उज्जैन मधील बाबा महाकाल यांच्या दर्शनासाठी देशातील बड्या मंडळी ते राजकीय पदांवरील मंत्री, मुख्यमंत्री, राष्ट्रपती येतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का, उज्जैन मधील बाबा महाकाल यांच्या दर्शनानंतर कोणताही मोठा मंत्री येथे रात्री थांबत नाही. असे मानले जाते की, जो कोणीही नेता रात्रीच्या वेळेस या ठिकाणी राहतो त्याची सत्तेत पुन्हा वापसी होत नाही. त्यामुळे प्रत्येक मंत्री मुख्यमंत्री बाबा महाकाल यांच्या दरबारात रात्र घालवण्यास घाबरतात. तर जाणून घेऊयात यामागील नेमकं कारण काय आहे? (Ujjain Mahakal)
जाणून घ्या काय आहे मान्यता?
बाबा महाकाल यांची नगरी उज्जैन मध्ये ही मान्यता फार दीर्घ काळापासून सुरु आहे. जो कोणीही भक्त बाबा महाकाल यांच्या दरबाराता रात्री थांबतो. तो सत्तेत पुन्हा येत नाही. खरंतर बाबा महाकाल हेच येथील राजाधिराज असल्याचे मानले जातात. त्यामुळे अशी मान्यता आहे की, बाबा महाकाल यांच्या दरबारात एकत्रित दोन राजा थांबू शकत नाहीत. जर कोणताही मंत्री किंवा मुख्यमंत्री चुकून जरी येथे रात्री थांबतो तर त्याचे सत्तेतील पुन्हा येण्याचे मार्ग मुश्किल होतात.
कोणा-कोणासोबत असे घडलंय
परंपरागत चाललत आलेल्या मान्यतेनुसार जो कोणाताही नेता किंवा मंत्री बाबा महाकाल यांच्या दरबारात रात्रीच्या वेळी थांबतो, त्याची खुर्ची निघून जाते. असे म्हटले जाते की, भारतातील चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई एक दिवस रात्री उज्जैन मध्ये थांबले होते आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचे सरकार कोसळले.
तर कर्नाटकातील मुख्यमंत्री येदियुरप्पा सुद्धा उज्जैन मध्ये रात्रीच्या वेळेस थांबले होते, त्यानंतर २० दिवसातच त्यांना आपले पद सोडावे लागले होते.
कधीपासून ही मान्यता आहे
अवंतिका नगरी उज्जैनचा राजा विक्रमादित्यच्या काळात राज्याची राजधानी होती. मंदिरासंदर्भातील रहस्य आणि सिंहासन बत्तीसीच्या मते, राजाच्या जेवणाच्या वेळेपासूनच कोणताही राजा उज्जैनमध्ये रात्रीच्या वेळी करायचा नाही. (Ujjain Mahakal)
मंदिराचा इतिहास
पौराणिक मान्यतेनुसार, उज्जैन मध्ये दूषक नावाचा राक्षस खुप धुडगूस घालत होता. लोक त्याला त्रस्त झाली होती. त्यामुळेच शंकराकडे त्यांनी त्यांच्या संरक्षणासाठी प्रार्थना केली. त्यानंतर शंकराने महाकालच्या रुपात प्रकट होत दूषक नावाच्या दैत्याचा वध केला. दैत्याचा वध केल्यानंतर लोकांनी बाबा महाकाल यांना उज्जैन मध्ये राहण्यास सांगितले. त्यानंतर भगवान शंकरांनी सुद्धा ही गोष्ट ऐकून घेत तेथे ज्योतिर्लिंगाच्या रुपात विराजमान झाले.
हे देखील वाचा- भारतातील ‘या’ मंदिरांमध्ये गैर हिंदूना परवानगी नाही
कशी झाली मंदिराची निर्मिती
उज्जैनचे बाबा महाकाल मंदिराची निर्मिती रानाजिराव शिंदे यांनी १७३६ मध्ये केली होती. त्यानंतर श्रीनाथ महाराज महादजी शिंदे आणि महाराणी बायजाबाई शिंदे यांनी या मंदिराची वेळोवेळी डागडुजी केली आणि काही बदल केले.