Home » भारतामधील खरे हिरो ज्यांच्यावर चित्रपट बनायलाच हवेत; जाणून घेऊया त्यांच्या कार्याबद्दल

भारतामधील खरे हिरो ज्यांच्यावर चित्रपट बनायलाच हवेत; जाणून घेऊया त्यांच्या कार्याबद्दल

by Team Gajawaja
0 comment
Unsung Indian Heroes
Share

भारत एक असा देश आहे ज्याला सांस्कृतिक वारसा आणि भाषेचे वैविध्य लाभलेलं आहे. कोट्यवधी लोकसंख्या असणाऱ्या भारतात ‘टॅलेंटची’ काहीही कमी नाही. भारताने अनेक कलाकार, उद्योजक, शास्रज्ञ आणि खेळाडू जगाला दिले आहेत.  चित्रपटसृष्टी भारतामधील एक मोठी  इंडस्ट्री समजली जाते.कपिल देव, महेंद्रसिंग धोनी, नीरजा भानोत, इ. अनेक महान व्यक्तिमत्वाच्या आयुष्यावर, त्यांच्या कार्यावर  आधारित चित्रपट तयार होत असतात. मात्र भारतात अजूनही काही साहसी हिरो आहेत ज्यांचं कार्य सामान्य जनतेसमोर यायला हवं आणि यासाठी चित्रपटासारखं दुसरं प्रभावी माध्यम नाही. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्याही जीवनावर चित्रपट बनायला हवेत. (Unsung Indian Heroes)

१. फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ – १९७१ च्या भारत पाक युद्धाचे नेतृत्व 

सॅम हे १९७१ च्या युद्धाच्या वेळी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या विरोधात उतरले होते. “आम्ही आत्ताच युद्धात उतरलो, तर मी तुम्हाला १००% पराभवाची हमी देऊ शकतो. मी माझा राजीनामा पाठवू का?” असे उद्गार युद्धाच्या वेळी त्यांनी काढले होते. सॅम यांनी १९७१ च्या युद्धात अतुलनीय कामगिरी बजावली. मेघना गुलजार दिगदर्शित सॅम बहादूर हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट सॅम यांच्या आयुष्यावर आधारलेला आहे. (Unsung Indian Heroes)

 २.  अजित डोवाल – गुप्तहेर आणि पंतप्रधानांचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

अजित डोवाल हे गुप्तचर विभागात कार्यरत होते. त्यांनी पाकिस्तानमधील लाहोर शहरात ७ वर्ष घालवली आहेत. त्यांनी कित्येक अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी केल्या असून, १९९९ साली झालेल्या इंडियन एअरलाईन्सच्या अपहरणकर्त्यांना मात देऊन प्रवाशांना यशस्वीपणे परत आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. इराकमध्ये जेव्हा इसिसच्या दहशतवाद्यांनी परिचारिकांचे अपहरण केले होते तेव्हा डोवाल यांनीच त्यांना सुरक्षित बाहेर काढले होते. त्यांच्या जीवनप्रवासावर एखादा रंजक चित्रपट नक्कीच बनायला हवा. (Unsung Indian Heroes)

३.कॅप्टन विक्रम बत्रा – कारगिल विजयात मोठी कामगिरी,

कारगिल विजयात मोठी कामगिरी करत कॅप्टन विक्रम बत्रा यांनी जखमी सैनिकाला वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. कॅप्टन विक्रम बत्रा जेव्हा युद्धभूमीवर लढत होते तेव्हा त्यांनी दुसऱ्या सैनिकाला वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली होती. त्या सैनिकाला “तुला बायका मुले आहेत, सारक मागे म्हणून स्वतः बत्रा पुढे झाले आणि भारतमातेसाठी शाहिद झाले. त्यांचे शेवटचे वाक्य ‘जय माता दी’ होते. (Unsung Indian Heroes)

====

हे देखील वाचा: ‘मी वसंतराव’ पहिली झलक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या हस्ते प्रेक्षकांच्या भेटीला

====

४. रुकसाना कौसर – एलटीईच्या अतिरेक्यांना कुऱ्हाडीने मारले 

रुकसाना कौसर हिची कथा प्रेरणादायी असून भारतातील प्रत्येकी तरुणीने तिच्याकडून आदर्श घ्यायला हवा. काश्मीरच्या असणाऱ्या रुकसानाच्या घरी एकदा अतिरेकी आले होते. तेव्हा त्यांनी तिच्या कुटुंबाकडे तिला घेऊन जाण्याची मागणी केली. हे ऐकून जेव्हा रुकसाना बाहेर आली तेव्हा तिने अतिरेक्याच्या डोक्यात कुऱ्हाड घालून त्याला ठार केले. तिने त्याच्याजवळील एके ४७ बंदूक घेऊन गोळीबार केला आणि उरलेल्या अतिरेक्यांना पळून लावले. तिची कहाणी एखाद्या ॲक्शन चित्रपटापेक्षा कमी नाही. 

