Home » दोन अफ्रिकन सिंह

दोन अफ्रिकन सिंह

by Team Gajawaja
0 comment
Jacob and Tibu
Share

युगांडा या अफ्रिकन देशामधील दोन भाऊ सध्या स्टार झाले आहेत. हे दोन भाऊ धोकादायक असलेल्या अफ्रिकन नदीमध्ये ब-याच काळ पोहत होते. तुम्ही म्हणाल तर यात काय विशेष, तर हे दोन भाऊ म्हणजे, दोन अफ्रिकन सिंह आहेत. मांजर प्रजातीमधील सिंहाना पोहण्याची फार आवड नसते. त्यातच त्यातील एका सिंहाला फक्त तीन पाय आहेत. शिवाय या दोन भावांनी जी नदी पार केली ती अतिशय धोकादायक नदी म्हणून ओळखली जाते. कारण पाणघोडे आणि मोठ्या मगरींनी ही संपूर्ण नदी भरलेली आहे. (Jacob and Tibu)

अशावेळी जीवावर उदार होत या दोन सिंहानी नदी पार केली. अशाप्रकारचा प्रयत्न त्यांनी यापूर्वीही दोनवेळा केला होता. पण त्यात त्यांना अपयश आले. आता तिस-यावेळी या सिंहाना यश आले. या त्यांच्या पोहण्याचा सर्व व्हिडिओ त्यांच्यावर देखरेख ठेवणा-या टिमनं रेकॉर्ड केला आहे. सिंहानं पोहतांना बघून प्राणीविशेषज्ञही आश्चर्य चकीत झाले आहेत. या दोन सिंहानी दोन किलोमीटरचा हा सर्व प्रवास का केला, हेही जाणण्यासारखे आहे. युगांडा येथील राष्ट्रीय उद्यानातील सिंहाची संख्या झपाट्यानं कमी होत आहे. (Jacob and Tibu)

यात शिकारींचे प्रमाण जास्त आहे. आफ्रिकन सिंहाची मोठ्या प्रमाणात शिकार होत असल्यामुळे जंगलात सिंहीणींचे प्रमाण कमी आहे. अशावेळी आपला जोडीदार शोधण्यासाठी सिंहाना दुस-या जंगलात जावे लागते. या मार्गात मगर आणि पाणघोड्यांनी भरलेली नदी आहे. त्यामुळे सिंहाना आपला जोडीदार निवडण्यासाठी ही नदी ओलांडावी लागते. यापूर्वी अनेक सिंहानी असा प्रयत्न केला होता. मात्र जेकब आणि टिबूनं त्यात यश मिळवलं आणि आता प्राणीप्रेमींमध्ये या दोन भावांच्या पराक्रमाचे कौतुक आहे.

आफ्रिकन सिंह हे सर्वात शक्तिशाली असल्याचे सांगण्यात येते. यात दोन आफ्रिकन सिंहानी एक पराक्रम केला आहे. धोकादायक नदीतून दीड किलोमीटर पोहत जाणा-या दोन सिंहाचा व्हिडिओ ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखालील संशोधन पथकाने रेकॉर्ड केला आहे. हे संशोधक युगांडाच्या धोकादायक काझिंगा वाहिनीवर पोहणा-या दोन सिंहावर गेल्या काही वर्षापासून नजर ठेऊन आहेत. यासाठी या भागात रात्रीच्या वेळी ड्रोनची मदत घेण्यात येते. याच ड्रोनच्या माध्यामातुन धोकादायक पाणथळ भागातून सहजपणे पोहणा-या सिंहाना टिपण्यात आले. यात जेकब नावाचा १० वर्षांचा सिंह सर्वांचा लाडका आहे. (Jacob and Tibu)

त्याच्यासोबत त्याचा भाऊ टिबूही होता. या दोघांनी यापूर्वी दोनदा वेळा ही नदी पार करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यावेळी ते यशस्वी झाले. जेकब हा या भागातील लोकप्रिय सिंह आहे. संशोधक डॉ. अलेक्झांडर ब्रॅक्झकोव्स्की हे त्याच्यावर संशोधक करीत आहेत. जेकबला नऊ जीवन असलेला सिंह म्हणून ओळखण्यात येते. कारण तब्बल नऊवेळा त्याच्यावर हल्ला झाला आहे. पण या सर्व धोकादायक हल्ल्यातून जेकब पार पडला आहे. यात त्याला त्याचा एक पायही गमवावा लागला आहे. पण चालतांना जेकबला एक पाय नाही, हे कळतही नाही, एवढी जेकबची चाल देखणी आहे. जेकबला यापूर्वीही शिका-यांनी मारण्याचे प्रयत्न केले आहेत. तर रानम्हशीनं त्याला शिंगावर घेऊन जखमी केलं होतं. शिका-यांनी लावलेल्या स्टीलच्या जाळ्यात त्याचा पाय अडकला होता.  (Jacob and Tibu)

============================

हे देखील वाचा :  गेंड्यांना धोका कोणाचा ?

============================

पण तो या जाळ्यातून सुटण्यात यशस्वी झाला. जेकब आणि त्याचा भाऊ टिबू हे युगांडाच्या राष्ट्रीय उद्यानातील सर्वात लोकप्रिय सिंह आहेत. या दोघांना बघण्यासाठी जेवढे पर्यटक येतात, तेवढेच त्यांना मारण्यासाठीही येणा-यांची संख्या आहे. या उद्यानातील सिंहांची संख्या गेल्या पाच वर्षांत निम्म्याहून कमी झाली आहे. शिकारी सिंहाना मारण्यासाठी विद्युत तारांचाही वापर करतात. यामुळे या उद्यानातील सिंहाची संख्या विषम प्रमाणात झाली आहे. सिंहीणी अधिक हल्ल्याला बळी पडल्या आहेत. (Jacob and Tibu)

त्यामुळे दोन सिंहामागे एक सिंहीण असे या उद्यानातील प्रमाण आहे. त्यामुळे या सिंहांना जोडीदाराच्या शोधात काझिंगा जलवाहिनीतून पोहावे लागते. या नदित मोठ्या प्रमाणात मगरी आहेत. त्याही सिंहांवर हल्ला करतात. मगरीच्या हल्ल्यातही सिंहाचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.युगांडातील राष्ट्रीय उद्यानात २०१८ मध्ये ७१ एवढे सिंह होते. आता तिथे केवळ ३५ सिंह राहिले आहेत. या सर्वांना शिका-यांनी मारले आहे. यावर प्रतिबंध असले तरी शिकारी आठवड्याला एका तरी सिंहाची शिकार करतात. यामुळे या भागात जगभरातील प्राणीशास्त्रज्ञ सिंहाच्या रक्षणासाठी जमा झाले आहेत.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.