Home » ‘क्रिकेटचा आवाज’ हर्षा भोगले

‘क्रिकेटचा आवाज’ हर्षा भोगले

by Jyotsna Kulkarni
0 comment
Facts About Harsha Bhogle
Share

क्रिकेट म्हटले की, डोळ्यासमोर येतो तो सचिन तेंडुलकर. क्रिकेट आणि सचिन हे जणू समीकरणच झाले आहे. मात्र क्रिकेट आपल्या शानदार खेळाने गाजवणारा जरी सचिन असला तरी याच क्रिकेटची खुमासदार कॉमेंट्री करत त्यात अधिकच रस आणणारा व्यक्ती म्हणजे हर्षा भोगले.

भारतीय क्रिकेटचा खणखणीत आवाज म्हणून हर्षा यांचे नाव घेतले जाते. क्रिकेट म्हणजे टीव्हीसमोर बसून एकही बॉल न चुकवता बघण्याचा खेळ समजला जातो. मात्र हर्षा यांनी त्यांच्या आवाजाने क्रिकेट चक्क लोकांना ऐकवले. अनेकांनी तर हर्षा यांचे समालोचन ऐकूनच क्रिकेट बघण्यास सुरुवात केली आहे. (Facts About Harsha Bhogle)

हर्षा हे मागील तीन दशकांहून अधिक काळ क्रिकेटचे समालोचन करत असून, त्यांच्या आवाजशिवाय क्रिकेट बघताना मजाच येत नाही. आज हर्षा त्यांचा ६४ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक माहिती.

Facts About Harsha Bhogle

हर्षा यांचा जन्म १९ जुलै १९६१ रोजी हैदराबादमधील एका मराठी कुटुंबामध्ये झाला. त्यांचे वडील ए. डी भोगले हे फ्रेंच भाषाचे प्राध्यापक होते आणि आई शालिनी या मानसशास्त्राच्या प्राध्यापक होत्या. त्यांचे शालेय शिक्षण हे हैद्राराबाद येथील पब्लिक स्कुलमध्ये पूर्ण झाले. पुढे त्यांनी उस्मानिया युनिव्हर्सिटीतून केमिकल इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर हर्षा यांनी आयआयएम मधून मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. (Facts About Harsha Bhogle)

हर्षा हे आंध्रप्रदेश क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये उस्मानीया युनिव्हर्सिटीकडून क्रिकेट खेळले होते. तेव्हा ते भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, गोलंदाज अर्शद आयुब यांसारख्या दिग्गज खेळाडूंबरोबर ते राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धां खेळले आहेत. वयाच्या १९ वर्षी हैद्राबादमध्ये त्यांनी सर्वात पहिल्यांदा त्यांनी ऑल इंडिया रेडिओसाठी समालोचन केले.

शिक्षणानंतर हर्षा यांनी एका जाहिरात तयार करणाऱ्या कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. जवळपास दोन वर्ष त्यांनी त्या कंपनीत काम केले. नंतर त्यांनी ते काम सोडून देत एका स्पोर्ट मॅनेजमेंट करणाऱ्या कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. इथेच त्यांना खेळाबद्दल अधिकाधिक माहिती मिळायला लागली. त्यामुळे त्यांना खेळामध्ये आवड निर्माण होऊ लागली. पुढे हीच कंपनी त्यांच्या आयुष्याला आणि कारकिर्दीला कलाटणी देणारी ठरली. (Facts About Harsha Bhogle)

कंपनीत काम करत असताना त्यांना क्रिकेट बद्दल प्रचंड आवड निर्माण झाली. याच क्षेत्रात त्यांनी करियर करण्याचे ठरवले. १९९१-९२ साली ऑस्ट्रेलियाच्या ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशनने हर्षा यांना समालोचन करण्यासाठी आमंत्रित केले. १९९२ च्या विश्वचषकाआधी भारताने केलेल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात त्यांनी कॉमेंट्री केले. इथूनच त्यांच्या करियरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. हर्षा यांच्या आवाजाने सगळ्यांनाच भुरळ घातली आणि क्रिकेट न आवडणारा व्यक्ती देखील त्यांच्या आवाज ऐकण्यासाठी क्रिकेट पाहू लागला.

