Home » जगन्नाथ मंदिराची अद्भूत माहिती आणि रहस्ये

जगन्नाथ मंदिराची अद्भूत माहिती आणि रहस्ये

by Jyotsna Kulkarni
0 comment
Jagannath Puri Facts
Share

हिंदू धर्मामध्ये मंदिरांना अनन्यसाधारण महत्व आहे. मंदिरांमध्ये जाऊन प्रत्येक हिंदू व्यक्ती आपल्या आराध्याचे दर्शन घेते आणि समाधान पावते. हिंदू राष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या भारतात असे अनेक मंदिरं आहेत ज्यांना खूपच महत्व आहे. लोकांमध्ये त्या मंदिरांबद्दल एक वेगळीच आस्था आणि प्रेम दिसून येते. याच मंदिरांपैकी एक मंदिर म्हणजे जगन्नाथ मंदिर. ओडिशा राज्यातील पुरी शहरामध्ये हे जगन्नाथ मंदिर स्थित आहे. या मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ, श्रीबलभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत. (Jagannath Puri Facts)

हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या आणि पवित्र अशा चार धाम असलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी एक जगन्नाथ मंदिर आहे. श्री जगन्नाथ हे विष्णूचा एक अवतार मानले जातात. जाणकारांच्या माहितीनुसार या मंदिराची उभारणी राजा अनंगभीमदेव याने केली आहे. भगवान जगन्नाथ यांचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून नव्हे नव्हे संपूर्ण जगातून दर्शवी लाखो भाविक पुरीमध्ये येतात. सध्या पुरीमध्ये रथयात्रा सुरु आहे. त्यानिमित्ताने इथे लाखो भाविक आले आहेत. संपूर्ण जगात या रथयात्रेबद्दल खूपच कुतूहल आणि उत्साह पाहायला मिळतो. तर जाणून घेऊया या संपूर्ण रथयात्रेच्या इतिहास आणि माहिती.

Jagannath Puri Facts

मराठी वर्षातील आषाढ महिना सुरू झाला की वेध लागतात ते जगन्नाथ रथयात्रेचे. आषाढी एकादशीपासून चार्तुमास सुरु होतो. पाठोपाठ सणांची चाहूल लागते. यावर्षी ही रथयात्रा 7 जुलैपासून सुरू झाली आहे. पंचांगानुसार, ही जगप्रसिद्ध रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी काढली जाते. हिंदू धर्मात पुरी जगन्नाथ रथयात्रेला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी या ठिकाणी जगन्नाथ, बलराम आणि देवी सुभद्रा यांची यात्रा साजरी होते. (Jagannath Puri Facts)

भारतातील सर्वात प्रसिद्ध उत्सवांपैकी पुरी येथील जगन्नाथ रथोत्सव ओळखला जातो. हा उत्सव पाहण्यासाठी देशविदेशातील भाविक पुरीमध्ये गर्दी करतात. या यात्रेत देवी-देवतांच्या मूर्ती भव्य रथांमध्ये सजवून रथ ओढला जातो. दरम्यान, रथ मार्गात रथाच्या आधी सोन्याच्या झाडूने रथ मार्ग स्वच्छ केला जातो. ही परंपरा शतकानुशतके चालत आली असून त्यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक असे दोन्ही महत्त्व आहे.

भगवान जगन्नाथ आपला भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्यासह या रथयात्रेमधे बसून पुरी शहराला चक्कर मारतात. मान्यता आहे की या दरम्यान ते आपल्या मावशीच्या घरी, गुंडीचा मंदिराकडे देखील जातात. ही रथयात्रा १० दिवस चालते. (Jagannath Puri Facts)

पद्म पुराणानुसार भगवान जगन्नाथाच्या बहिणीने पुरी हे शहर पाहण्याची इच्छा आपल्या भावांकडे व्यक्त केली होती. बहिणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगन्नाथ आणि बलभद्र यांनी त्यांची प्रिय बहीण सुभद्राला पुरी हे नगर दाखवण्यासाठी रथात बसवले आणि ते फिरवण्यास सुरुवात केली. यादरम्यान ते गुंडीचा येथे त्यांच्या मावशीच्या घरीही गेले. मावशीकडे ते सात दिवस राहिले. तेव्हापासून जगन्नाथ यात्रा काढण्याची परंपरा सुरू आहे. नारद पुराण आणि ब्रह्म पुराणातही याचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. दरम्यान जगन्नाथ पुरी मंदिराशी आणि रथयात्रेशी संबंधित अनेक खास, रंजक गोष्टी, रहस्य आहेत ते आपण जाणून घेऊया.

