Home » ट्विटरचे नवे फिचर होणार लॉन्च, Whatsapp प्रमाणेच मेसेज किंवा चॅट करता येणार

ट्विटरचे नवे फिचर होणार लॉन्च, Whatsapp प्रमाणेच मेसेज किंवा चॅट करता येणार

by Team Gajawaja
0 comment
Twitter Blue Tick
Share

ट्विटरचे नवे मालक एलन मस्क यांनी कंपनी इंडीविज्युअल डायरेक्ट मेसेज मध्ये रिस्पॉन्डिंग फिचरला एनेबेल करण्यासह काही नवे फिचर्स ही या महिन्याच्या अखेर पर्यंत उपलब्ध करुन देणार आहेत. यापूर्वी ही मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने युजर्सला काही सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. अशातच एलन मस्क यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन एक ट्विट करत नव्या फिचर्सबद्दलची माहिती दिली आहे. (Twitter New Feature)

ट्विटमध्ये मस्क यांनी असे म्हटले की, वैयक्तिक डायरेक्ट मेसेज मध्ये रिप्लाय करण्यासह रिऍक्शन, इमोजी आणि एनक्रिप्शन सारखे फिचर्स युजर्सला लवकरत उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. म्हणजेच तुम्ही व्हाॅट्सॲप प्रमाणे एनक्रिप्टेड चॅट्स फिचरचा लाभ घेऊ शकता. याबद्दल काही युजर्सने मस्क यांच्या ट्विटखाली कमेंट्स करत काही प्रश्न ही विचारले आहेत. एका युजरने विचारले की, तुम्ही डायरेक्ट मेसेजसाठी unsend फिचर आणण्याचा विचार करु शकता का?

या व्यतिरिक्त ट्विटरचे नवे व्यू काउंट्स फिचर युट्यूब आणि इंस्टाग्राम फिचर प्रमाणे काम करणार आहे. येथे युजर्सला आपली पोस्ट किती लोकांनी पाहिली ते कळणार आहे. म्हणजेच आता ट्विटवर लाइक, कमेंट्स आणि रिट्विट असणाऱ्या स्टेटस बारमध्ये आणखी एक ऑप्शन व्यूजचा सुद्धा दिला जाणार आहे. या सेक्शन मध्ये आपल्या आणि अन्य युजर्सच्या पोस्ट किती लोकांनी पाहिली हे कळणार आहे. या फिचरला आयओएस आणि अँड्रॉइड या दोघांसाठी रोलआउट करण्यात आले आहे. वेब युजर्ससाठी सुद्धा ते लवकरच जारी केले जाणार आहे.

दरम्यान, गेल्याच महिन्यात एलन मस्क यांनी असे म्हटले होते की, मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर युजर्ससाठी एल्गोरिदमला अशा प्रकारे अपडेट करण्याचे काम सुरु आहे जसे की, युजर्सने सर्च केलेल्या एखाद्या गोष्टीला युजर्सला त्याबद्दल अचूक माहिती मिळेल. (Twitter New Feature)

हे देखील वाचा- PDF फाइलचा पासवर्ड काढायचा असेल तर ‘ही’ ट्रिक वापरा

एलन मस्क यांनी गेल्या वर्षात २७ ऑक्टोंबरला ट्विटरचा कारभार सांभाळण्यास सुरुवात केली. त्यानंतर ट्विटरच्या पॉलिसीत ही बदल केले. काही अधिकारी आणि सीईओ यांची हकालपट्टी कंपनीतून केली. यामुळे एलन मस्क यांच्यावर जोरदार टीका सुद्धा झाली. मात्र तरीही मस्क यांनी ट्विटरची धुरा आपण व्यवस्थितीत सांभाळू असा विश्वास दाखवला होता. मात्र हळूहळू काही जाहिरात देणाऱ्या कंपन्या आणि ब्रँन्ड्स यांनी ट्विटरवर जाहिरात देणे कमी अथवा बंद केले. यामुळे जाहिरातींमधून होणारी ट्विटरची कमाई ७१ टक्क्यांनी कमी झाली. त्याचसोबत मस्क यांनी नोव्हेंबर मध्ये ट्विटर दिवाळखोर होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली होती.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.