Home » तुर्की आणि सीरियातील भुकंप जीवघेणा का ठरला?

तुर्की आणि सीरियातील भुकंप जीवघेणा का ठरला?

by Team Gajawaja
0 comment
Turkey Syria Earthquake
Share

तुर्की आणि सीरियात आलेल्या भुकंपावर आता पर्यंत २ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गाजियानटेप जिल्ह्याजवळील भुकंपाचे झटके जाणवले गेले. त्यानंतर त्याच्याजवळच दुसरा झटका जाणवला. अशातच एक प्रश्न उपस्थितीत राहतो की, भुकंपात इतक्या जणांचा का मृत्यू झाला? कारण भुकंपाचे तीव्र झटके जाणवले गेले की, त्याची तीव्रा ७.८ रिश्टर स्केल ऐवढी होती. याचे केंद्र १८ मीटर खोलवर होते. याच कारणास्तव जमीनीवर असलेल्या इमारतींचे फार मोठे नुकसान झाले.(Turkey Syria Earthquake)

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन मध्ये रिस्क अॅन्ड डिझास्टर रिडक्शन इंस्टीट्युटचे हेड प्रोफेसर जोआना फाउरे वॉकर यांच्या ते, कोणत्याही वर्षात आलेल्या विनाशकारी भुकंप पाहिले तर गेल्या दहा वर्षात याची तीव्रता केवळ दोन किंवा त्यापूर्वीच्या दशकात चार भुकंप दाखल केले गेले. परंतु ऐवढ्या तीव्र झटक्याच्या कारणास्तव फार मोठे नुकसान झाले.

जेव्हा लोक आपल्या घरात झोपले होते त्याचवेळी भुकंप आला. तर युनिव्हर्सिटी ऑफ पोर्ट्समाउथ मध्ये वोल्कैनोलॉजी अॅन्ड रिस्क कम्युनिकेशनचे रेडिर डॉ. कार्मेन सोलाना यांचे म्हणणे आहे की, दक्षिण तुर्की आणि खासकरुन सीरियात मधील रहिवाशी संरचना अधिक भक्कम नाही. त्यामुळे लोकांचा जीव वाचवण्यासाछी मुख्य रुपात दिलासा आणि बचाव कार्यावर अधिक भर असतो. जीवंत लोकांचा बचाव करण्यासाठी केवळ २४ तास फार महत्वाचे असतात. परंतु ४८ तासानंतर जीवंत लोकांची संभावना कमी होते. हा असा परिसर आहे जेथे गेल्या २०० वर्षात कोणताही मोठा भुकंप किंवा कोणते असे धोकादायक संकेत जाणवले नव्हते. त्यामुळे अशा ठिकाणी भुकंपासंदर्भातील परिपूर्ण तयारी केली नव्हती.

Turkey Syria Earthquake
Turkey Syria Earthquake

भुकंप येण्याची काय कारण आहेत?
जमीनीचा गर्भ हा विविध प्लेट्सचे बनलेले असतो. जे एकमेकांना चिकटून असतात. परंतु जेव्हा या प्लेट हलतात आणि जवळच्या प्लेट्ससह घर्षण होते. कधी कधी ताण ऐवढा वाढतो की, एक प्लेट दुसऱ्या प्लेटवर चढली जाते. त्यामुळे त्याच्या पृष्ठभागावर हालचाल होते.

या प्रकरणी अरेबियन प्लेट उत्तरेला हलली आहे आणि एनातोलियन प्लेटसोबत त्याचे घर्षण होत आहे. प्लेटच्या दरम्यान घर्षण ही भूतकाळातील विनाशकारी भुकंपांचे कारण ठरले आहेत. या कारणास्तव १३ ऑगस्ट १८२२ रोजी ७.४ तीव्रतेचा भुकंप आला होता. ऐवढेच नव्हे तर १९ व्या शतकात आलेल्या भुकंपापासून या परिसरातील जिल्ह्यात फार नुकसान झाले होते. ज्यामध्ये केवळ अलेप्पो मध्येच ७ हजार लोकांचा मृत्यू झाला होता.(Turkey Syria Earthquake)

त्यानंतर वर्षभर नुकसान पोहचवणारे ऑफ्टरशॉक येत होते. या नुकत्याच झालेल्या भुकंपानंतर ही सातत्याने ऑफ्टरशॉक येत आहेत. वैज्ञानिकांनी अनुमान लावला की, या परिसरात यापूर्वी आलेल्या मोठ्या भुकंपाप्रमाणे ऑफ्टरशॉक येतील.

हे देखील वाचा- इवाना ट्रंम्प यांनी कुत्र्याला बनवले संपत्तीचा मालक, डोनाल्ड यांच्या हाती आली शून्य रक्कम!

नेदरलँन्ड्सच्या रिसर्चरने केली होती भविष्यवाणी
खरंतर नेदरलँन्ड्सच्या रिसर्च फ्रँक हूरगबीट्सने ३ फेब्रुवारी २०२३ रोजी भविष्यवाणी केली होती की, तुर्की-सीरियाच्या परिसरात तीव्र भुकंप येणार आहेत. ऐवढेच नव्हे तर भुकंपाच्या झटक्यांचे माप ही अचुक सांगितले होते. त्याने असे म्हटले होते की, भूकंपाची तीव्रता ७.५ किंवा त्यापेक्षा अधिक असू शकते. या भविष्यवाणी नंतर जे झाले ते पाहून सर्व जगात खळबळ उडाली आहे. भुकंपामुळे तुर्की आणि सीरियात खुप नुकसान झाले आहे. हजारो इमारती जमिनदोस्त झालीत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.