Home » गाड्यांच्या टायरचा रंग हा काळाच का असतो?

गाड्यांच्या टायरचा रंग हा काळाच का असतो?

by Team Gajawaja
0 comment
Tyre color history
Share

तुम्ही कधी सायकल ते कार, ट्रक आणि विमान पाहिले असेल. मात्र या सर्वांमध्ये एक सर्वसमान्य गोष्ट अशी की, सर्व टायर्सचा रंग हा काळाच असतो. मात्र त्यांची साइज वेगवेगळी असली तरीही रंग सारखाच कसा असा प्रश्न आपल्याला कधी ना कधी तरी पडलाच असेल ना? किंवा टायर्सचा रंग हा दुसरा का नसतो? याच बद्दल आपण आज अधिक जाणून घेऊयात.(Tyre color history)

टायरचा इतिहास
तुम्ही कधी विचार केलाय का त्याचा रंग काळाच का आहे? टायरच्या इतिहासावर एक नजर टाकल्यास कळते की, त्याची १८०० पासून सुरु झालाय. टायर हा शब्द फ्रेंच शब्द टायरर पासून निर्माण झाला आहे. त्याचा अर्थ खेचणारा. हवा असणाऱ्या टायर्सच्या आधी टायर हे चामडे, लोखंड किंवा लाकडाचे असायचे.

गुडईयर यांनी बनवला सर्वात प्रथम रबरचा टायर
व्हिलराइट नावाच्या एका कारागिराने सर्वात प्रथम रबर टायरचा आविष्कार केला. १८०० मध्ये चार्ल्स मॅकेंतोषने अॅमेझॉन आणि दुसऱ्या ठिकाणांवरच्या वृक्षांमधून निघाणाऱ्या द्रव्यापासून रबर तयार केला. मात्र बदलत्या पर्यावरणांच्या स्थितीमुळे ताळमेळ जुळला नाही. तेव्हा चार्ल्स गुडईयरने वूलकॅनाइज्ड रबरचा १८३९ मध्ये आविष्कार केला. जो मजबूत आणि खेचता येणारा होता. त्याचा वापर सायकलमध्ये करण्यात आला होता.

Tyre color history
Tyre color history

परंतु टायरमध्ये होती समस्या
१८४५ मध्ये न्युमेटिक किंवा हवा भरणारे टायर तयार करण्यात आले. रॉबर्ट विलियम थॉमसनने याच्या आविष्काराला आपल्या नावाने पेटेंट केले. थॉमसन स्कॉटिस आविष्कारकर्ता होते. त्यांची चामड्यांच्या कवरमध्ये हवा भरण्यासाठी काही आकाराचे पातळ ट्युब तयार केले. ते असे होते की, टायरला जरी झटके दिले तरी त्याच्यावर काही परिणाम व्हायचा नाही. मात्र ते कधीच प्रोडक्शन मध्ये आले नाहीत, कारण त्यामध्ये काही समस्या होत्या.

प्रोडक्शन करण्यात आलेल्या पहिल्या टायरचा रंग सफेद होता
खुप कमी लोकांना माहिती आहे की, १२५ वर्षापूर्वी जेव्हा रबर टायरचे प्रोडक्शन करण्यात आले तेव्हा तो सफेद रंगाचा होता. ज्या रबरचा वापर टायर बनवण्यासाठी करण्यात आला होता ती दुधी रंगाचा होता. पण नंतर त्याचा रंग काळा कसा झाला? त्याचे उत्तर असे आहे की, हा टायर ज्या रबर आणि मटेरियल पासून बनवण्यात आला होता तो मजबूत नव्हता की, ऑटोमोबाईलच्या वजनाला झेपेल. त्याचसोबत रस्त्यांवर ही तो उत्तम चालणारा नव्हता.(Tyre color history)

कॉर्बन ब्लॅक मिसळल्याने त्याचा रंग बदलला
त्यासाठी त्यामध्ये काही मिसळण्याची गरज भासली जो त्याला अधिक मजबूत करेल आणि दीर्घकाळ टीकाण्यासाठी सुद्धा सक्षम बनवेल. तेव्हा या रबरमध्ये कॉर्बन ब्लॅक सारख्या मटेरियलचा वापर करण्यात आला. जेणेकरुन टायरचा रंग हा पूर्णपणे काळा झाला. रंग काळा जरुर झाला पण टायरची ताकद, क्षमता आणि दीर्घकाळ चालण्याचा मुद्दा उपस्थितीत राहू लागला होता.

हे देखील वाचा- Amul कंपनीची सुरुवात कशी झाली?

कशाप्रकारे कॉर्बन ब्लॅक फायदेशीर ठरला
कॉर्बन ब्लॅकच्या कारणास्तव रस्त्यांवर चालवताना जे घर्षण व्हायचे ते टायर पेलवू शकत होता. त्याचसोबत गरम झालेल्या रस्त्यांवर ही तो कधीच वितळला नाही. याच कारणामुळे ऑटोमोबाईलच्या प्रत्येक सेक्शनमध्ये त्याच टायरचा वापर करण्यात येऊ लागला. तर कॉर्बन ब्लॅक हा टायरची सुरक्षितताच नव्हे तर ओझोनच्या हानिकारक परिणाम ते युवी रेडिएशन पासून बचाव करण्यास मदत करतो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.