यंदा गणेशोत्सव १९ सप्टेंबरला साजरा केला जाणार आहे. खरंतर याचा शुभ मुहूर्त १८ सप्टेंबरच्या दुपार पासून सुरु होणार आहे. गणपतीला विघ्नहर्ता, बाप्पा किंवा गणपती अशा विविध नावाने ओळखले जाते. जेव्हा गणेशोत्सव साजरा केला जातो तेव्हा गणपतीच्या मंदिरात भाविकांची फार गर्दी होते. मंदिरात भाविक पूजेसाठी येतात. अशातच आपण आज देशातील गणपतीच्या काही अनोख्या गणपती मंदिरांबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांचा इतिहास आणि कथा सुद्धा अनोख्या आहेत. (Unique ganesh idol)
त्रिनेत्र गणपती, राजस्थान
हे मंदिर राजस्थान मधील चर्चित टुरिस्ट डेस्टिनेशन रणथंबोर नॅशनल पार्कजवळ आहे. या मंदिराची एक खासियत आहे. येथे दर्शनासाठी येणारे लोक गणपतीला चिठ्ठी लिहितात. जेव्हा भाविकांची इच्छा पूर्ण होते तेव्हा येथे येऊन ते पूजा करतात. मंदिराचा इतिहास ८०० वर्ष जुना आहे. या गणपतीचे मंदिर पिंक सिटी जयपूर पासून काही किमीवर आहे. दिल्लीहून तुम्ही कारने येथे जाऊ शकता. तर ट्रेनच्या माध्यमातून ही तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकता.
गढ गणेश मंदिर, जयपूर
या मंदिरातील गणपतीची मुर्ती एका व्यक्तीच्या रुपात आहे. राजस्थान मधील जयपूरच्या पर्वतरांगावर मंदिर आहे. या मंदिरात सोंडेचा गणपती नाही. असे मानले जाते की, या मंदिराची स्थापना राजस्थान मधील राजा सवाई जयसिंह द्वितीय याने केली होती. दिल्लीतील सराय रोहिल्ला स्टेशन,नवी दिल्ली किंवा जुनी दिल्लीहून जयपूरसाठी ट्रेन मिळू शकते. जयपुर वरुन काही साधन सवाई माधोपुरसाठी जातात.
कनिपकम गणेश मंदिर, आंध्र प्रदेश
येथील बाप्पाची मुर्ती पाण्यात आहे.यामुळे येथील गणपतीली पाण्याची देवता म्हणून पूजा करतात. असे सुद्धा पाहिले आहे की, येथील गणपतीची मुर्ती प्रत्येक वर्षी वाढली जाते. या मंदिराची स्थापना ११ व्या शतकात केली होती. (Unique ganesh idol)
हेही वाचा- देशातील सर्वाधिक महागडी गणपतीची मुर्ती
चिंतामणि गणेश मंदिर, इंदौर
या मंदिराचा इतिहास ३०० वर्ष जुना आहे. हे देशातील एकमेव मंदिर आहे ज्याच्या गाभाऱ्यात दोन गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त या मंदिराची एक अनोखी प्रथा सुद्धा आहे. भाविक असे मानतात की, येथे हळदं अपर्ण केली तर इच्छा पूर्ण होते. ही परंपरा फार जुनी आहे. या मंदिरात गणपतीव्यतिरिक्त हनुमान, राम-सीता, लक्ष्मण याची सुद्धा मुर्ती आहे.