आता संयुक्त अमीरात मध्ये जाऊन नोकरी करणे आता आधीपेक्षा अधिक सोप्पे झाले आहे. युएईने गेल्या महिन्यात आपल्या अॅडवान्स व्हिजा सिस्टिमची घोषणा केली होती. हे नवे नियम ३ ऑक्टोंबर पासून लागू केले जाणार आहे. नव्या व्हिजा नियमानुसार १० वर्षांची एक्सपेंडेड गोल्डन व्हिजा स्किम, स्किल्ड वर्कसाठी ५ वर्षासाठी ग्रीन रेजीडेंसी आणि नवी मल्टीपल एन्ट्री टुरिस्ट व्हिजा या गोष्टींच्या फायद्यांचा समावेश आहे. मल्टीपल एन्ट्री टुरिस्ट व्हिजासाठी कोणताही व्यक्ती ९० दिवसापर्यंत देशात राहू शकतो. (UAE Immigration Law)
संयुक्त अरब अमीरात यांच्याकडून लागू करण्यात आलेल्या नव्या इमीग्रेशन नियमांमुळे पर्यटकांसह त्या लोकांवर सुद्धा प्रभाव पडणार आहे जे काम करु इच्छितात किंवा संयुक्त अरब अमीरात मध्ये ज्यांना रहायचे आहे. युएईमध्ये कामाच्या शोधात बहुतांश लोक येतात. तर जाणून घेऊयात व्हिजा पॉलिसीसंदर्भातील काही महत्वाच्या गोष्टी.

-५ वर्षाच्या ग्रीन व्हिजाच्या माध्यमातून लोक युएईचे नागरिक किंवा कोणत्याही कंपनीच्या मदतीशिवाय राहू शकतात. हा व्हिजा अशा व्यक्तींना मिळणार आहे जे फ्रिलांन्सर, स्किल्ड वर्कर आणि गुंतवणूकदार आहेत.
-ग्रीन व्हिजा धारक आपल्या परिवारातील सदस्यांना युएईत राहण्यासाठी बोलावू शकतात.
-जर एखाद्या स्थितीत ग्रीन व्हिजा धारकाचे परमिट समाप्त झाले असेल तर त्याला सहा महिन्यांचा कालावधी दिला जातो.
-गोल्डन व्हिजाअंतर्गत १० वर्षापर्यंत एक्सपेंडेड रेजीडेंसी दिली जाते. त्यानुसार गुंतवणूकदार, उद्योगपती आणि असाधारण टॅलेंट असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा गोल्डन व्हिजा मिळू शकतो. (UAE Immigration Law)
-गोल्डन व्हिजा धारक परिवारातील सदस्य आणि मुलांना आपल्यासोबत राहण्यासाठी युएईमध्ये बोलावू शकतात.
-गोल्डन व्हिजा धारकाच्या परिवारातील सदस्यसुद्धा व्हिजा वैध असे पर्यंत धारकाच्या मृत्यूपर्यंत सयुक्त अमीरातमध्ये राहू शकतात.
-गोल्डन व्हिजा धारक आपल्या व्यवसायात १०० टक्के मालकी हक्काचा लाभ घेऊ शकतात.
-पर्यटन व्हिजासाठी आता व्हिजिटर्सला ६० दिवसांसाठी संयुक्त अमीरात मध्ये राहण्याची परवानगी मिळेल.
-वर्षाचा मल्टी एंट्रेस टुरिस्ट व्हिजाच्या माध्यमातून विजिटर्स युएईत सातत्याने ९० दिवसापर्यंत राहू शकतात.
-जॉब एक्सप्लोरेशन व्हिजा अंतर्गत प्रोफेशनल्स कोणत्याही होस्ट किंवा एम्लॉर युएईत जॉब शोधू शकतात.
हे देखील वाचा- दुबईत भारतापेक्षा स्वस्त का असते सोनं? जाणून घ्या अधिक
युएईमध्ये भारतीयांची संख्या
संयुक्त अमीरात मध्ये भारतीयांची खुप लोकसंख्या आहे. युएईच्या लोकसंख्येच्या ४० टक्क्यांहून अधिक भारतीय आहेत. असे सांगितले जाते की, संयुक्त अरब अमीरात मध्ये ३५ लाखच्या आसपास भारतीय राहतात. यामध्ये भारतीय पर्यटकांचा समावेश नाही आहे. प्रत्येक वर्षी लाखो भारतीय दुबईत फिरण्यासाठी येतात. जर पूर्ण युएईत परदेशी नागरिकांबद्दल बोलायचे झाल्यास तर येते ८० टक्के लोकसंख्या बाहेरची आहे.