ट्विटरवरील वेरिफाइड अकाउंटवरुन ब्लू टिक हटवले गेले आहे. अशातच केवळ ब्लू टिक ही त्यांनाच दिली जाणार जे यासाठी पैसे मोजतील. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मच्या या निर्णयामुळे राजकीय नेतेमंडळी ते बॉलिवूड कलाकांरांच्या अकाउंटवरुन ब्लू टिक हटवले गेले. लीगेसी ब्लू टिक त्याला म्हटले जाते जे जुन्या सिस्टिममधून वेरिफाइड केले होते. अशा युजर्सला ट्विटरकडून ब्लू टिक हे फ्री मध्ये दिले गेले होते. पण आता त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. बॉलिवूड बद्दल बोलायचे झाल्यास तर सलमान खान, शाहरुख खान यांच्या अकाउंटवरुन ही ब्लू टिक हटवण्यात आले आहे. (Twitter Blue Tick)
बॉलिवूड सेलिब्रेटीजचे कोटींच्या संख्येने चाहते असतात. ऐवढेच नव्हे तर त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर ही फॉलोअर्सची संख्या प्रचंड असते. सलमान बद्दल बोलायचे झाल्यास तर त्याचे ट्विटरवर ४.५ कोटी फॉलोअर्स आहेत. परंतु ब्लू टिक हटवल्यानंतर चाहत्यांचा असा गोंधळ होत आहे की, आता त्यांना खरं-खोटं अकाउंट कोणतं हे कसं ओळखायचे.
खरंतर ट्विटरने २००९ मध्ये ब्लू टिक देण्यास सुरुवात केली होती. कंपनी सेलिब्रेटीज, जर्नलिस्ट, नेते आणि नामांकित व्यक्तींसाठी फ्री वेरिफिकेशन करायच, त्यानंतरच ब्लू टिक मिळायती, परंतु आता हे प्लॅटफॉर्म एलॉन मस्क यांनी खरेदी केल्याने त्यांनी याचे काही नियम बदलले आहेत. आता ब्लू टिक मार्क गेल्यानं खरं कोणत आणि खोटं कोणतं कसं ओळखायचे हे मुश्किल झाले आहे.
खरं-खोट्यामधील फरक कसा ओळखाल?
युजरनेम- सेलिब्रेटीज आणि नामांकित व्यक्तींचे युजरनेम हे नेहमीच युनिक असतात. त्यामुळे त्यांना ओळखणे अगदी सोप्पे होते. बहुतांशवेळा असे पाहिले जाते की, त्यांच्या रियल अकाउंटसच्या युजरनेममध्ये क्रमांकाचा कमी वापर केला जातो. यावरुन तुम्ही त्यांच्या अकाउंटची खात्री करुन घेऊ शकता.
वायरल ट्विट्स- ज्यांच्याकडे ब्लू टिक होते त्यांचे ट्विट्स नेहमीच व्हायरल होत राहतात. जर तुम्हाला त्यांचे असे कोणते ट्विट माहिती असेल तर तुम्ही ऑनलाईन सर्च करु शकता. अथवा काही वेबसाइट्सने सुद्धा त्यांचे ट्विट्स घेतलेले असतात.
अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स-आजच्या काळआत एकच सोशल मीडियाच्या माध्यमातून काम केले जात नाही. ट्विटर व्यतिरिक्त फेसबुक आणि इंस्टाग्राम सुद्धाचा वापर केला जातो. असेच काहीसे सेलिब्रेटीजचे सुद्धा असते. नामांकित व्यक्तींचे एकाच सोशल मीडियाव्यतिरिक्त दुसऱ्या ठिकाणी सुद्धा अकाउंट असते.
अकाउंट क्रिएशन टाइम- काही अकाउंट्स अशावेळी तयार करण्यात आली आहेत ज्यांचे वेरिफिकेशन केले गेले. जर एखादे अकाउंट आताच बनवले असेल तर ते बनावट असू शकते. लीगेसी ब्लू टिक अकाउंट्स हे काही वर्षांपूर्वीचे असू शकतात. (Twitter Blue Tick)
हे देखील वाचा- मृत आजीशी तरुणाने चक्क AI च्या मदतीने साधला संवाद
फॉलोअर्स लिस्ट- जर तुम्ही एखाद्या सेलिब्रेटीजला फॉलो करत असाल तर त्यांच्या ट्विटर अकाउंटवर फॉलोअर्सचे डिटेल्स पहावेत. युजर्स फॉलोअर्स लिस्टमध्ये जाऊन आवडीच्या सेलिब्रेटीचे ट्विटर अकाउंट पाहू शकता.
कंपनी अकाउंट- कंपनीच्या अकाउंटची खरी महिती मिळवणे खरंतर सोप्पे आहे. बहुतांश कंपन्या आपल्या वेबसाइटवर सोशल मीडियाच्या लिंक्स देतात. जर ट्विटर सुद्धा लिंक असेल तर तुम्ही त्यावर क्लिक करुन पाहू शकता.