हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक घरात तुळशीचे रोप आपल्याला पाहायला मिळतेच मिळते. दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर तुळशी पूजन करण्याची आपल्याकडे खूपच मोठी, महत्त्वाची आणि जुनी परंपरा आहे. धार्मिकदृष्ट्या तुळशी तर खूपच पुज्यनीय आहे. एवढेच नाही तर केवळ तुळशीचे दर्शन घेणे देखील पाप नाशक ठरते. तुळशीची पूजा करणे देखील मोक्षदायक आहे असे सांगितले गेले आहे. विष्णू पूजेमध्ये तर तुळशीला प्रथम स्थान आहे. तुळशी वाचून केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते. तर तुळशीची मंजिरी सर्व देवांची प्रतिनिधी मानली आहे. तुळशी मध्ये अलौकिक औषधी गुणधर्म आहे. मानवी जीवनात तुळशीचे महत्व मोठे आहे कारण ती एकाचवेळी अनेक रोगांचे निर्मुलन करते. तुळशीचे ५ प्रकार आहेत. कृष्ण तुळस, कापूर तुळस, राम तुळस, सब्जा तुळस आणि वन तुळस. (Tulshi Types)
तुळशीमध्ये अँटी बेक्टेरिअल गुणधर्म असतात. सर्दी- पडसं पासून वाचण्यासाठी तुळस ही वर्षानुवर्षे वापरण्यात येते. तुळशीत अँटी बेक्टेरिअल आणि अँटिमायक्रोबियल गुण असतात ज्या मुळे तुळशी श्वासाच्या येणाऱ्या दुर्गंधाला दूर करण्यात साहाय्य करते. तुळस ही कार्ब्स आणि फॅट्स मेटॅबॉलिझम वाढवते जी आपल्या रक्तामधील साखरेची पातळी कमी करते. पचन संस्थेसाठी देखील तुळशी फायदेशीर आहे. तुळस ही ऍसिड रिफ्लेक्सला संतुलित करून आपल्या पचन संस्थेला सुधारते. तुळशी ही कर्करोग होण्याची शक्यता कमी करते. विशेषतः तोंडाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे. (Marathi News)
कृष्ण तुळस
या तुळशीचे खोड, पाने, व मंजिऱ्या कमी-अधिक प्रमाणात गडद जांभळ्या रंगाची असतात. उन्हात वाढलेल्या व जुन्या झाडा मध्ये हा रंग जास्त ठळक पणे उठून दिसतो. याच तुळशीला काळी तुळस असेही संबोधतात. या तुळशीचे पाने खाल्ल्याने सर्दी-खोकला, ताप यावर लवकर आराम मिळतो. घशाचे विकार, श्वसनाचे विकार, नाकाच्या आतील जखमेचे व्रण, कानाचे दुखणे, त्वचारोग, अपचन, डोकेदुखी, निद्रानाश, फेफरे येणे, पटकी येणे आदी रोगांवर कृष्ण तुळशीचा काढा गुणकारी आहे. (Latest Marathi News)

राम तुळस
ही मोठ्या पानांची, उंच व रानटी पद्धतीने वाढणारी तुळस आहे. या तुळशीच्या पानांना लवंग सदृश, मसालेदार असा सुवास येतो. पोटाच्या विकारांसाठी ही तुळस उपयुक्त आहे. या तुळशीला ‘लवंगी तुळस’, असेही संबोधले जाते. आपल्या घरात देखील आपण राम तुळशीच लावतो. (Top Marathi Headline)

कापूर तुळस
तुळशीच्या सर्वसामान्य पानांसारखेच पण थोडे टोकदार पान असलेली ही तुळस आहे. नावाप्रमाणे याच्या पानांना कापरासारखा सुवास असतो. या तुळशीच्या तेलामध्ये ६० ते ८०% कापराचे प्रमाण असते. सर्दी, कफ, खोकला यावर कापूर तुळस गुणकारी ठरते. हर्बल टी बनवण्यासाठी ही तुळस उपयुक्त आहे. (Top Trending Headline)

सब्जा तुळस
आपल्या येथे सब्जाचे झाड खास त्याच्या बियांसाठी लावले जाते. शरीराला थंडावा देणारा सब्जा उन्हाळ्यात महत्वाचा ठरतो. जागोजागी मिळणारा वर्ल्ड फेमस फालुदा, सब्जा शिवाय बनू शकत नाही. तसेच अंग दुखून येणाऱ्या उन्हाळी ज्वारात, पाने व बिया सरबतात घालून प्यायल्यास बरे वाटते. विंचू व इतर दंशावर पाला चुरडून लावता येतो. (Top Stories)

=========
Tulshi Pujan : २५ डिसेंबरला साजरे होणाऱ्या तुळशी पूजनाचे महत्त्व
=========
वन तुळस
अतिशय तीव्र असा सुवास असलेली ही तुळस विशेष औषधी आहे. पानांचा चोथा त्वचाविकारांवर वापरला जातो; न भरणाऱ्या जखमांवरही हा पाला लावला जातो. नाव ‘अमेरिकानम’ असले तरी ही भारतीय वंशाची तुळस आहे. जंगली पद्धतीने वाढणाऱ्या या तुळशीचे ‘रान तुळस’ असेही नाव आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
