Union Budget Known Facts: देशाचा अर्थसंकल्प येत्या १ फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. याची तयारी ही जवळजवळ पूर्ण झाली आहे. अर्थसंकल्पासंबंधित कागदपत्रांची छपाई सुरु होण्यासह अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत नुकतीच हलवा सेरेमनी ही झाली. अशातच आता देशाचा अर्थसंकल्प २०२३-२४ साठी कोणत्या विभागासाठी काय तरतूद देणार, करदात्यांना दिलासा मिळणार का अशा विविध गोष्टींकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तत्पूर्वी तुम्हाला अर्थसंकल्पाचा आतापर्यंतचा कसा होता प्रवास याच बद्दल आपण पाहणार आहोत. त्या संदर्भातील अशा काही खास गोष्टी ज्याबद्दल प्रत्येकाला माहिती असणे ही गरजेचे आहे.
‘बजेट’ शब्दाची निर्मिती
अर्थसंकल्प म्हणजेच बजेटच्या शब्दाची निर्मिती फ्रेंच भाषेतील लॅटिन शब्द बुल्गाच्या माध्यमातून झाली होती. ज्याचा अर्थ चामड्याची बॅग. बुल्गामधून फ्रांसीसी शब्द बोऊगेटची निर्मिती झाली. त्यानंतर इंग्रजी शब्द बोगेट हा अस्तित्वात आला आणि याच बोगेटच्या शब्दामुळे बजेट हा शब्द निर्माण झाला. त्यामुळेच यापूर्वी अर्थसंकल्प हा चामड्याच्या बॅगमधून आणला जायचा.
ब्रिटिश सरकारच्या काळात सादर झाला पहिला अर्थसंकल्प
सामान्य अर्थसंकल्प, सरकारकडून दिले जाणारा वर्षभराठीच्या देशाचा खर्च आणि उत्पन्नाचा लेखाजोखा असतो. तो सादर करण्याची सुरुवात ब्रिटेन द्वारे करण्यात आली होती. ब्रिटिश काळात पहिल्यांदाच भारतात ७ एप्रिल १८६० रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. हा अर्थसंकल्प ब्रिटिश सरकारमधील अर्थमंत्री जेम्स विल्सन यांनी सादर केला होता.
स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प
स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प हा कधी सादर केला असेल असा प्रश्न सर्वांनाच पडतो. अशातच देशाचे पहिले अर्थमंत्री आर के षण्मुखम चेट्टी यांनी २६ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला होता. तर चेट्टी यांचा १८९२ रोजी झाला होता. ते पेशाने वकील, राजकीय नेते आणि अर्थशास्रज्ञ होते.(Union Budget Known Facts)
तीन पंतप्रधानांनी सादर केला होता अर्थसंकल्प
देशाचा अर्थसंकल्प हा नेहमीच अर्थमंत्र्यांकडून सादर केला जातो. परंतु भारताच्या इतिहासात तीन वेळा देशाच्या पंतप्रधानांनी तो सादर केला होता. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी पहिल्यांदा १३ फेब्रुवारी १९५८ रोजी अर्थिक विभाग सांभाळला आणि अर्थसंकल्प सादर केला होता. या व्यतिरिक्त इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे सुद्धा जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी अर्थसंकल्प सादर केला होता.
‘या’ अर्थमंत्र्यांना सादर करता आला नाही अर्थसंकल्प
केसी नियोगी भारताचे असे ऐकमेव अर्थमंत्री होते की, ज्यांना त्या पदावर असताना ही एक ही अर्थसंकल्प सादर करता आला नाही. खरंतर ते ३५ दिवसांपर्यंत १९४८ रोजी अर्थमंत्री होते. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या स्थापनेनंतर पहिला अर्थसंकल्प २८ फेब्रुवारी
१९५० रोजी जान मथाई यांच्या समोर सादर केला होता.
११ वाजताच का अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात होते?
अर्थसंकल्प नेहमीच सकाळी ११ वाजता मांडण्यास सुरुवात केली जाते. दरम्यान, ही वेळ आधी पासूनच ठरवण्यात आलेली नव्हती. यापूर्वी ब्रिटिश काळात अर्थसंकल्प हा संध्याकाळी ५ वाजता सादर केला जायचा. कारण रात्रभर अर्थसंकल्पावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आराम मिळेल. १९५५ पर्यंत अर्थसंकल्प केवळ इंग्रजीत प्रकाशित केला जायचा. परंतु १९५५-५६ पासून सरकारने हिंदीत प्रकाशित करण्यास सुरुवात केली होती.
अर्थसंकल्पात हलवा सेरेमनीची परंपरा
हलवा सेरेमनी साजरी करण्यामागे कारण असे की, प्रत्येक शुभ काम करण्यापूर्वी काहीतरी गोड खावे. त्यामुळेच अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी हलवा सेरेमनीचे आयोजन केले जाते. यावेळी अर्थसंकल्पासंदर्भातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हलव्याचे वाटप अर्थमंत्र्यांच्या हस्ते केले जाते.
हे देखील वाचा- अर्थसंकल्प देशासाठी का महत्वाचा असतो? कोणती टीम तयार करते? अशा काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
चामड्याची लाल बॅग
ब्रिटिश काळात जेव्हा अर्थ मंत्री संसदेत सरकारचा खर्च आणि उत्पन्नाची माहिती देण्यासाठी अर्थसंकल्प हा चाड्याच्या लाल रंगाच्या एका बॅगेतून आणायचे. याच्या नावाशी जोडल्या गेलेल्या तथ्यांमुळे असे केले जायचे आणि ही परंपरा पुढे ही सुरु राहिली. परंतु भाजप सरकारने लाल बॅगची परंपरा बंद केली. अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी २०१९ मध्ये चामड्याच्या ब्रीफकेस ऐवजी लाल रंगाच्या कापडात गुंडाळून ती कागदपत्र आणण्याची प्रथा सुरु केली.
अर्थसंकल्प सादर करणाऱ्या महिला
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या स्वतंत्र भारताचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला होत्या. त्यांनी पंतप्रधानाच्या आधारावर अर्थिक विभाग ही सांभाळला आणि अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर ५ जुलै २०१९ रोजी निर्मला सीतारमण यांच्याकडून देशाचा अर्थसंकल्प सादर केला गेला. तर निर्मला सीतारमण यांच्या आधी अशी एकही महिला नव्हती ती पूर्णपणे अर्थमंत्र्यांच्या पदावर कार्यरत होती.