ट्विटर जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म पैकी एक आहे. गेल्या वर्षात एलन मस्क यांनी या कंपनीला खरेदी केले. तेव्हापासूनच ही कंपनी सातत्याने चर्चेत राहत आहे. दरम्यान सोशल मीडिया कंपनीमध्ये असे काही झाले आहे ज्यामुळे आता मोठे संकट निर्माण झाले आहे. खरंतर ट्विटरचे सोर्स कोड काही ठिकाणी ऑनलाईन लीक झाले आहेत. ट्विटरला असा संशय आहे की, एखाद्या माजी कर्मचाऱ्याने हे काम केले असावे. या घटनेमुळे एलन मस्क यांच्या कंपनीत खळबळ उडाली आहे. कंपनीने बचावासाठी अमेरिकन कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.(Twitter Source Code)
ट्विटरचे लीक झालेले सोर्स कोड GitHub वर पोस्ट करण्यात आले आहेत गिटहल सॉफ्टवेअर डेवलपमेंटसाठी एक इंटरनेट होस्टिंग सर्विस आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने कॅलिफोर्नियातील नॉर्दन डिस्ट्रिक्ट कोर्टात कायदेशीर कागदपत्र दाखल केली आहेत. यानुसार ट्विटरने गिटहबकडे लीक झालेले सोर्स कोड हटवण्याची मागणी केली आहे.
ट्विटरने कोर्टाकडे कॉपीराइटचे उल्लंघन करणाऱ्या किंवा केलेल्या व्यक्तीचा शोध लावावा अशी विनंती केली आहे. ज्याने ट्विटरच्या परवानगीशिवाय गिटहबवर त्यांचे सोर्स कोड लीक केले आहेत. दरम्यान, कंपनीला एका माजी कर्मचाऱ्यावर संशय आहे. ट्विटरचे असे मानणे आहे की, सोर्स कोड काही हिस्स्यांमध्ये लीक होणे हे कॉपीराइटच्या उल्लंघनामध्ये येते.
लीक प्रकऱणी अरबपती उद्योगपती एलन मस्क यांच्यासमोर आव्हाने येण्यााची शक्यता आहे. मस्क यांनी गेल्या वर्षातच ४४ अरब डॉलरला खरेदी केले होते. या दरम्यान, कंपनीत फार मोठे बदल ही झाले आणि कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून ही टाकले. कंपनीने १ एप्रिल पासून लीगेसी ब्लू टीक म्हणजेच जुन्या वेरिफिकेशन सिस्टिमपासून मिळालेले ब्लू टीक हटवणार आहे. ब्लू टीकसाठी युजर्सला ट्विटरचे पेड सब्सक्रिप्शन घ्यावे लागणार आहे.(Twitter Source Code)
हे देखील वाचा- १.२ कोटी व्हॉट्सअॅप, १७ लाख फेसबुक युजर्सचा डेटा चोरी
ट्विटरच्या आणखी एका अपडेट बद्दल बोलायचे झाल्यास एलन मस्क यांनी कंपनीची वॅल्यूएशन कमी करत २० अरब डॉलर केली आहे. खास गोष्ट अशी की, मस्क यांनी पाच महिन्यांपूर्वी ४४ अरब डॉलरमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खरेदी केला आहे. असे पहायला गेल्यास तर कंपनीची वॅल्यू जवळजवळ अर्धी झाली आहे. स्नॅपचॅटची पॅरेंट कंपनी स्नॅपची १८.२ अरब डॉलर वॅल्यूच्या तुलनेत ट्विटरची वॅल्यू थोडी अधिक आहे.