रशिया आणि युक्रेनच्या (Ukraine) युद्धाला वर्ष उलटून गेलं आहे. मात्र कोणताही देश माघार घेत नाही. त्यात युक्रेनची बाजू कमकूवत होत असतांना युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं भारताकडूनही मदतीची अपेक्षा केली होती. हा प्रश्न भारतीय परराष्ट्र खात्यानं अत्यंत सामोपचारानं सोडवला होता. मात्र आता त्याच युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं थेट तमाम भारतीयांच्या मनात मानाचं आणि श्रद्धेचं स्थान असलेल्या देवी कालीच्या रुपाची खिल्ली उडवणारा फोटो शेअर केला होता. एका देशानं दुस-या देशातील धार्मिक भावनांची खिल्ली उडवणारे चित्र सोशल मिडीयावर शेअर करणे हे अत्यंत गंभीर आहे. त्यात हे कोणा व्यक्तीचे काम नसून खुद्द युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयातर्फे असे छायाचित्र जाहीर झाल्यावर त्यावर जगभरातील भारतीयांनी टीका केली. 30 एप्रिल रोजी युक्रेनच्या (Ukraine) संरक्षण मंत्रालयानं देवी कालिच्या या फोटोला धुराच्या फोटोमध्ये दाखवले होते. जगभरातून युक्रेनवर टीका सुरु झाल्यानं हे चित्र मागे घेण्यात आले आहे. आता याबाबत भारत सरकारनं युक्रेनला फटकारलं असून युक्रेनच्या परराष्ट्र व्यवहार उपमंत्र्यांनी जाहीर माफी मागितली आहे. मात्र या सर्व घटनेमुळे युक्रेनची मानसिकता काय आहे हे स्पष्ट झाले आहे. आणि यापुढे युक्रेनला (Ukraine) भारतीयांनी कुठलीही मदत करु नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनने भारतीयांच्या धार्मिक भावना दुखावणारे कृत्य केले आहे. आई कालीचा फोटो अत्यंत चुकीच्या पद्धतीनं सोशल मिडियावर शेअर करण्यात आला. यावर भारतीय सोशल मीडिया वापरकर्त्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने हे ट्विट हटवले. हा फोटो 30 एप्रिल रोजी पोस्ट केला होता. त्यावर झालेल्या टिकेनं तो थोड्यावेळात डिलीटही करण्यात आला. मात्र या सर्वात हा फोटो अनेकांना शेअर करत थेट युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाकडे जाब मागितला. हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि एकच गदारोळ उठला. शेवटी युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री एमीने झापरोवा यांनी माँ कालीचा अश्लील फोटो शेअर केल्याबद्दल खेद व्यक्त केला. कला कार्याच्या नावाखाली युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या देवी कालीचे अशोभनीय चित्र शेअर केले. याबद्दल झालेल्या टिकेनंतर युक्रेनच्या (Ukraine) परराष्ट्र व्यवहार उपमंत्री एमिने झापारोवा यांनी युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर आई कालीचे विकृत चित्र पोस्ट केल्याबद्दल ट्विट करून खेद व्यक्त केला आहे. झापरोवा म्हणाल्या की, ‘युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने ट्विटरवर हिंदू देवी कालीचे विकृत चित्रण केल्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. युक्रेन (Ukraine) आणि तेथील लोक भारतीय संस्कृतीचा आदर करतात आणि भारताच्या समर्थनाची प्रशंसा करतात. ते चित्र आधीच हटवण्यात आले आहे. यासाठी भारतीयांच्या भावना दुखवल्याबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे.
मात्र हे प्रकरण एका माफीवर शांत होणार नाही. कारण या फोटोत अनेक अर्थ दडल्याचे सोशल मिडियात झालेल्या टिकेवरुन स्पष्ट होत आहे. कारण युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने ‘वर्क ऑफ आर्ट’ या कॅप्शनसह हा फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये हिंदू देवी कालीला विचित्र पद्धतीने दाखवण्यात आले होते. हा फोटो हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मनरोच्या प्रसिद्ध चित्रासारखा होता. धुराच्या वरती देवी कालीची प्रतिमा दर्शविली आहे. चित्रात माता कालीच्या गळ्यात कवटीची माळ आहे. युक्रेनवर (Ukraine) झालेल्या हल्ल्यातून उठणाऱ्या धुराच्या लोटावर हिंदू देवी कालीचे चित्र होते. या चित्रात देवी काली हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मनरोसारखा स्कर्ट घातलेला दाखवण्यात आला आहे. हा स्कर्ट धुराचा बनवला गेल्याचे दाखवण्यात आले आहे. अशाप्रकारे देवी कालीच्या छायाचित्राची विटंबना केल्याबद्दल युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयावर अनेकांकडून टीका करण्यात येत आहे.
========
हे देखील वाचा : वैज्ञानिकांना पृथ्वीवर कोठे आढळला ९०० फूट खोल रहस्यमयी ब्लू होल?
========
प्रसारण आणि माहिती मंत्रालयाच्या वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनीही युक्रेनला खडे बोल सुनावले आहेत, ‘अलीकडेच युक्रेनचे उप परराष्ट्र मंत्री दिल्लीत होते आणि भारताकडून समर्थन मागत होते. आता युक्रेन सरकारने एका प्रचार पोस्टरमध्ये भारतीय देवी मां काली दाखवली आहे. जगभरातील हिंदूंच्या भावनांवर हा हल्ला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. भारतातील संतप्त ट्विटर वापरकर्त्यांनी सोशल प्लॅटफॉर्मचे सीईओ इलॉन मस्क आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना टॅग केले आणि त्यांना या प्रकरणावर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या ट्विटला उत्तर देताना एका युजरने म्हटले आहे की, ‘तुम्हा लोकांना भारताकडून कोणतेही समर्थन मिळत नसल्याने निराशेपोटी असले कृत्य केले आहे. हे अत्यंत लज्जास्पद कृत्य असल्याचे अनेक भारतीयांनी म्हटले आहे. युक्रेननं (Ukraine) यासर्वांवर माफी मागितली असली तरी, मात्र, माता कालीला चुकीच्या पद्धतीने दाखवल्याबद्दल आक्षेप घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. साधारण 2008 मध्ये अमेरिकन पॉप स्टार हेडी क्लम हिने हॅलोवीन पार्टीत भारतामध्ये पुजल्या जाणार्या माता काली या देवीची वेशभूषा केली होती. त्यांचे हे रूप अनेक वादात राहिले आणि त्यांच्यावर हिंदूंचा अपमान केल्याचा आरोप झाला होता. तेव्हा फक्त टीका करण्यात आली होती. पण आता या सर्वात भारतीय परराष्ट्र खात्यानं गंभीर दखल घेऊन युक्रेनला चांगलीच समज द्यावी अशी मागणी करण्यात येते आहे.
सई बने