Home » ट्विन टॉवरचे मालक आरके अरोडा कोण आहेत?

ट्विन टॉवरचे मालक आरके अरोडा कोण आहेत?

by Team Gajawaja
0 comment
Twin Tower Owner
Share

जवळजवळ २०० कोटी रुपयांच्या खर्चाने नोएडा सेक्टर-९३ ए मध्ये उभारण्यात आलेले सुपरटेक ट्विन टॉवर आता इतिहासाचा एक हिस्सा झाले आहेत. एका दशकापासून चालत आलेली ही कायद्याची लढाई अखेर संपली. सुप्रीम कोर्टाने इमारत उभारमीमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याचा आणि पाडण्याचा आदेश दिला होता. जवळजवळ एका वर्षानंतर १०० मीटर उंच पाया पाडण्यात आला. आता लोकांच्या मनात प्रश्न उपस्थितीत राहत आहे की, अखेर या ट्विन टॉवरचे मालक कोण होते? यामध्ये किती खर्च करण्यात आला. कंपनीला किली नुकसान झाले आणि सध्या ती कोणत्या स्थितीत आहे. असे विविध प्रश्न लोकांच्या मनात उपस्थितीत होत आहेत. कंपनीचे मालक ते त्यांच्या इतिहासाबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.(Twin Tower Owner)

कोण आहे ट्विन टॉवरचे मालक?
या ट्विन टॉवरची उभारणी सुपरटेक बिल्डरने केली होती. आरके अरोडा सुद्धा याच कंपनीचे आहेत. आरके आरोडा यांच्या नावावर एकूण ३४ कंपन्या आहेत. या कंपन्या सिव्हिल एविएशन, कंन्सटेंन्सी, ब्रोकिंग प्रिटिंग, फिल्म्स, हाउसिंग फाइनान्स, कंस्ट्रक्शन पर्यंतचे काम करते. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा सुद्धा दावा केला जातो की, आरके अरोडाने कबरी बवनण्याच्या कंपन्यासुद्धा सुरु केल्या. ७ सप्टेंबर १९९५ मध्ये आरके अरोडाने सुपरटेक लिमिटेड कंपनीची सुरुवात केली होती. कंपनीने १२ शहरांमध्ये रियल स्टेट प्रोजेक्ट लॉन्च केला. यामध्ये मेरठ, नोएडा, ग्रेटर नोएडा, यमुना प्राधिकरण आणि दिल्ली-एनसीआसह देशभरातील काही शहरांचा समावेश आहे.

एकापाठोपाठ एक काही कंपन्यांचे मालक झाले अरोडा
आरके अरोडा यांनी सर्वाधिक प्रथम सुपरटेक लिमिटेड कंपनी बनवली होती. त्याच्या ४ वर्षानंतर १९९९ मध्ये त्यांची पत्नी संगीता अरोडाने सुपरटेक बिल्डर्स अॅन्ड प्रमोटर्स प्राइव्हेट लिमिटेड नावाने कंपनी खोलली. आरके अरोडा आपला मुलगा मोहित अरोडासह मिळून पॉवर जेनरेशन, डिस्ट्रिब्युशन आणि बिलिंग सेक्टरमध्ये काम सुरु केले ज्यासाठी सुपरटेक एनर्जी अॅन्ड पॉवर प्राइव्हेट लिमिटेड नावाची कंपनी बनवली.

Twin Tower Owner
Twin Tower Owner

७० हजारांहून अधिक फ्लॅट उभारले
सुपरटेकची गणना देशातील बड्या बिल्डरच्या रुपात केली जाते. दिल्ली-एनसीआर मध्ये त्याचे काही प्रोजेक्ट सुरु आहेत. सुपरटेक एक पर्यंत ७० हजारांहून अधिक फ्लॅटच बांधून लोकांना दिले गेले.. तर सुपरटेक हिल एस्टेट-सोहना, सुपरटेक सफारी स्टुडिओ-१७ए यमुना एक्सप्रेस वे, सुपरटेक २७ हाइट्स-सेक्टर ८२ नोएडा, गुरुग्रामच्या सेक्टर ७९ मध्ये काही प्रोजेक्ट्स, गुरुग्रामच्या सेक्टर ६८ मध्ये काही प्रोजेक्ट्स, सुपरटेक संभव होम्स-सेक्टर-१७, सोहना, सुपरटेक रेनेसा-सेक्टर-११८, नोएडा आणि सुपरटेक द रोमानो-सेक्टर-११८, नोएडा सारखे काही प्रोजेक्ट्सवर अद्याप काम सुरु आहेत.

कंपनीला किती झाले नुकसान
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सुपरटेक समूहाचे मूल्य १० हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. दरम्यान, कंपनीला निर्माण आणि परतावासह ट्विन टॉवर्सच्या कारणास्तव ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले ज्याच्या एकूण मूल्यांकनाच्या ५ टक्क्यांजवळ आहे. ट्विन टॉवरला पाडण्याचे आदेश दिल्यानंतर लोकांनी सुपरटेकमध्ये पैसे लावणे बंद केले होते. त्यानंतर मोठे प्रोजेक्ट अयशस्वी झाले.(Twin Tower Owner)

हे देखील वाचा- ‘या’ ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या वाहनांवर बंदी, पण का?

दिवाळखोर झाली कंपनी
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर बुकिंग अमाउंट आणि १२ टक्के व्याजाची रक्कम मिळून ६५२ गुंतवणूकदारांचे दावे सेटल करायचे होते. कंपनीची परिस्थिती सातत्याने खराब होत होती. यामध्ये ३०० हून अधिक लोकांनी रिफंड घेण्याचा ऑप्शन निवडला. तर अन्य जणांनी मार्केट किंवा बुकिंग वॅल्यू आणि व्याजाची रक्कम जोडून जी रक्कम झाली त्यानुसार दुसऱ्या योजनेत प्रॉपर्टी घेतली. प्रॉपर्टीची किंमत कमी किंवा अधिक झाल्यास रिफंड केले किंवा अतिरिक्त रक्कम जमा केली गेली. सुपरटेक कंपनीला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने वर्ष २०२२ च्या मार्च महिन्यात दिवाळखोर घोषित केले होते. सुपरटेक नावाने आरके आरोडा यांच्याजवळ काही कंपन्या आहेत. पण ज्या दिवळखोर घोषित करण्यात आल्या त्या त्याच कंपन्या आहेत ज्यांनी ट्विन टॉवरची बांधणी केली होती.

४३२ कोटी रुपयांचे आहे कर्ज
एका माहितीनुसार, सुपरटेकवर जवळजवळ ४३२ कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज युनियन बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वात बांधण्यात आलेल्या कंसोशिर्यममधून घेतले होते. कर्ज न चुकवस्याने युनियन बँक ऑफ इंडियाने कंपनीच्या विरोधात याचिका दाखल केली होती. त्यानंतर एनसीएसटीने बँकेची याचिका स्विकार करुन इन्सॉल्वेंसीच्या प्रक्रियेचे आदेश दिले होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.