Home » Bluetooth च्या माध्यमातून तुमच्या ठेवली जाऊ शकते नजर

Bluetooth च्या माध्यमातून तुमच्या ठेवली जाऊ शकते नजर

आतापर्यंत तुम्ही मोबाईल, सीसीटीव्ही आणि दुसऱ्या डिवाइसच्या माध्यमातून हेरगिरी केल्याबद्दलच्या प्रकरणांबद्दल ऐकले असेल.

by Team Gajawaja
0 comment
Unwanted Tracking Alerts
Share

गेल्या काही काळापासून नागरिकांची ऑनलाईन फसवणूक केली जात असल्याची प्रकरणे समोर येत असतात. अशातच आतापर्यंत तुम्ही मोबाईल, सीसीटीव्ही आणि दुसऱ्या डिवाइसच्या माध्यमातून हेरगिरी केल्याबद्दलच्या प्रकरणांबद्दल ऐकले असेल. मात्र ब्लूटूथच्या माध्मयातून ट्रॅकिंग केले जाते. याबद्दल फारसे कोणाला माहिती नाही. पण ब्लुटूथच्या माध्यमातून तुमच्यावर नजर ठेवली जाऊ शकते. (Unwanted Tracking Alerts)

जर तुम्हाला असा संशय येत असेल तर चिंता करण्याची काहीच गरज नाही. कारण गुगलने अॅन्ड्रॉइड 6.0+ ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित एक कमालीचे फिचर रोलआउट केले आहे. या फिचरच्या माध्यमातून अनवॉन्टेड ट्रॅकिंगची ओळख पटवली जाऊ शकते.

हे अॅन्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमची नवी सुविधा असून जी अॅन्ड्रॉइड 6.0 आणि त्यानंतरच्या वर्जनवर आधारित आहे. हे फिचर स्मार्टफोनला हे निर्धारित करण्याची परवानगी देतो की, स्मार्टफोनवर एखादे अज्ञात ब्लुटूथ ट्रॅकर तर लावण्यात आलेले नाही ना. हे युजर्सच्या प्रायव्हेसी आणि सिक्युरिटीला लक्षात घेता रोलआउट करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून युजर्स अज्ञात ब्लूटूथ ट्रॅकर्सला ओळखण्यासह, त्याबद्दल अधिक माहिती मिळवणे आणि डिसेबल करण्यास सक्षम असणार आहे.

कसे काम करते
अज्ञात ट्रॅकर अलर्ट फिचर अॅन्ड्रॉइड युजर्सला ऑटोमॅटिकली नोटिफाय करेल की, त्यांच्या डिवाइसमध्ये अननोन ट्रॅकर तर नाही ना. हे फिचर अॅप्पल एअरटॅग्ससह काही अन्य ट्रॅकर्ससोबत मिळून काम करते, जे गुगल फाइंड माय डिवाइस नेटवर्कसोबत कंपेटिबल आहे.

या व्यतिरिक्त अॅन्ड्रॉइड युजर्स मॅन्युअली सुद्धा स्कॅन करु शकता. याच्या माध्यमातून ब्लुटूथ ट्रॅकर्सबद्दल अधिक कळले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंग्सवर जाऊन Safety and emergency ऑप्शनवर क्लिक करावा लागणार आहे. (Unwanted Tracking Alerts)

युजर्स मॅपवर डिवाइस पाहू शकता. येथून कळेल की, डिवाइस कुठे आणि त्याला शोधण्यास मदत मिळेल. त्याचसोबत ट्रॅकरच्या माध्यमातून साउंड सुद्धा प्ले केला जाऊ शकतो. डिवाइस शोधण्याव्यतिरिक्त हे फिचर युजर्सला ट्रॅकरला फिजिकल रुपात डिसेबल करण्याची परवानगी देईल.

हेही वाचा- चिमणी उडाली भुर्रर्र..ट्विटरच्या नव्या लोगोची सोशल मीडियात चर्चा

दुसरे फिचर गुगलने जे युजर्सला दिले गेले आहे ते म्हणजे मॅन्युअल स्कॅन. याच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे की, तुमच्या आसपास किती असे ट्रॅकर आहेत की जे आपल्या ओनरच्या डिवाइससोबत सध्या कनेक्ट नाही, मात्र तुमच्या आसपास ते आहेत. तुम्ही हे ट्रॅकर सुद्धा ऑफ करु शकता. गुगल द्वारे दिल्या गेलेल्या नव्या फिचरच्या मदतीने युजर्सच्या प्रायव्हेसीची काळजी घेतली जाणार आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.