Home » ब्रेस्ट कॅन्सरशी लढणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने सर्जरीपूर्वी शेअर केला तिचा व्हिडिओ, सकारात्मकता पाहून फॅन्स झाले भावुक 

ब्रेस्ट कॅन्सरशी लढणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने सर्जरीपूर्वी शेअर केला तिचा व्हिडिओ, सकारात्मकता पाहून फॅन्स झाले भावुक 

by Team Gajawaja
0 comment
chhavi mittal
Share

आपल्याकडे नेहमीच एक म्हण म्हटली जाते की, ‘हाताची पाचही बोटं सारखी नसतात.’ सुखं दुःख माणसाच्या आयुष्यात नेहमीच येत असतात. कलाकार म्हणा किंवा सामान्य लोकं सुखं दुःख प्रत्येकाच्याच वाट्याला येतात. मात्र त्यातही स्वतःला स्थिर ठेऊन मार्ग काढत चालणे म्हणजे आयुष्य जगणे. कलाकार म्हणजे त्यांच्या आयुष्यात सर्वच चांगले असते, सुखच सुखं असते असा अनेकांचा समज किंबहुना गैरसमज असतो. मात्र असे अजिबातच नाही. त्यांना देखील अनेक संकटांचा, कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो. आता अभिनेत्री आणि यूटुबर छवी मित्तलचेच (chhavi mittal) घ्या ना. नेहमी हसत असणारी आणि सर्वांनाच सकारात्मक संदेश देणारी छवी सध्या कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढत आहे. काही दिवसांपूर्वीच छवीने तिला कॅन्सर झाल्याची माहिती सर्वांना दिली होती.

छवी मित्तलला (chhavi mittal) ब्रेस्ट कॅन्सरचे निदन झाले असून, नुकतीच तिच्यावर एक सर्जरी पार पडली. सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असणाऱ्या छवीने आता सकारात्मक राहून या आजारावर मात करण्याचे ठरवले आहे. हसत खेळत आजाराचा सामना करायचा आणि त्यातून सहीसलामत बाहेर यायचे असे तिने सांगितले. छवीने तिच्या सर्जरी पूर्वी हॉस्पिटलमधून तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओमध्ये सर्जरीपूर्वीचा असून, यात ती चक्क डान्स करताना दिसत आहे. 

छवीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती तिच्या हॉस्पिटलच्या रूममध्ये डान्स करताना दिसते. अचानक तिचा नवरा रूममध्ये येतो आणि तो देखील तिच्यासोबत डान्स करू लागतो. हा व्हिडिओ शेअर करताना छवीने (chhavi mittal) लिहिले, “डॉक्टरांनी सांगितले छवी चिल कर…मी तेच करत आहे.” छवीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असून, तिचे फॅन्स, कलाकार सर्वच तिला कमेंट्स करून तिच्या सर्जरीसाठी शुभेच्छा देत सर्जरी यशस्वी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहे. तिची सकारात्मकता पाहून तिचे फॅन्स भावुक झाल्याचे देखील दिसले.

========

हे देखील वाचा – पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई करूनही ‘या’ सिनेमांनी मिळवला फ्लॉपचा टॅग 

========

छवीने (chhavi mittal) या व्हिडिओनंतर अजून एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती बेडवर झोपलेली दिसत असून, तिच्या नवऱ्याने तिचा हात पकडलेला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले, “आता सर्जरीची वेळ आली आहे.” हसतमुखाने सर्जरीला सामोरे जाणाऱ्या छवीचा हा फोटो पाहून सर्वांनीच तिला धीर दिला आहे. 

छवीबद्दल (chhavi mittal) सांगायचे झाले तर छवी एक अभिनेत्री असण्यासोबतच यूटुबर देखील आहे. फेसबुक, यूटुबवर तिचे स्वतःचे चॅनेल असून, या चॅनेलच्या मध्यमातून ती नेहमीच सर्वांना, फिटनेस टिप्स, रेसिपी, वैयक्तिक, व्यावसायिक माहिती देत असते. याशिवाय सोशल मीडियावर तिची एक सिरीज देखील गाजत आहे. छवीने राजश्रीच्या ‘एक विवाह ऐसा भी’ या सिनेमात देखील काम केले आहे. 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.