Facts About Harsha Bhogle

1995 पासून हर्षा भोगले ESPN या स्पोर्ट चॅनेलसाठी जगभरामध्ये काम करू लागले. त्यांनी या चॅनेलसाठी अनेक कार्यक्रम केले आहेत. ‘हर्षा ऑनलाइन’, ‘हर्षा अनप्लग्ड’ आणि ‘स्कूल क्विझ ऑलिम्पियाड’ आदी अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्यासाठी हर्षा भोगले प्रसिद्ध आहेत. यासोबतच हर्षा यांनी अनेक क्रिकेट संबंधी कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालक म्हणून काम केले आहे. शिवाय त्यांनी डिस्कव्हरी आणि टीएलसी या वाहिन्यांवरही हर्षा यांनी ‘ट्रॅव्हल वीथ हर्षा भोगले’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. (Facts About Harsha Bhogle)

हळहळू हर्षा यांनी या क्षेत्रात चांगलाच जम बसवला. त्यांच्या आवाजाचे चाहते फक्त भारतात नाही तर परदेशातही आहेत. ‘जंटलमन मॅगझीन’ने भोगले यांचा ’50 men you want to know better’ या यादीत समावेश केला होता. तर ‘आऊटलूक मॅगझीन’ने त्यांचा समावेश ‘एखाद्या प्रोफेशनकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला लावणारी आठ व्यक्तीमत्व’ या यादीत केला होता.

२०१० साली पिनस्ट्रोमने तयार केलेल्या खेळांसंदर्भातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये हर्षा भोगले हे ३५ व्या क्रमांकावर होते. तर सोशल मिडियावर प्रभावी असणाऱ्या व्यक्तींच्या यादीतही ते ३५ व्या क्रमांकावर होते. २०१० साली ‘द हिंदुस्तान टाइम्स’ने हर्षा भोगले यांना ‘द ग्रेटेस्ट आयकॉन ऑफ क्रिकेट कॉमेंन्ट्री’ हा पुरस्कार देऊन गौरवले होते. (Facts About Harsha Bhogle)

१९९२ साली त्यांचा ‘रेडिओवरील सर्वात मादक’ आवाज असणारे व्यक्ती म्हणून सन्मान करण्यात आला होता. १९९९ साली एका वेबसाईटने जगभरातील क्रिकेट चाहत्यांकडून उत्तर मिळवत एक जनमत पोल तयार केला. यात पोलमध्ये हर्षा हे जगातील पहिल्या क्रमांकाचे समालोचक असल्याचे मत लोकांनी दिले होते.

ऑस्ट्रेलियामध्ये २००३-०४ साली झालेल्या ऑनलाइन सर्वेक्षणामध्ये हर्षा हे ‘रेडिओ तसेच टिव्हीवरील सर्वोत्तम समालोचक’ ठरले होते. ‘क्रिकइन्फो’ने घेतलेल्या एका सर्वेक्षणामध्ये ‘सर्वात आवडते समालोचक’ म्हणून लोकांनी हर्षा यांची निवड केली होती. सोबतच हर्षा हे ‘आवडता समालोचक’, ‘सर्वात निरपेक्ष’ आणि ‘सर्वाधिक माहिती देणारे’ कमेंटेटर असल्याचे सांगितले होते. (Facts About Harsha Bhogle)

======

हे देखील वाचा : मानसिक आणि फिजिकल ब्रेकची का गरज भासते? जाणून घ्या फायदे

======

हर्षा यांच्या नावाने ‘हर्षा की खोज’ हा कार्यक्रमही सुरु करण्यात आला होता. भारतातील समालोचन क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला होता. हर्षा भोगले यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. यामध्ये त्यांच्या स्वत:च्या तसेच अझरुद्दीनच्या आत्मरित्राचाही समावेश आहे. ‘व्हाइस ऑफ क्रिकेट’ असे त्यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे. खेळ विश्वातील आर्थिक बाजू समजावून सांगणारे पुस्तक हर्षा यांनी ‘द विनिंग वे’ नावाने प्रकाशित केले आहे.

हर्षा यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल सांगायचे झाला तर त्यांनी अनिता यांच्याशी विवाह केला आहे. हर्षा आणि अनिता यांना चिन्मय आणि सतचित ही दोन मुले असून ते संपूर्ण आता कुटुंब मुंबईमध्ये वास्तव्यास आहे. हर्षा आणि त्यांची पत्नी अनिता ‘प्रोरिसर्च’ नावाची कंपनी चालवतात. ही कंपनी क्रिडा क्षेत्रातील महितीच्या देवाण घेवाणीसंदर्भातील कामे करते. (Facts About Harsha Bhogle)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.