Home » चेक जमा करण्यापूर्वी जाणून घ्या पोस्ट डेटेल, स्टेल आणि एंट डेटेड चेकबद्दल अधिक

चेक जमा करण्यापूर्वी जाणून घ्या पोस्ट डेटेल, स्टेल आणि एंट डेटेड चेकबद्दल अधिक

देशभरातील लाखो लोक पैशांसंदर्भात ट्रांजेक्शन हे सध्या डिजिटल माध्यमातून केले जातात. परंतु जेव्हा मोठ्या रक्कमेचे ट्रांजेक्शन करायचे असते तेव्हा चेकचा पर्याय निवडला जातो.

by Team Gajawaja
0 comment
Types of cheque
Share

देशभरातील लाखो लोक पैशांसंदर्भात ट्रांजेक्शन हे सध्या डिजिटल माध्यमातून केले जातात. परंतु जेव्हा मोठ्या रक्कमेचे ट्रांजेक्शन करायचे असते तेव्हा चेकचा पर्याय निवडला जातो. हा पर्याय अगदी सुरक्षित मानला जातो. पैशांच्या ट्रांजेक्शनसाठी  विविध पर्याय बँकेकडून उपलब्ध करुन दिलेले असतात. मात्र चेकने पेमेंट करताना काही सावधगिरी बाळगावी लागते.अन्यथा तुमचेच नुकसान होऊ शकते. बहुतांश लोक चेक आणि त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या पेमेंट पर्यायांबद्दल कंफ्युज असतात. बँकांच्या चेक संदर्भातील  ही काही नियम हे ग्राहकांना पाळावे लागतात. तर बँकेचे चेक हे काही प्रकारचे असतात. ते विविध उद्देशांसाठी कामी येतात. परंतु तुम्ही कधी स्टेल, पोस्ट डेटेड चेक बद्दल ऐकले आहे का? खरंतर या दोन्ही चेकमध्ये अंतर असून त्या संदर्भात बहुतांश जणांचे कंफ्युजन होते. याच बद्दल आपण आज अधिक माहिती जाणून घेणार आहोत. (Types of cheque)

पोस्ट डेटेड चेक
पोस्टे डेटेड चेक म्हणजे असा चेक जो काही दिवसानंतर कोणत्याही तारखेसाठी जारी केले जाते. हे क्रॉस्ड पेई किंवा अकाउंट पेई चेक असतो. चेक कोणताही असो त्यावर जी तारीख दाखल केली जाते त्यावर तारखेपासून पुढील ३ महिन्यांपर्यंत तो मान्य असतो. पोस्ट डेटेड चेक त्या स्थितीत उत्तम मानला जातो जेव्हा चेक जारी करताना तुमच्याकडे पुरेशी रक्कम उपलब्ध नसेल. मात्र तुम्हाला विश्वास असतो की, चेकवर सांगण्यात आलेल्या तारखेपर्यंत किंवा वेळेवर तुमच्याकडे फंड येऊ शकतात.

Types of cheque

Types of cheque

स्टेल चेक
हा चेक असा असतो जे जारी केल्यानंतर त्या तारखेपासून पुढील ३ महिन्यापर्यंतचे पेमेंट केले जाते. अशा स्थितीत ते एक्सपायर होतात जेव्हा एखादा व्यक्ती चेकचा कालावधी संपल्यानंतर त्याच्या पेमेंटसाठी बँकेला देतो. त्याचे बँकेकडून पेंमेंट केले जात नाही. एक्सपायर झालेल्या चेकला स्टेल चेक असे म्हटले जाते. (Types of cheque)

हेही वाचा- आपत्कालीन स्थितीत पैशांची गरज भासल्यास FD वर कर्ज घेता येते का?

एंट डेटेड चेक
एंट डेटेड चेक म्हणजे तारीख निघून गेल्यानंतर जारी केले जातात. जर अशा चेकसाठी ३ महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला असेल तर बँकमध्ये तो पेमेंटसाठी दिला जाऊ शकतो. नेहमीच लक्षात ठेवा की, एंट डेटेड चेक हे वॅलिडिटी संपण्याआधी पेमेंटसाठी द्यावेत. अन्यथा त्याचे पेमेंट तुम्हाला केले जात नाही. कारण चेक इश्यू झाल्यानंतर सामान्यत: ३ महिन्यांपर्यंतच वॅलिड असतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.