Home » अवघ्या १५ मिनिटांच्या प्रवासासाठी Uber ने मागितले तब्बल ३२ लाखांचे बिल

अवघ्या १५ मिनिटांच्या प्रवासासाठी Uber ने मागितले तब्बल ३२ लाखांचे बिल

by Team Gajawaja
0 comment
Uber Ride
Share

काही वर्षांपूर्वी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी पुरेशी प्रवासाची साधने उपलब्ध नव्हती. मात्र आता बदलत्या काळानुसार सर्वकाही बदलेले आहे. अशातच आता लोक एका अॅपच्या माध्यमातून काही मिनिटांमध्ये कॅबचे बुकिंग करु शकतात. या सुविधेमुळे त्यांना प्रवासाची साधन शोधण्यास अधिक कष्ट घ्यावे लागत नाहीत. मात्र काही गोष्टी अशा घडतात की, ज्या फारच विचित्र असतात. (Uber Ride)

तुम्ही प्रवास करण्यासाठी कॅब बुकिंग संदर्भातील अॅपबद्दलच्या विविध गोष्टी ऐकल्या असतील. परंतु ज्यावेळी अधिक मागणी असते तेव्हा ते लोक आपल्या दरात वाढ करतात. अशातच दारुच्या नशेत एका व्यक्तीने उबरच्या माध्यमातून कॅबची बुकिंग केली. जवळजवळ साडे सहा किमीच्या प्रवासानंतर जेव्हा त्याला ३२ लाखांचे बिल दिले गेले तेव्हा त्याला मोठा धक्काच बसला.

Uber Ride
Uber Ride

१५ मिनिटांच्या प्रवासासाठी तब्बल ३२ लाख रुपयांचे बिल
इंग्लंड मधील ग्रेट मॅनचेस्टर मध्ये राहणारा २२ वर्षीय ओलिवर कॅपलेन याच्यासोबत ही विचित्र घटना घडली आहे. तो आपल्या मित्रांसोबत जाऊन पार्टी करण्याच्या मूडमध्ये होता अशातच त्याने आपल्या लोकेशनच्या ६.४ किमी दूरवर एक ट्रिप बुक केली. त्याचे बिल ९२१ रुपये यायला पाहिजे होते. परंतु जेव्हा तो झोपून दुसऱ्या दिवशी उठला तेव्हा त्याला कळले की, उबरकडून त्याच्या खात्यातून ३२ लाख रुपये कापून घेण्याचा प्रयत्न केला गेला. डेली मेलच्या रिपोर्ट्सनुसार त्याची राइड फक्त १५ मिनिटांचीच होची. मात्र अखेर हे ३२ लाख रुपये नक्की कशाचे? (Uber Ride)

हे देखील वाचा- आता नोकरीसाठी युएईला जाणे होणार सोप्पे, व्हिजा पॉलिसीमध्ये बदल

छोटीसी चुक पण मोठा घोटाळा
ओलिवरच्या मते, तो रोज रात्री उबरच्या माध्यमातूनच घरी यायचा. त्यासाठी तो ९०० रुपयांच्या आसपास बिल भरायचा. हे बिल डेबिट कार्डच्या माध्यमातून दिले जायचे. जेव्हा त्याने कस्टमर केअरला ऐवढ्या ३२ लाखांच्या बिलासंदर्भात विचारले तेव्हा त्याला धक्का बसला. कारण त्याने त्याला ज्या ठिकाणी जायचे आहे तेथील ठिकाण हे ऑस्ट्रेलियातील Ashton-under-Lyne असे टाकले होते. जे तेथून १६ हजार किमी दूर होते. घोटाळा असा झाला की, ओलिवरच्या अकाउंटमध्ये ऐवढे पैसे नव्हते की, ३२ लाखांचे बिल कापले जाईल. अन्यथा समस्या उद्भवली असती. सध्या कंपनीकडून त्याचे बिल ठिक करण्याचे प्रकरण सुटले आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.