Home » उद्धव ठाकरे मातोश्री सोडून जाणार होते ?

उद्धव ठाकरे मातोश्री सोडून जाणार होते ?

by Team Gajawaja
0 comment
Thackery VS Rane
Share

उद्धव ठाकरे मातोश्री सोडून जाणार होते? ते ही बाळासाहेब असताना? असा दावा आम्ही नाही तर नारायण राणे यांनी केला होता. ते ही आपल्या आत्मचरित्रात. पण असं काय झालं की उद्धव ठाकरेंनी मातोश्री सोडण्याची धमकी दिली होती? जाणून घेऊयात.तेव्हाच्या शिवसेनेत नारायण राणे बडे नेते होते. मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागल्यानंतर नारायण राणेच मुख्यमंत्री झाले. पुढे २००५ साली राणे यांची हकालपट्टी झाली. राणें काँग्रेसमध्ये सामील झाले आणि मंत्री झाले. शिवसेनेत असताना उद्धव ठाकरे आणि आपली चांगली मैत्री होती असा दावा नारायण राणे आपले आत्मचरित्र No Holds Barred या आत्मचरित्रात केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपण सहकुटुंब बाहेर जेवायला जात अशी आठवणही राणे सांगतात. (Thackery VS Rane)

राणे आपल्या आत्मचरित्रातील नो लाँगर शिवसैनिक या प्रकरणात म्हणतात की उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात कदाचित माझ्यामुळे वाद होत होते. म्हणून मी साहेबांना पत्र लिहिलं की माझ्यामुळे तुमच्यात जर वाद होत असतील तर मी पक्ष आणि राजकारण सोडतो. मी घरी बसायला तयार आहे, पण माझ्यामुळे वाद नको असे राणेंनी पत्रात म्हटलं होतं. काही झालं तरी बाळासाहेब माझ्यासाठी दैवत होते असे राणेंनी म्हटलं. बाळासाहेबांना पत्र लिहून राणे १५ दिवसांसाठी परदेशात गेले होते. पण परदेशातून राणे जेव्हा परत आले तेव्हा सगळीकडे एकच बातमी होती. ती म्हणजे राणे शिवसेना सोडणार. राणे यांनी जेव्हा चौकशी केली की ही बातमी कोणी पेरली. तेव्हा त्यांना मनोहर जोशी, मिलिंद नार्वेकर आणि अनिल देसाई यांची नावं कळाली.

त्यानंतर राणे यांनी तीन राजीनामे लिहिले. पहिला राजीनामा विरोधीपक्षनेते पदाचा, दुसरा राजीनामा आमदाराकीचा आणि तिसरा राजीनामा होता पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा. हे राजीनामे राणे यांनी बाळासाहेबांकडे पाठवले. तेवा बाळासाहेबांनी राणेंना बोलावून घेतलं. हे राजीनामे मागे घ्यायला बाळासाहेबांनी सांगितलं पण राणे राजीनाम्यावर ठाम होते. बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना बोलावून घेतलं. राणे शिवसेनेतले महत्त्वाचे नेते आहेत, त्यांचा असा अपमान केलेला चालणार नाही, शिवसेनाला राणेंची गरज आहे असे बाळासाहेबांनी सांगितलं. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपला आणि राणेंचे कुठलेच भांडण नाही असे म्हटले. बाळासाहेबांनी मग राणेंना घरी जाऊन शांत झोपायला सांगितलं. (Thackery VS Rane)

======

हे देखील वाचा : अजित पवार – हताश की हुशार?

======

दुसऱ्यादिवशी बाळासाहेबांनी राणे यांना फोन केला आणि काय नारायण तुझा राग कमी झाला का अशी विचारण केली. पण राणे आपल्या राजीनाम्यावर ठाम होते. राणे म्हणतात की जेव्हा उद्धव ठाकरेंना कळालं की बाळासाहेबांनी मला फोन केला तेव्हा उद्धव ठाकरे तिथे तातडीने आले आणि त्यांनी बाळासाहेबांना सांगितलं की जर राणे पक्षात परत येणार असतील तर मी आणि रश्मी मातोश्री सोडून जाऊ. बाळासाहेबांच्या एका मुलाचे अपघाती निधन झाले होते. त्यात एक मुलगा घर सोडून जाणार म्हणून ते चिंतेत होते. आता राणे आणि उद्धव ठाकरे यांचं नातं सगळ्या महाराष्ट्राता माहित आहे. पण राणे यांनी केलेला दावा किती खरा किती खोटा हे राणेंनाच माहित किंवा उद्धव ठाकरेंनाच माहित. (Thackery VS Rane)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.