Home » ट्विटरची चिमणी उडाली भुर्रर्र..

ट्विटरची चिमणी उडाली भुर्रर्र..

by Team Gajawaja
0 comment
Twitter Logo
Share

अब्जाधिश आणि ट्विटरचा सर्वेसर्वा एलन मस्क कधी काय करेल याचा भरवसा नाही. आता या एलन मस्कने चक्क ट्विटरच्या चिमणीलाच उडवून लावलं आहे.  ट्विटर या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मची ओळख म्हणजे त्याच्या लोगोमध्ये असलेली चिमणी होती. ब-याच वेळा कोणी ट्विट केल्यावर चिमणीची चिव चिव असं बोललं जायचं…आता एलन मस्कने त्या चिमणीच्या जागी चक्क कुत्र्याचा फोटो लावला आहे. त्यामुळे आता ट्विटर चिव चिवच्या ऐवजी भू  भू असे बोलण्यात येणार की काय? हा प्रश्न ट्विटर वापरणा-यांना पडला आहे आणि एलन मस्कने नेमकं या चिमणीला का उडवलं याचीही चर्चा सुरु झाली आहे. सोबत अनेक मिम्सही या कुत्र्यावर यायला लागले आहेत.(Twitter Logo)  

ट्विटरचे मालक एलन मस्क सध्या या सर्वाधिक लोकप्रिय सोशल प्लॅटफॉर्मचे संपूर्ण स्वरुपात बदलण्यात गुंतले आहेत.  याची पहिली मोठी सुरुवात करताना मस्कने ट्विटरचा सुप्रसिद्ध ‘बर्ड लोगो’ म्हणजेच चिमणीचे ट्रेडमार्क चिन्ह बदलले आहे.  ट्विटरचा जी मंडळी वापर करतात त्यांना आता निळ्या पक्ष्याऐवजी कुत्र्याचे चित्र दिसत आहे. अॅलन मस्कने स्वत: त्याच्या ट्विटर हँडलवर याबद्दल एक व्यंगचित्र ट्विट केले आहे, ज्यामध्ये हा कुत्रा त्याचे ओळखपत्र एका ट्रॅफिक पोलिसाला दाखवत आहे आणि त्यामध्ये ट्विटर पक्ष्याला जुने चित्र सांगत आहे.(Twitter Logo)

ट्विटरवर बदललेल्या या चित्रामुळे सोशल मिडीयावर मिम्सचा जणू पूरच आला आहे आणि एलन मस्कने हा बदल का केला? याबद्दल उत्सुकता ताणली गेली आहे. एलन मस्कने या कुत्र्याचा फोटो आधीही अनेकवेळा शेअर केला आहे. त्यामुळे एलन मस्कला आवडणारा हा कुत्रा नेमका कोण आहे, याचीही उत्सुकता वाढली आहे. (Twitter Logo)

ट्विटरच्या लोगोमध्ये वापरलेल्या कुत्र्याचे खरे नाव काबोसू आहे.  हा कुत्रा लोकप्रिय मिम्सचा एक भाग आहे. हा कुत्रा किती लोकप्रिय आहे की त्याच्याशी संबंधित असलेल्या मीम्सला ‘डोस मीम्स’ म्हणतात. काही काळापूर्वी या कुत्र्याच्या नावावर क्रिप्टोकरन्सी देखील आणली गेली होती.  डॉज कॉईन क्रिप्टोकरन्सी 6 डिसेंबर 2013 रोजी सॉफ्टवेअर अभियंते बिली मार्कस आणि जॅक्सन पामर यांनी लॉन्च केली होती. याला जगातील पहिले डॉग कॉईन आणि मेम कॉईन म्हटले जाते, त्याला खूप मागणी होती. स्वत: एलन मस्क यांनी अनेक वेळा या कुत्र्याचा फोटो जाहीरातीमध्ये वापरला आहे. मस्क अनेकवेळा या काबोसू संदर्भातील मीम्स शेअर करीत असतात. (Twitter Logo) 

डॉज मेममध्ये दिसणारी हा कुत्रा जपानमधील साकुरा येथे त्याचे मालक, अत्सुको सातो यांच्यासोबत राहतो. मीम्समध्ये काबोसूची ओळख उघड केलेली नाही. काबोसू हा जपानमध्ये रेस्क्यू डॉग म्हणून काम करतो. त्याला तसेच ट्रेनिंग देण्यात आले आहे. 2010 मध्ये पहिल्यांदा त्याचे मालक अत्सुकोने त्यांच्या ब्लॉगवर काबोसूचा फोटो शेअर केला. त्यावेळेपासून हा काबोसू प्रसिद्धीत आला. त्यानंतर काबोसूवर अनेक मीम्स यायला सुरुवात झाल्या. त्याची बसण्याची एक खास पोज आहे. ही पोज सोशलमिडीयामध्ये प्रचंड लोकप्रिय झाली. आता याच काबोसूनं एलन मस्कला भुरळ घातली आहे आणि त्याचा फोटो ट्विटरच्या नव्या लोगोमध्ये (Twitter Logo) आला आहे. मस्कने 27 ऑक्टोबर 2022 रोजी ट्विटर $44 अब्जांना विकत घेतले. यानंतर मस्कने कंपनीच्या चार उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. यामध्ये सीईओ पराग अग्रवाल, वित्त प्रमुख नेड सेगल, कायदेशीर अधिकारी विजया गड्डे आणि सीन एजेट यांचा समावेश आहे.  मस्क यांनी ट्विटरच्या 7,500 कर्मचार्‍यांपैकी 50% पेक्षा जास्त कर्मचार्‍यांना काढून टाकले आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये, मस्कने अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर खाते पुन्हा चालू केले.  त्यांचा हा निर्णयही गाजला होता. आता त्याची मुख्य ओळख असलेली चिमणीची मास्कनं उडवल्यानं मात्र एकच खळबळ उडाली आहे.  

=========

हे देखील वाचा : इटली मध्ये इंग्रजी भाषेवर बंदीची शक्यता, बोलल्यास लाखो रुपयांचा भरावा लागणार दंड

=========

निळ्या चिमणीच्या जागी काबोसू कुत्र्याचे फोटो टाकून मस्कने एका युजरला ट्विटमध्ये सांगितले की, त्यानी जे वचन दिले होते ते पूर्ण केले. अर्थात हा बदल सध्या फक्त वेब आवृत्तीवर दिसत आहे.  मोबाईल अॅपवर हा बदल अद्याप तरी दिसत नाही. सध्या अब्जाधीश एलन मस्क ट्विटरच्या नवीन सीईओच्या शोधात आहेत. दरम्यान, अॅलन मस्कने आपल्या कुत्र्याचे,  फ्लोकीचे फोटो ट्विटरवर शेअर केले आणि विनोदाने त्याला ट्विटरचे नवे सीईओ म्हटले आहे.  


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.