Paytym च्या माध्यमातून पेमेंट करणे आता सोप्पे होणार आहे. कारण इंटरनेटशिवाय पेमेंट करता येणार आहे. यासाठी युपीआय लाइट फिचर लॉन्च केले आहे. दरम्यान, ही सुविधा आधीपासूनच सुरु होती. पण पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) सह याचे टायअप सुद्धा झाले आहे. युपीआय लाइट फिचरच्या मदतीने तुम्हाला पेमेंट करण्यासह वेळोवेळी येणाऱ्या समस्येपासून ही सुटका मिळणार आहे. खास गोष्ट अशी की, २०० रुपयांपर्यंतचे पेमेंट तुम्ही कोणताही पिन क्रमांक न वापरता करु शकता. (UPI Lite)
लहान पेमेंट करणे होणार सोप्पे
युपीआय लाइट पेमेंट सुविधा भारतीय राष्ट्रीय पेमेंट निगम यांनी नुकतीच सुरु केली आहे. युपीआय लाइटच्या मदतीने युजर्सला लहान-लहान पेमेंट करणे सोप्पे होणार आहे. यामध्ये प्रत्येक दिवसासाठीच्या ट्रांजेक्शनची मर्यादा नसणार आहे. तुम्ही युपीआय लाइटच्या मदतीने दिवसात किती ही वेळा लहान-लहान ट्रांजेक्शन करु शकता. यामध्ये एका कमीत कमी २ हजार रुपये टाकू शकता. अशा प्रकारे तुम्ही दिवसात दोन वेळा पैसे टाकू शकता. जेणेकरुन तुमची रक्कम ही ४ हजार रुपये होईल.
१०० रुपयांच्या कॅशबॅकची ऑफर
आपल्या पेटीएम पेमेंट्स बँक अकाउंटच्या माध्यमातून युपीआय लाइट अॅक्टिव्हेट केल्यानंतर १०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. पेटीएम आपल्या काही युजर्सला युपीआय लाइट अॅक्टव्हिट करण्यासाठी कॅशबॅक देत आहे. या ऑफरसाठी तुम्हाला पेटीएम अॅपमध्ये जाऊन तपासून पाहू शकता. जर तुम्ही अशा प्रकारच्या ऑफरसाठी एलिजिबल असाल तर तुम्हाला युपीआय लाइट अॅक्टिव्हेट केल्यानंतर १०० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जाणार आहे.
एसएमएसच्या माध्यमातून मिळणार दररोजच्या ट्रांजेक्शनची माहिती
युपीआय लाइटच्या माध्यमातून तुम्ही जे पेमेंट करणार त्याची माहिती तुम्हाला बँकेच्या एसएमएसद्वारे मिळणार आहे. युपीआय लाइटमुळे तुमच्या पेटीएम पेमेंट बँकेचे पासबुक आता प्रत्येक दिवशी लहान लहान ट्रांजेक्शनमुळे भरणार नाही. हे ट्रांजेक्शन तपासून पाहण्यासाठी तुम्ही पेटीएम शिल्लर रक्कम आणि हिस्ट्री सेक्शन मध्ये जाऊन पाहू शकता. तेथे तुम्हाला ते दाखवले जाणार आहे. (UPI Lite)
हे देखील वाचा- बनावट नोटांमुळे अर्थव्यवस्थेला फटका, कुठे केली जाते सर्वाधिक छपाई?
दरम्यान, गेल्या आठवड्याच्या अखेरच्या दिवशी अमेरिकेतील सर्वाधिक मोठ्या बँकेपैकी एक सिलिकॉन वॅली बँक बुडणार असल्याची बातमी समोर आली होती. यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांना धक्का बसला होता. अशी शक्यता व्यक्त केली जात होती की, एसवीबी बुडल्यास जगातील बहुतांश कंपन्यांवर त्याचा फार मोठा परिणाम होईल. यामध्ये भारतीय काही स्टार्टअप कंपन्यांनाना ही तो फटका सहन करावा लागू शकत होता. याच दरम्यान असा अंदाज लावला जात होता की, पेटीएमला ही याचा फटका बसू शकतो. पण पेटीएमचे फाउंडर आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी या अंदाजांना पूर्णविराम दिला. त्यांनी स्पष्ट केले की, आता पेटीएममध्ये सिलिकॉन वॅली बँकची कोणतीही हिस्सेदारी नाही.