संयुक्त अरब अमीरातने आपल्या देशात येणाऱ्या लोकांसाठी नियमात बदल केले आहेत तेथे सिंगल नाव असलेल्यांना आता प्रवेश दिला जाणार नाही. अमीरात द्वारे जाहीर करण्यात आलेल्या गाइडलाइन्सच्या आधारावर एअर इंडिया आणि एआय एक्सप्रेसकडून एक सल्ला दिला गेला आहे की, सिंगल नाव असलेल्या व्यक्तींना आता प्रवेश अमीरात मध्ये दिला जाणार नाही. हा नियम तत्काळ स्वरुपात लागू करण्यात आला आहे. (UAE Entry Rules)
एअर इंडिया आणि एयआर एक्सप्रेसने २१ नोव्हेंबरला युएईच्या प्रवासासाठी पासपोर्टवर दिसणाऱ्या नावाचे एक पत्र जारी केले आहे. यामध्ये असे म्हटले गेले आहे की, संयुक्त अरब अमीरातच्या नॅशनल अॅडवान्स इंन्फॉर्मेशन सेंटरनुसार युएईच्या प्रवासासाठी या मुख्य गाइडलाइन्स तत्काळ स्वरुपात लागू करण्यात आल्या आहेत. कोणत्याही पासपोर्टवर धारकाचेच नाव ज्यामध्ये आडनाव आणि शब्द नाही त्याला संयुक्त अमीरातमध्ये प्रवेश मिळणार नाही. त्याचसोबत त्या प्रवाशाला INAD असे मानले जाईल. त्यामुळे त्याला तेथूनच मागे परतावे लागेल.
INAD म्हणजे काय?
INAD, विमानन क्षेत्रासंदर्भातील असा एक शब्द आहे ज्याचा वापर त्या प्रवाशांसाठी केला जातो ज्यांना देशात प्रवेश करण्यासाठी परवानगी नाही. जेथून ते प्रवास करु इच्छितात. आयएनएडी प्रवाशांना एअरलाइन्सद्वारे त्यांच्या देशात जावे लागते.
या परिपत्रकात INAD प्रवाशांबद्दर उदाहरणाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे. एक प्रवासी ज्याचे नाव प्रवीण आहे आणि त्याचे कोणतेही आडनाव नाही. जर प्रवीण हे आडनाव आहे आणि त्याचे कोणतेही नाव नाही तर अशा प्रवाशाला वीजा जारी केला जाणार नाही. जर वीजा आधीच जारी केला गेला आहे तर त्याला इमिग्रेशनद्वारे INAD मध्ये सहभागी केले जाईल. (UAE Entry Rules)
हे देखील वाचा- हिजाब न घातल्याने इराण मध्ये अभिनेत्रीला पोलिसांनी सुनावली तुरुंगाची शिक्षा
कोणाला मानले जाणार नाही INAD
नव्या आदेशात कोणाला आयएनएडी मानले जाणार नाही हे सर्कुलरमध्ये म्हटले गेले आहे. जर प्रवीण कुमारच्या रुपात नाव दिले गेले आहे आणि त्याचे कोणतेही आडनाव नाही आहे. अशा प्रकारे आडवानाच्या रुपात प्रवीण कुमार आणि त्यांचे नाव नाही आणि प्रवीणच्या नावाचा उल्लेख नावाच्या रुपात आणि कुमारचा उल्लेख हा आडनावाच्या रुपात केला गेला असेल.
युएईचा हा नवा नियम केवळ प्रवासी वीजा, वीजा ऑन अराइवल, रोजगार किंवा अस्थायी वीजा असणाऱ्या प्रवाशांसाठी लागू असणार आहे, सध्याच्या युएई स्थानिक कार्ड धारकांना हा नियम लागू नसणार आहे.