Home » ब्रिटिश काळात एका वकिलाने बस चालवण्यासाठी सुरु केली होती TVS, वाचा इतिहास

ब्रिटिश काळात एका वकिलाने बस चालवण्यासाठी सुरु केली होती TVS, वाचा इतिहास

by Team Gajawaja
0 comment
TVS Success Story
Share

चेन्नईतील ऑटोमोबाईल कंपनी TVS चर्चेत आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये संपलेल्या तिमाहित कंपनीचे नेट प्रॉफिट ४७ टक्क्यांनी वाढून ४०७.०५ कोटी रुपये झाली. टीवीएस देशातील त्या ऑटोमोबाइल कंपन्यांमध्ये सहभागी होती ज्यांच्या गाड्यांना अधिक पसंद केले जाते. टीवीएस ग्रुपची स्थापना टी वी सुन्दरम अयंगर यांनी केली होती. आपल्याच नावावर त्यांनी कंपनीची सुरुवात केली होती. मात्र फार कमी लोकांना माहिती आहे की, त्यांच्या वडिलांना त्यांना वकिल बनवायचे होते. (TVS Success Story)

अयंगर यांचा जन्म तमिळनाडूतील थिरुनेल्वली जिल्ह्यात २२ मार्च १८७७ मध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांना नेहमीच वाटायचे की, त्यांनी वकिल व्हावे. त्यामुळे शिक्षण घेतल्यानंतर वकीली सुरुवात केली. अयंगर उत्तम वकीली करायचे पण त्यांचे कामान मन लागायचे नाही. यासाठी एक दिवस असा आला जेव्हा त्यांनी नोकरीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आणि आपला व्यवसाय करण्याचा विचार करा. पण इंग्रजांचा तो काळ सुरु होता तेव्हा नोकरी सोडून व्यवसाय करणे फार मुश्किल होते. हिंम्मतीने १९११ मध्ये त्यांनी टीव्ही सुन्दरम अयंगर अॅन्ड संसची स्थापना केली.

TVS Success Story
TVS Success Story

स्वप्न पूर्ण झाले आणि गावात बस सेवा सुरु केली
अयंगर यांनी १९११ मध्ये टी वी सुन्दरम अयंगर अॅन्ड संस नावाने एका बस कंपनीची सुरुवात केली. त्यांचे असे मानणे होते की, शहरात बस अगदी सहज उपलब्ध होतात. मात्र ग्रामीण भागात ही सुविधा मिळत नाही आहे. त्यांचे हेच स्वप्न होते. बस कंपनी सुरु केल्यानंतर त्यांनी आपले सर्वात मोठे स्वप्न साकार केले आणि मदुरैच्या ग्रामीण क्षेत्रात बस सेवा सुरु केली. पुढे जाऊन ही कंपनी ऑटोमोबाईल निर्माण क्षेत्रात प्रसिद्ध होऊ लागली आणि टीवीएस ग्रुपच्या नावाने ओळखली जाऊ लागली.

अयंगर यांनी व्यवसायाचा विस्तार केला. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान मद्रास प्रेसीडेंसी मध्ये पेट्रोलची समस्या भासू लागली. पेट्रोलची वाढती मागणी पाहता त्यांनी गॅस प्लांटची सुरुवात केली. त्यानंतर मद्रास ऑटो सर्विस लिमिटेड आणि सुन्दरम मोटर्स लिमिटेडची सुरुवात केली. रबर रिट्रेडिंगसाठी कारखाने उभारले. (TVS Success Story)

हे देखील वाचा- इस्रोकडून २०३५ पर्यंत बनवण्यात येणार स्वत:चे स्पेस स्टेशन

आयटी सेवा आणि कंसल्टेंसी सर्विसमध्ये केला विस्तार
दक्षिण भारतात अयंगर यांना व्यावसायिक नव्हे तर एक विचारक म्हणून सुद्धा ओळखले जाऊ लागले. त्यांच्या मुलीच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता. त्या दरम्यान गांधीजींनी मुलीचे लग्न करण्याचा सल्ला दिला. तो असा काळ होता जेव्हा विधवा महिलांच्या पुन्हा लग्नाबद्दल विचार करणे म्हणजे हिंम्मत एकत्रित करणे. त्या दरम्यान, विधवा मुलीचे लग्न केल्यानंतर ते देशभरात चर्चचा विषय बनले होते. त्यांच्या या निर्णयाचे कौतुक करण्यात आले.

कंपनी यशाच्या शिखरावर पोहचल्यानंतर अयंगर यांनी आपल्या कंपनीची कमान मुलीच्या हाती सोपविली, जी कंपनीला पुढे घेऊन जाण्यासाठी यशस्वी झाली. वयाच्या ७८ व्या वर्षी २८ एप्रिल १९५५ मध्ये कोडाईकनाल मध्ये अयंगर यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र ज्या टीवीएस ग्रुपची स्थापना केली त्यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रात इतिहास रचला. सध्या टीवीएस ग्रुप ४० हजारांहून अधिक लोकांना रोजगार देते. हा ग्रुप आता केवळ ऑटोमोबाईल पर्यंत मर्यादित राहिलेला नाही. कंपनी आयटी सेवा आणि कंसल्टेंसी क्षेत्रात सुद्धा सक्रिय आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.