५. ममता रावत – उत्तराखंडमध्ये आलेल्या महापुरात अनेकांना वाचवले

ममता रावत हिने २०१३ ला उत्तराखंडमध्ये महापूर आला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि  वित्त हानी झाली होती. परंतु., त्या भयंकर परिस्थितीत ममता रावत यांनी कित्येकांचे जीव वाचवले. अनेकांना धोकादायक ठिकाणी पोचविण्यामध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या ममता यांनी ३० विद्यार्थी आणि कित्येक वृद्ध लोकांना वाचवले. त्यांच्याकडे स्वतःच्या बचावासाठी कोणतीही सामग्री नसताना स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी हे काम पार पाडले. 

६. मेजर जनरल इयान कार्डोझो – उजवा पाय कापून पुरण्याचे आदेश दिले

१९७१ च्या युद्धात अतुलनीय शौर्य गाजवलेले मेजर इयान कार्डोझो हे जेव्हा सैनिकाला मदत करत होते तेव्हा त्यांचा एक पाय उखडून आला होता. त्यानंतर डॉक्टर जेव्हा त्यांचा पाय कापायला घाबरत होते तेव्हा मेजरने स्वतः तो पाय कापून टाकला. त्यावेळी त्यांनी डॉक्टरांना तो पाय घेऊन जाऊन पुरण्याचे आदेश दिले. (Unsung Indian Heroes)

७. अरुणिमा सिंह – पाय नसताना केली माउंट एव्हरेस्टवर चढाई 

राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉपट्टू असणारी अरुणिमा सिन्हा एकदा रेल्वेने प्रवास करत होती. तेव्हा काही दरोडेखोर त्यांच्या डब्यात शिरले. अरुणिमाने आपल्या गळ्यातली सोन्याची चेन द्यायला नकार दिल्यावर तिच्यावर हल्ला केला. तिने प्रतिकार करायला सुरुवात केल्यावर अरुणिमाला चोरटयांनी बसच्या बाहेर ढकलून लावले. त्यानंतर डॉक्टरांना तिचे पाय कापावे लागले. त्यानंतर तिला कृत्रिम पाय बसविण्यात आला. पण त्याही परिस्थितीत त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न बघितले आणि ते पूर्णही केले. त्याची काहींनी जेवढी दुःखद आहे त्याहीपेक्षा जास्त प्रेरणादायी आहे. 

====

हे देखील वाचा: ‘द कश्मीर फाइल्स’चा ट्रेलर प्रदर्शित तर चित्रपट ११ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला

====

८. पूर्णा मालावाथ – सर्वात तरुण वयात माउंट एव्हरेस्ट सर 

दलित कुटुंबात जन्माला आलेल्या पूर्णाने सर्वात कमी वयात माउंट एव्हरेस्ट सर केला आहे. माउंट एव्हरेस्ट सर करणारी ती सर्वात लहान मुलगी आहे. पूर्णाला गिर्यारोहक बचेंद्री पाल यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तिच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच येईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. 

९. शेखर नाईक – भारतीय अंध संघाचा कर्णधार 

१९८६ साली जन्मलेला शेखर हा जन्मतःच अंध होता. लहानपणीच त्याला क्रिकेटची आवड निर्माण झाली. वयाच्या १२ व्या वर्षी जेव्हा त्याची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्ध्येत निवड झाली तेव्हा त्याच्या खेळाची दखल घेण्यात आली नाही. मात्र १७ वर्षांनंतर त्याला भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी बसण्याचा मान मिळाला. अनेक खेळाडूंवर चित्रपट निघत असताना शेखरच्या आयुष्यावरही चित्रपट प्रदर्शित व्हायला हवा. 

विवेक पानमंद


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.