Home » UAN क्रमांक विसरला असाल तर ‘या’ पद्धतीने शोधून काढा

UAN क्रमांक विसरला असाल तर ‘या’ पद्धतीने शोधून काढा

by Team Gajawaja
0 comment
UAN Number
Share

जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचे पीएफ खाते असेल तर ही माहिती तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. युनिवर्सल अकाउंट क्रमांक म्हणजेच युएएन हा एका १२ अंकी विशेष क्रमांक असतो. हा क्रमांक एप्लॉई प्रोविडेंट फंड ऑर्गेनाइजेशनकडून दिला जातो. खास गोष्ट अशी की, एखाद्या नोकरी करणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात किती ही वेळा नोकऱ्या बदलल्या तरीही त्याचा युएएन क्रमांक हा एकच असणार आहे. तो मात्र कधीच बदलला जाणार नाही. युएएनच्या माध्यमातून पीएफ खात्यासंबंधित माहिती मिळते.(UAN Number)

जर तुम्ही तुमचा युएएन क्रमांक विसरला असाल तर घाबरु नका. कारण तो पुन्हा मिळवता येतो. यासठी काही सोप्प्या ट्रिक्सचा वापर करावा लागेल. त्यानुसार एसएमएस, मिस्ड कॉल अथवा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमचा युएएन क्रमांक शोधून काढू शकता.

UAN ऑनलाईन पद्धतीने कसा शोधावा
-epfo च्या अधिकृत संकेतस्थळाला प्रथम भेट द्या
-डाव्या बाजूला दिलेल्या Services सेक्शनवर क्लिक करा
-आता My Employees च्या ऑप्शनवर क्लिक करा
-एक नवी विंडो सुरु होईल. येथे स्क्रोल डाउन करा. त्यानंतर डाव्या बाजूला Services सेक्शनमध्येच Member UAN/Online Service वर क्लिक करा
-आता Important Links अंतर्गत Know Your PAN वर क्लिक करा
-आता पुन्हा एक विंडो सुरु होईल. येथे रजिस्टर्ड फोन क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल
-तुमच्याकडे एक ओटीपी येईल, तो द्या
-नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक अशी माहिती सुद्धा द्या
-आता तुम्हाला Show My UAN वर क्लिक करावे लागेल. तुमच्या स्क्रिनवर तुमचा युएएन क्रमांक दिसेल.

-मिस्ड कॉलच्या माध्यमातून
-ईपीएफ खातेधारकाला आपल्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून 01122901406 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल. ((UAN Number)
-मिस्ड कॉल दिल्यानंतर काही वेळातच तुम्हाला ईपीएफओ कडून एक मेसेज येईल. त्यात तुमचा युएएन क्रमांकासह अन्य माहिती सुद्धा असेल

हेही वाचा: एटीएम कार्डवर लिहिलेल्या Platinum किंवा Titanium चा अर्थ माहितेय का?

SMS च्या माध्यमातून सुद्धा शोधू शकता
-रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरुन EPFOHO UAN ENG असे लिहून 7738299899 या क्रमांकावर मेसेज पाठवावा
-हिंदीत माहिती हवी असेल तर EPFOHO UAN HIN असे लिहून पाठवा
-आता ईपीएफओ कडून तुम्हाला मेसेज येईल त्यात युएएन क्रमांकासह अन्य माहिती सुद्धा असेल


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.