भारतीय संविधानाच्या कलम ११२ अंतर्गत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सरकारला संसेदत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणे आवश्यक असते. केंद्रीय अर्थसंकल्प हा आर्थिक वर्षात होणाऱ्या उत्पन्नासह खर्चा संबंधित असतो. प्रत्येक आर्थिक वर्षाची सुरुवात १ एप्रिलला होत ते पुढील वर्ष ३१ मार्च पर्यंत समाप्त होते. वर्ष २०२३-२४ साठी सामान्य अर्थसंकल्प म्हणजेच युनियन बजेट हे अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारीला संसदेत सादर करतात. (Union Budget 2023 Updates)
३१ जानेवारी पासून सुरु झाले संसदेचे बजट सत्र
संसदेच्या अर्थसंकल्पाचे सत्र ३१ जानेवारी पासून सुरु झाले. हे सत्र एप्रिल महिन्यापर्यंत असते. सत्राची सुरुवात लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त सत्राने होते. त्याआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन्ही सदनांना संबोधित केले.
अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वांना काही ना काही अपेक्षा असतात. अशातच १ फेब्रुवारीला संसदेत निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडण्यास सकाळी ११ वाजल्यापासून सुरुवात केली. त्यामध्ये काही मोठ्या घोषणा ही केल्या. त्याच दरम्यान त्यांनी ९ वर्षात भारतीय अर्थव्यवस्था आकाराने १० व्या स्थानावरुन ५ व्या स्थानावर पोहचल्याची माहिती दिली. त्याचसोबत अर्थसंकल्पात घोषणा केली गेली की, इलेक्ट्रिक वाहन, ऑटोमोबाईल, खेळणी आणि स्वदेशी मोबाईल स्वस्त होणार आहेत. तर चिमणी, काही स्मार्टफोन्स आणि कॅमेऱ्याची लेंस, सिगरेट, सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या किंमतीत वाढ होणार आहे.
दरम्यान, पुढील वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारसाठ हा अर्थसंकल्प फार महत्वाचा मानला जात आहे. सार्वत्रिक निवडणूकीपूर्वी मोदी सरकारचे हे अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प असण्यासह लोकांना आणि कॉर्पोरेट सेक्टरा काही अपेक्षा आहेत. अशातच तुम्ही यंदाचा पेपरलेस अर्थसंकल्प तुमच्या स्मार्टफोनवर एका क्लिकवर वाचू शकता. त्यासाठी पुढील काही स्टेप्स फॉलो करा.(Union Budget 2023 Updates)
हे देखील वाचा- आर्थिक सर्व्हे म्हणजे काय? अर्थसंकल्पापूर्वी संसदेत केला जातो सादर
मोबाईलवर केंद्रीय बजेट अशा पद्धतीने वाचा
-१ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या स्पीचनंतर, बजेट डॉक्युमेंट्स Union Budget Mobile App वर उपलब्ध होतात.
-अॅप तुम्हाला Android Play Store आणि Apple च्या अॅप स्टोरवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
-अॅपच्या नॅशनल इंफॉरेमेटिक सेंटर NIC ने डिझाइन आणि डेवलप केले होते आणि ते अर्थ मंत्रालयाअंतर्गत आर्थिक प्रकरणांमधील डिपार्टमेंट द्वारे मॅनेज केले जाते.
-युजर अॅपवर दिल्या गेलेल्या माहितीनुसार तुम्ही आरामात वाचू शकता. कारण विविध सेक्शनसाठीची माहिती तुम्हाला पीडीएफ फॉर्मेट मध्ये सुद्धा उपलब्ध असते.
-तुम्ही हा अर्थसंकल्प हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत वाचता येणार आहे.