एलन मस्क यांनी सोशल मीडिया कंपनी ट्विटर खरेदी केल्यानंतर काही घडामोडी झाल्याचे आपण सर्वांनी पाहिले. नोकरीवरुन काढून टाकणे ते नियमांत बदल आणि त्यानंतर सब्सक्रिप्शन फी संदर्भातील निर्णय असो यामुळे त्यांच्यावर नेहमीच टीका केली गेली. अशातच मस्क यांनी नुकत्याच एका पोलच्या माध्यमातून स्वत: सीईओ पदावरुन हटावे का असा प्रश्न विचारला होता. त्यावरुन निष्कर्ष असा आला की, बहुतांश जणांनी त्यांनी सीईओ पदाचा राजीनामा दिला पाहिजे या बाजूने मत दिले होते. त्यावरुन आता जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. (Twitter CEO)
मस्क यांनी आपल्या अधिकृत ट्विट अकाउंटवरुन ट्विट करत असे लिहिले की, जेव्हा मला असा कोणी मिळेल जो याची जबाबदारी सांभाळेल तेव्हा मी सीईओच्या पदाचा राजीनामा देईन. त्यानंतर फक्त सॉफ्टवेअयर आणि सर्वर टीमचे काम सांभाळेन.

एलन मस्क यांनी पोलच्या निकालासाठी बोटला ठरवले जबाबदार
यापूर्वी ट्विटरच्या सीईओ पदावरुन हटवण्याच्या संदर्भातील पोलच्या निकालासाठी एलन मस्क यांनी बोटला जबाबदार ठरवले आहे. मस्क यांनी नुकतेच असे म्हटले की, आता केवळ ब्लू सब्सक्राइबर्सच त्यांच्या पोलला मत देऊ शकतात. मस्क यांच्याकडून सादर केलेल्या एका पोलमध्ये ५७.५ टक्के लोकांनी त्यांना ट्विटरच्या सीईओ पदावरुन राजीनामा द्यावा या उद्देशाने म्हटले होते.
खरंतर एका ट्विटर युजरने असे म्हटले होते की, निती संबंधित पोलमध्ये केवळ ब्लू सब्सक्राइबर्सला मत देण्याची परवानगी असावी. यावर प्रतिक्रिया देत मस्क यांनी लिहिले की, हा उत्तम पॉइंट आहे. ट्विटर या संबंधित बदल करेल.
अन्य एका युजरने लिहिले की, याचा अर्थ असा आहे की, तुम्ही अशा लोकांना मत देण्यास बंदी घालत आहात जे तुम्हाला पैसे देऊ पाहतात? तर अन्य एका युजरने लिहिले की, निश्चित रुपात कमी पक्षपात असणारे परिणाम येतील. (Twitter CEO)
हे देखील वाचा- एलॉन मस्क यांना मागे टाकत जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीचे रँकिंग मिळालेले बर्नाड अरनॉल्ट कोण आहेत?
ट्विटरने सादर केली ब्लू फॉर बिझेनेस सेवा
ट्विटरने नुकत्याच आपल्या नव्या ब्लू फॉर बिझनेस सेवा लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. त्या अंतर्गत व्यवसाय आणि त्या संबंधित संस्था नव्या पद्धतीने आपल्या ट्विटर खात्याचे नव्या पद्धतीने वेरिफिकेशन करु शकतात. ट्विटरने पुढे असे म्हटले की, नव्या ब्लू फॉर बिझनेस सब्सक्राइबरला सेवेअंतर्गत कंपनी आपल्या खात्यासह कोणताही मोबाईल क्रमांक लिंक करु शकतात. यामुळे कंपनीच्या ट्विटरवर आपले नेटवर्क तयार होण्यास मदत मिळेल.