स्मार्टफोन, फिचर फोन, लॅपटॉप किंवा अन्य दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींसाठी आपल्याला विविध चार्जरचा वापर करावा लागतो. यामुळे जरी बॅटरी कमी झाली तरीही त्यानुसार आपण चार्जर वापरतो. अशातच आता सरकारकडून दोन पद्धतीचे चार्जर घेऊन येण्याचा विचार करत आहे. म्हणजेच भारतात तुम्हाला फक्त दोन पद्धतीचे चार्जिंग पोर्ट्स लवकरच दिसून येणार आहेत. यामुळे प्रत्येक वेळी नवे चार्जर खरेदी करण्याची चिंता ही दूर होणार आहे. अशा पद्धतीचे पाऊल नुकतेच युरोपीयन युनियनकडून उचलण्यात आले आहे. आता इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्ससाठी फक्त एकच चार्जिंग पोर्ट मिळेल. या युनियने टाइप सी चार्जिंग पोर्टला मंजूरी दिली आहे. या नियमाचे पालन पुढील वर्षापासून करावे लागणार आहे. अशाच पद्धतीचा नियम काहीसा भारतात येणार असल्याची अपेक्षा केली जात आहे.(Two charging port)
कंज्युमर अफेअर मिनिस्ट्री यांनी सर्व मुख्य इंडस्ट्री असोसिएशन आणि सेक्टर स्पेसिफिक ऑर्गेनाइजेशन यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक १७ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये घरगुती वापरासाठीचे मल्टीपल चार्जिंग हे बंद करण्यासंदर्भात विचार केला जाऊ शकतो. कंज्युमर अफेअर सेक्रेटरी रोहित कुमार सिंह याने गेल्या आठवड्याच या संबंधित एक पत्र इंडस्ट्री लीडर्ससाठी लिहिले होते. रिपोर्ट्सनुसार पत्रात असे लिहिले होते की, भारतात बहुतांशजण हे लहान आणि मध्यम आकाराचे पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक्स डिवाइसेसचा वापर करतात. यामध्ये टाइप-सी चार्जिंग पोर्ट दिला गेला आहे. मोठ्या संख्येने युजर्स हे फिचर फोनचा वापर करतात जे विविध चार्जिंग पोर्टसह येतात.

पुढे त्यांनी असे म्हटले आहे की, आपल्याला फक्त दोन पद्धतीच्या चार्जिंग पॉइंट्स संदर्भात काम करणे सुरु केले पाहिजे. म्हणजेच एकच चार्जिंग पोर्ट स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट, ईअरबड्स, स्पीकर सारख्या लहान आणि मध्यम आकाराच्या डिवाइसेससाठी वापरता येतील. तर दुसरे फिचर हे फोन्समध्ये वापरले जाईल.(Two charging port)
हे देखील वाचा- IMEI क्रमांक म्हणजे काय? केवळ एका क्रमांकावरुन पोलिस चोरांचा शोध कसा घेतात
जर सरकारने ही पॉलिसी लागू केल्यास त्याचा अधिक प्रभाव अॅप्पलवर होणार आहे. अॅप्पल कंपनीने आपल्या स्मार्टफोनसाठी लाइटनिंग केबलचा वापर केला आहे. ऐवढेच नव्हे तर आयफोनसोबत कंपनी चार्जर देत नाही आणि त्यामुळे ग्राहकांना पैसे देऊन चार्जर खरेदी करावा लागतो. यामधून कंपनी खुप पैसे कमावते. अशातच टाइप सी किंवा दुसरा कोणताही पोर्ट आल्यास कंपनीच्या उद्योगाला फटका बसू शकतो.