Home » UIDAI कडून आधार कार्ड नागरिकांसाठी अलर्ट जाहीर, फसवणूकीबद्दल दिला ‘हा’ सल्ला

UIDAI कडून आधार कार्ड नागरिकांसाठी अलर्ट जाहीर, फसवणूकीबद्दल दिला ‘हा’ सल्ला

by Team Gajawaja
0 comment
Aadhar Card Update
Share

आधार कार्ड हे देशातील सर्व नागरिकांसाठी सर्वाधिक महत्वपूर्ण कागदपत्रांपैकी एक आहे. बँकेत खाते सुरु करणे किंवा एखाद्या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड द्यावे लागते. त्याचसोबत आधार कार्ड फक्त प्रौढांचेच नव्हे तर लहान मुलांचे सुद्धा एक महत्वपूर्ण कागदपत्र झाले आहे. आधार कार्डची वाढती गरज पाहता त्यासोबत होणारे आर्थिक घोटाळे सुद्धा दिवसागणिक वाढू लागले आहेत. आधार कार्ड देणारी शासकीय एजेंसी युआयडीएआयने लोकांना आधार कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणूकीबद्दल सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. (UIDAI Alert)

जर तुम्ही सुद्धा फसवणूकीसाठी बळी पडला असाल तर युआयडीएआयच्या द्वारे दिली जाणारी पुढील माहिती जरुर पहाच. त्याचसोबत ती फॉलो ही करा. जेणेकरुन भविष्यात तु्म्ही कोणत्याही फसवणूकीला बळी पडणार नाही. लक्षात असू द्या आधार कार्ड संबंधित माहिती कोणत्याही अज्ञात व्यक्तीला देऊ नका. ही माहिती तुम्ही तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवा.

UIDAI Alert
UIDAI Alert

युआयडीएआयने दिला हा सल्ला
युआयडीएआयने लोकांना सल्ला दिला आहे की, ई-आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी इंटरनेट कॅफे, कियोस्क किंवा अन्य सार्वजनिक कंप्युटरचा वापर करु नका. जर ई-आधार डाउनलोज करण्यासाठी तुमच्याकडे कोणताही दुसरा ऑप्शन नसेल तर ज्या कंप्युटरमध्ये तुम्ही ई-आधार कार्ड डाउनलोड केले आहे ती फाइल लगेच डिलिट करा. येथे तुम्हाला लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी की, जर ई-आधार कॉपी डिलिट केल्यानंतर ही कंप्युटरमधील रिसाइकल बिन मधून सुद्धा ती डिलिट करण्यास विसरु नका.(UIDAI Alert)

हे देखील वाचा- चुकीच्या बँक खात्यात पैसे ट्रांन्सफर झाल्यास प्रथम ‘हे’ काम करा

आधार कार्ड अशा पद्धतीने करा सुरक्षित
देशभरात वाढत्या फसवणूकीच्या प्रकारांमुळे लोकांच्या मनात आधार कार्डच्या संदर्भात विविध प्रश्न उपस्थितीत राहत आहेत. लोकांना जाणून घ्यायचे आहे की, १२ अंकांच्या आधार क्रमाकांच्या माध्यमातून बँकेचे खाते कशा प्रकारे हॅक केले जाते? यावर युआयडीएआयने उत्तर देत म्हटले की, जर एखाद्या व्यक्तीला तुमच्या आधार कार्डचा १२ अंकी क्रमांक मिळल्यास तो फक्त त्याच्या माध्यमातून खाते हॅक करु शकत नाही. या व्यतिरिक्त ही आधार कार्ड अधिक सुरक्षित करायचे आहे तर तुम्ही मास्क्ड आधारचा सुद्धा वापर करु शकता. मास्क आधार कार्डमध्ये १२ अंकांच्या आधार क्रमांकामधील सुरुवातीचे ८ क्रमांक लपवले जातात आणि अखेरचे ४ अंकच दिसतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.