Jagannath Puri Facts

  • श्री जगन्नाथ मंदिरात भगवान जगन्नाथ, बहीण सुभद्रा आणि मोठा भाऊ बलराम यांच्या मूर्ती स्थापित आहे. मात्र या मूर्तींना हात, पाय किंवा पंजे ​​नाहीये. असे सांगितले जाते की, या मूर्ती बनवण्याचे काम विश्वकर्मा करत होते. त्यांनी हे काम सुरु करताना काम पूर्ण होईपर्यंत कोणीही त्यांच्या खोलीत येऊ नये असे सांगितले. मात्र तरीही राजाने त्यांच्या खोलीत प्रवेश यामुळे नाराज होऊन विश्वकर्मा हे मूर्ती तयार करायचे काम अर्धवट सोडून निघून गेले.
  • श्री जगन्नाथाचा रथ हा 16 चाकांचा असून त्यात 332 लाकडाचा वापर करण्यात आला आहे. या रथाची उंची 45 फूट आहे. जगन्नाथांच्या रथाचा रंग लाल आणि पिवळा आहे. दरवर्षी अक्षय्य तृतीयेपासून या रथ बांधणीचे काम सुरू होते. हा रथ इतर दोन रथांपेक्षा आकाराने मोठा असून, या रथावर हनुमान आणि भगवान नरसिंहाचे शिल्प कोरलेले आहे. हा रथ यात्रेत मागच्या बाजूला असतो.
  • बलराम हे श्री जगन्नाथांचे मोठे भाऊ आहेत. बलराम हे मोठे असल्याने ते नेतृत्व करतात. अर्थात त्यांचा रथ सर्वात पुढे असतो. त्यांच्या रथाची उंची 44 फूट आहे. या रथात निळ्या रंगाचा वापर करण्यात येतो.
  • कृष्ण आणि बलराम यांची लाडकी बहीण सुभद्राचा रथ दोन्ही भावांच्या मध्ये असतो.या रथाची उंची 43 फूट असून रथ सजवण्यासाठी काळ्या रंगाचा वापर केला जातो.
  • अशी मान्यता आहे की, भगवान जगन्नाथाचा रथ जे जे ओढतात, त्यांना मोक्षाची प्राप्ती होते अर्थात ते पुन्हा जन्म घेत नाही. त्यामुळे रथ ओढण्यासाठी तिथे मोठ्या प्रमाणावर गर्दी केली जाते.
  • जगन्नाथ मंदिराला चार धामांमध्ये स्थान आहे. या मंदिरावर फडकणारा ध्वज हा नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकत असतो.
  • जगन्नाथपुरीचे मंदिर हे असे एकमेव मंदिर आहे ज्या मंदिराचा ध्वज दररोज बदलला जातो. रोज एक पुजारी उंच घुमटावर चढून ध्वज बदलत असतो. जर एक दिवसही ध्वज बदलला नाही तर हे मंदिर 18 वर्ष बंद राहील असे सांगण्यात येते.
  • या मंदिरावर कधीही पक्षी उडताना दिसत नाही. विमान देखील या मंदिरावरून जाऊ शकत नाही. एका विशिष्ट प्रकारच्या चुंबकीय शक्तीमुळे हे घडत असल्याचे सांगण्यात येते.
  • जगन्नाथ मंदिरात प्रसाद शिजवण्यासाठी 7 भांडी एकावर एक ठेवली जातात. मुख्य म्हणजे सर्वात वरच्या भांड्यातला प्रसाद आधी शिजतो, तर वरून खाली अशा क्रमाने एकामागून एक प्रसाद शिजत जातो. हे एक आश्चर्यच आहे.

Jagannath Puri Facts

======

हे देखील वाचा : मॉन्सूनमध्ये साडीत आकर्षक दिसण्यासाठी टिप्स

======

  • मंदिरात दर 12 वर्षांनी जगन्नाथासह तिन्ही मूर्ती बदलल्या जातात. त्यानंतर तेथे नवीन मूर्ती बसवल्या जातात. देवाच्या मूर्ती बदलताना शहराची वीज खंडित केली जाते. यासोबतच मंदिराबाहेर प्रचंड सुरक्षा दल तैनात करण्यात येते. त्या काळात मंदिरात फक्त पुजारीच प्रवेश करू शकतात.
  • पुरीमधील कोणत्याही ठिकाणाहून मंदिराच्या शिखरावरील असलेले सुदर्शन चक्र पाहिल्यास ते आपल्याला नेहमीच आपल्या समोरच असल्याचे दिसते. या मंदिराच्या मुख्य घुमटाची सावली दिवसाच्या कोणत्याही वेळेला अदृश्य असते.
  • मंदिराच्या सिंहद्वारेतून पहिले पाऊल आत टाकताच समुद्राच्या लाट्यांचा आवाज आपल्याला ऐकू येत नाही. मात्र, आपण मंदिराच्या बाहेर पाऊल टाकले की, समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो. (Jagannath Puri Facts)

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.