पोर्तुगालमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे १९ वर्षीय मुलीने एका जुळ्या बाळांना जन्म दिला होता. जन्माच्या ८ महिन्यानंतर मुलांच्या वडिलांनी मुलांचे डीएनए चाचणी केली. तेव्हा तपासात हैराण करणारी बाब समोर आली होती. रिपोर्ट मध्ये असे समोर आले होते की, तो व्यक्ती केवळ एकाच मुलाचा बाप आहे. विज्ञानाच्या भाषेत याला हेट्रोपॅरेंटल सुपरफेक्युंडेशनची स्थिती असे म्हटले जाते.(Twins baby dad)
हे जगातील २० वे असे प्रकरण आहे. धक्कादायक बाब अशी की, जन्मानंतर दोन्ही मुलांचा चेहरा मिळताजुळता होता. त्यासाठी बाळांच्या आईला वाटत होते की, दोघांचे वडील एकच असतील. परंतु तपासात धक्कादायक खुलासा झाला. पोर्तुगालमध्ये हे प्रकरण फार चर्चेत आले आहे. सोशल मीडियात यावरुन वाद सुरु झाला आहे. तसेच काही प्रश्न ही उपस्थितीत केले जात असून जुळ्या मुलांच्या वेगवेगळ्या वडिलांचा डीएनए कसा पोहचला आणि अशी स्थिती कशी झाली?

हेट्रोपॅरेंटल सुपफेक्युंडेशन म्हणजे काय?
तज्ञांचे असे म्हणणे आहे की, हे हेट्रोपॅरेंटल सुपरफेक्यूंडेशनचे प्रकरण असून जी एक दुर्लभ स्थिती आहे. ज्यामध्ये जन्म होणाऱ्या दोन्ही जुळ्या मुलांमध्ये विविध वडीलांचे डीएनए असतात. या विषयावर अध्ययन करणारे डॉ. टुलियो जॉर्ज यांचे असे म्हणणे आहे की, हेट्रोपॅरेंटल सुपरफेक्यूंडेशनची स्थिती अशावेळी निर्माण होते जेव्हा आईच्या शरिरात असलेले अंड दोन विविध पुरुषांच्या माध्यमातून फर्टिलाइज होतात. महिलेने ही बाब स्विकार केली आहे की, तिने दोन वेगवेगळ्या पुरुषांसोबत संबंध ठेवले होते. म्हणजेच दोन वेगवेगळ्या पुरुषांसोबत रिलेशनशिपमध्ये होती. हेच मुलांमध्ये वेगवेगळ्या डीएनएचे कारण ठरले आहे.(Twins baby dad)
तज्ञांच्या मते, काही दिवसांच्या अंतराने वेगवेगळ्या पुरुषांचे स्पर्म महिलेमध्ये पोहचल्यानेच अशा जुळ्या मुलांना जन्म देण्यास कारणीभूत ठरु शकते. ज्यामध्ये वडीलांचा डीएनए हा वेगवेगळा असू शकतो. असे असू शकते की, जगात याचे २० हून अधिक प्रकरण आहेत. पण डीएनए तपास न झाल्याने अशी प्रकरण समोर येत नाहीत.
हे देखील वाचा- लहान मुलांमध्ये ऑटिज्मच्या कारणामुळे उद्भवू शकतात ‘या’ समस्या, पालकांनी वेळीच लक्ष द्या
अशी तयार होते स्थिती
द गार्जियनच्या रिपोर्टमध्ये असोसिएशन ऑफ क्लिनिकल एम्ब्रायोलॉजिस्टचे चेअरपर्सन जॅसन असे म्हणतात की, महिला एका वेळेनंतर दोन अंडी रिलिज करते. तसेच वेगवेगळ्या पुरुषांसोबत संबंध ठेवल्यास वेगवेगळे एग फर्टिलाइज होते. अशा स्थितीत हेट्रोपॅरेंटल सुपरफेक्यूंडेशनची स्थिती निर्माण होते.