची असून पटकथा आणि संवाद रविंद्र शिवाजी यांचे आहेत. मंगेश बाळासाहेब गटकळ या चित्रपटाचे निर्माते तर सहनिर्माते समीर किसन गाडे आहेत.

====

हे देखील वाचा: ‘रौद्र’ चित्रपटाचा शानदार ट्रेलर प्रदर्शित, 1 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला

====

हर्षद गोलेसर, वैष्णवी अडोदे, शुभांगी केदार, शिरीष पवार या गायकांनी यातील गाणी गायली आहेत. संगीताची जबाबदारी अक्षय जाधव यांनी सांभाळली आहे. छायांकन स्वप्निल केदारे आणि संकलन आकाश मोरे यांचे आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.