युपीआयमुळे लोकांना एकेमकांना पैसे पाठवणे अगदी सोप्पे झाले आहे. याच कारणामुळे कॅश किंवा क्रेडिट/डेबिट कार्ड वापरण्याची गरज भासत नाही. फोनच्या माध्यमातून फक्त लहान-मोठ्या गोष्टींचे पेमेंट आपण सध्या युपीआयच्या माध्यमातून करतो. मात्र काही वेळेस ही डिजिटल सर्विस असल्याने आपल्याकडून चुकीच्या व्यक्तीला पैसे ट्रांन्सफर करतो. मात्र जर तुम्ही सुद्धा युपीआयसह गुगल पे, फोन पे किंवा पेटीएमच्या माध्यमातून चुकीच्या व्यक्तीला पैसे ट्रांन्सफर झाल्यास तर चिंता करु नका. तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात. (UPI Transaction)
आपल्याला वाटते की, आपण एखाद्या चुकीच्या व्यक्तीला केलेले पेमेंट परत मिळवू शकत नाहीत आणि हे खरं आहे. कारण तुम्हाला तोच व्यक्ती पैसे परत पाठवू शकतो ज्याला तुम्ही ते ट्रांन्सफर केले आहेत. भले तो व्यक्ती तुम्हाला पैसे परत पाठवून मेहरबानी करेल पण तुम्ही याची तक्रार मात्र नक्की करु शकता. तक्रार केल्यानंतर युपीआय पेमेंट अॅप, बँक आणि एनपीसीआय तुमची मदत करु शकतात.
सर्वात प्रथम करा हे काम
जर तुम्ही युपीआयच्या माध्यमातून चुकीच्या व्यक्तीला पेमेंट केले असेल तर त्या ट्रांजेक्शनचा लगेच स्क्रिनशॉट काढा. त्यानंतर अॅपच्या असिस्टेंट सेक्शनमध्ये जाऊन तक्रार करा. हे काम करणे अत्यंत गरेजेचे असते. त्यानंतर तुम्ही बँकेशी संपर्क साधा. या प्रकरणी केवळ बँकच तुमची मदत करु शकते. जेथून तुम्ही पैसे ट्रांन्सफर केले आहेत. तुमच्या बँकेला सर्व माहिती द्या. बँकेच्या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करा किंवा नेटबँकिंगच्या माध्यमातून तक्रार करु शकता. पैसे ट्रांन्सफर झाल्यास मेसेज आणि ट्रांजेक्शन आयडी सांभाळून ठेवा.
तक्रार करण्याची काय आहे प्रक्रिया?
एनपीसीआयच्या वेबसाइटनुसार, चुकीच्या युपीआय पेमेंटची तक्रार सर्वात प्रथम तेथे करा जेथून चुकीचे ट्रांजेक्शन झाले आहे. म्हणजेच जर गुगल पे च्या माध्यमातून ट्रांजेक्शन झाले असेल तर त्यांच्याकडे तक्रार करा. येथे तुमच्या समस्येवर तोडगा निघाला नाही तर तुम्ही त्या बँकेत तक्रार करु शकता ज्याच्या खात्यात पैसे गेले आहेत. जर बँक ही तुमच्या तक्रारीकडे लक्ष देत नसेल तर तुम्ही बँक लोकपालकडे तक्रार करु शकता.(UPI Transaction)
हे देखील वाचा- एखाद्या वेबसाइटवर तुमचा डेटा Save केलायं हे तपासून पाहण्यासाठी ‘ही’ ट्रिक वापरा
NPCI च्या वेबसाइटवर अशा पद्धतीने करा तक्रार
युपीआयच्या माध्यमातून चुकीच्या खात्यात पैसे ट्रांन्सफर झाल्यास एनपीसीआयच्या वेबसाइटवर तक्रार करु शकतात. यासाठी एनपीसीआयची वेबसाइटच्या Dispute Redressal Mechanism वर क्लिक करा. येथे एक फॉर्म सुरु होईल. येथे दिली गेलेली माहिती तुम्हाला द्यावी लागेल. त्याचसोबत तुम्हाला बँकेचे स्टेटमेंट ही अपलोड करावे लागणार आहे. तक्रारीच्या कारणात इनकॉरेक्टली ट्रांन्सफर टू अकाउंट हा पर्याय निवडा आणि तो द्या. अशा प्रकारे तुम्ही एनपीसीआयला ऑनलाईन तक्रार करु शकता.