सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरचे मालक एलॉन मस्क यांनी आणखी एका नव्या फीचरची घोषणा केली आहे. त्यांनी या नव्या फिचरच्या सहाय्याने युजर्सला स्वाइपिंगच्या माध्यमातून रिकमेंडेड आणि फॉलो करण्यात आलेले ट्विट, ट्रेंड्स, टॉपिक्स यादरम्यान स्विच करता येणार असल्याचे म्हटले आहे. ट्विटच्या पोस्टमध्ये एलन मस्क यांनी घोषणा केली होती की, नव्या ट्विटर नेविगेशन फिचरची एन्ट्री जानेवारी महिन्यात होणार आहे. त्यामुळे हे फिचर आल्यानंतर मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचा वापर करणे हे बदलणार आहे. तर याच बद्दल जाणून घेऊयात अधिक. (Twitter New Feature)
शानदार असणार अनुभव
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पूर्वी युजर्सला क्रोनोलॉजिकल टाइमलाइन दरम्यान स्वॅप करण्याची परवानगी देतो. जे लेटेस्ट ट्वीट दाखवते. या व्यतिरिक्त होम टाइमलाइन सुद्धा ज्या स्टार आयकॉनवर टॅप केल्यानंतर रिकमेंडेड ट्वीट दाखवतो. मस्क यांनी पुढे असे म्हटले की, पुढे आणि मागे स्विच करमे उत्तम आहे. जसे आपण ट्विटर AI मध्ये सुधारणा करतो. रिकमेंडेड ट्विट, लिस्ट आणि टॉपिक हे शानदार असणार आहेत.
मोबाईल अॅप संदर्भात मस्क यांनी सांगितले असे…
एका ट्विटर युदरने मोबाईल अॅपवर लिस्टमध्ये स्वाइप करण्याबद्दल विचारले. तेव्हा मस्क यांनी प्रश्न उपस्थितीत केला की, मात्र लिस्ट दरम्यान, स्वाइप करण्याबद्दल काय? सध्याच्या काळात मोबाईल अॅपवर हे सर्वात उत्तम फिचर्सपैकी एक आहे. तर लिस्टसाठी सुद्धा सुविधा मिळेल असे ही उत्तर मस्क यांनी त्याला दिले.
हे देखील वाचा- नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांचा नवा प्लॅन, OTP मागितल्यास व्हा सावध
Twitter View Count फिचर
एलॉन मस्क यांनी जेव्हापासून ट्विटर खरेदी केले तेव्हापासून काही मोठे निर्णय घेतले. मस्क यांनी युजर्ससोबत सातत्याने जोडले गेले आहेत. माइक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्ला उत्तम करण्यासाठी ते वारंवार युजर्सकडून सल्ला मागतात. नुकतेच त्यांनी असे म्हटले होते की, ट्विटरवर लवकरच व्यू काउंट फिचर आणले जाणार आहे. युजर्सला ते बंद करण्याची परवानगी ही असणार आहे. या फिचरमुळे युजर्सला त्याचे ट्विट किती वेळा पाहिले गेले आहे ते कळणार आहे.(Twitter New Feature)
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या पर्सनल डेटा स्टोर मधून जवळजवळ ४० कोटी युजर्सचा डेटा हॅक करण्यात आल्याची बाब समोर आली होती. एका हॅकरने या पर्सनल डेटाला डार्क वेबवर विक्रीसाठी ठेवले होते. ज्या लोकांचा डेटा लीक झाला होता त्यामध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांच्यासारख्या हायप्रोफाइल लोकांच्या अकाउंट्सचा समावेश होता. या बद्दलचा दावा इज्राइलची सायबर इंटेलीजेंस कंपनी हडसन रॉक यांनी एका रिपोर्ट मध्ये केला होता.