Home » Tulsidas: रामचरितमानस ग्रंथाची रचना करणाऱ्या संत तुलसीदासांची आज जयंती

Tulsidas: रामचरितमानस ग्रंथाची रचना करणाऱ्या संत तुलसीदासांची आज जयंती

by Jyotsna Kulkarni
0 comment
Tulsidas
Share

संत तुलसीदास हे नाव तसे सगळ्यांच्याच परिचयाचे आहे. ‘रामचरितमानस’ हा ग्रंथाचे लेखक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. भारतातील महान संतांमध्ये संत तुलसीदासांचे नाव आवर्जून घेतले जाते. तुलसीदासांनी त्यांच्या जीवनात अनेक महान ग्रंथांचे लेखन केले. अशा या संत तुलसीदास यांची आज जयंती. गोस्वामी तुलसीदास म्हणूनही ओळखले जाते. संत तुलसीदास हे एक रामानंदी वैष्णव हिंदू संत आणि कवी होते, जे रामाच्या भक्तीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी संस्कृत आणि अवधी भाषेत अनेक लोकप्रिय काव्य लिहिली. रामाच्या जीवनावर आधारित संस्कृत रामायणाचे पुनर्लेखन असलेल्या रामचरितमानस या महाकाव्याचे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. (Marathi )

काशी आणि अयोध्या येथे श्रीरामचरितमानस आणि विनय पत्रिका या रचना तुलसीदास यांनी केल्या. आजचा सुप्रसिद्ध पाठ हनुमान चालीसा ही देखील तुलसीदास यांचीच रचना आहे. तुलसीदास यांनीच रामलीला नाट्य-प्रकारची सुरुवात केली, असेही सांगितले जाते. जाणकारांच्या माहितीनुसार संत तुलसीदासांचा जन्म सन १४९७ साली उत्तर प्रदेशच्या चित्रकुट जिल्ह्यातील रामपूर गावात आत्माराम शुक्ल दुबे यांच्या घरी झाला. जन्माच्या वेळी, गोस्वामी पाच वर्षांच्या मुलाप्रमाणेच निरोगी होते झाला. तुलसीदासांचा जन्म झाल्यावर ते रडले नाही तर त्यांनी, जन्म झाल्यानंतर लगेच श्रीरामाचे नाव घेतले असल्याचे देखील सांगितले जाते. त्यामुळे त्यांचे नाव रामबोला असे पडले. त्यांच्या आईच्या अकाली मृत्यूनंतर एका दासीने तुलसीदासांचा सांभाळ केला. काही काळानंतर नरहरीनंद स्वामी नावाचे गृहस्थ शोध घेत घेत तुलसीदासांपर्यंत पोहोचले आणि त्यांनी त्यांना अयोध्येला नेले. (Marathi News)

बारा महिने पोटात राहिल्यानंतर तुलसीदासाचा जन्म झाला, जन्मत:च त्याच्या तोंडात सर्व बत्तीस दात होते, त्याची तब्येत आणि दिसणे पाच वर्षांच्या मुलासारखे होते, आणि तो रडला नाही, अशी आख्यायिका आहे. वयाच्या सहाव्या वर्षी, रामानंदांच्या मठातील वैष्णव तपस्वी नरहरीदास यांनी रामबोलाला दत्तक घेतले होते. रामबोलाला तुलसीदासांच्या नवीन नावाने विरक्त दीक्षा देण्यात आली. (Todays Marathi Headline)

तुलसीदास यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण त्यांचे गुरु नरसिंह दास यांच्या आश्रमामध्ये पूर्ण केले. तुलसीदासजी वयाच्या अवघ्या सात वर्षाचे असताना, त्यांचे पालक आत्माराम व आई तुलसी यांनी त्यांना प्राथमिक शिक्षणासाठी श्री अनंता आनंद जी यांचे प्रिय शिष्य श्री नरसिंह दास स्वामी यांच्या आश्रमामध्ये ठेवले. नरसिंह दास यांच्या आश्रमामध्ये राहून, संत तुलसीदासांनी वयाच्या १४ ते १५ आयु पर्यंत संस्कृत, सनातन धर्म, हिंदी साहित्य, वैदिक तत्त्वज्ञान, व्याकरण, सहा वेदांग, ज्योतिष, इत्यादींचे महत्त्वपूर्ण शिक्षण ग्रहण केले. रामबोला म्हणजेच तुलसीदास, यांचे गुरु नरसिंह दास यांनी रामबोला यांचे नाव बदलून, गोस्वामी तुलसीदास असे ठेवले. शिक्षण पूर्ण करून, संत तुलसीदासांनी आपल्या त्रिकूट या निवासस्थानी परत जाण्याचे ठरवले आणि लोकांना महाभारत कथा, राम कथा, इत्यादी. सांगून लोकांमध्ये प्रबोधनाचे कार्य सुरू केले. (Latest Marathi Headline)

Tulsidas

===================

हे देखील वाचा : shravan : श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी महादेवाला कोणती शिवामूठ व्हायची?

===================

पुढे संत तुलसीदास यांचा विवाह १५२६ च्या दरम्यान बौद्धमती नावाच्या मुलीशी झाला. बौद्धमतीला रत्नावली या नावाने ओळखले जायचे. लग्नानंतर तुलसीदास पत्नीसोबत राजापूर नावाच्या ठिकाणी वास्तव्यास होते. तुलसीदास आणि रत्नावली यांना तारक नावाचा मुलगा झाला. परंतु अगदी कमी वयातच तारकचे निधन झाले. आपल्या पुत्राच्या निधनानंतर आपल्या पत्नी विषयी तुळशीदासांची ओढ प्रचंड वाढली. संत तुलसीदास कोणत्याही परिस्थितीमध्ये पत्नीपासून वेगळे होण्याचा विचार करू शकत नव्हते. एके दिवशी तुळशीदास यांच्या पत्नी तुलसीदास यांना न सांगता माहेरी आई-बाबांना भेटण्यासाठी गेली. जेव्हा तुलसीदासांना याबद्दल समजले तेव्हा, तुलसीदास यांनी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता, फक्त पत्नीला भेटण्यासाठी रात्री सासरच्या घरी जाण्याचे ठरवले. (Top Trending News)

अतिशय कष्ट करून,अधीरपणे तुलसीदास पत्नीला भेटण्यासाठी सासरी पोचले. त्यांची हि अधीरता पाहून हे सर्व पाहून रत्नावलीला खूप वाईट वाटले. रत्नावली तुलसीदास यांना म्हणाली, माझ्या एवढेच प्रेम जर तुम्ही प्रभू रामांवर केलेत तर तुम्ही संसारिक आसक्ती सोडून अमरत्व, शाश्वत सुख, प्राप्त होईल. पत्नीचे हे बोलणे ऐकून, तुलसीदास यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्याचक्षणी संसारिक सुखाचा त्याग करण्याचा आणि रामभक्तीच्या मार्गे चालण्याचा निर्णय घेतला. (Top Marathi News)

संन्यासानंतर, तुलसीदासांनी आपला बहुतेक वेळ वाराणसी, प्रयाग, अयोध्या आणि चित्रकुट येथे घालवला. १४ वर्ष त्यांनी भारतभ्रमण केले. तुलसीदासांनी बारा ग्रंथ लिहिले. रामायण म्हणजे रामचरतमानस हे त्यांचे हिंदीतील सर्वात प्रसिद्ध पुस्तक आहे. हे रामायण उत्तर भारतातील प्रत्येक हिंदू घरात मोठ्या भक्तिभावाने वाचले जाते आणि त्याची पूजा केली जाते. तुलसीदासांनी लिहिलेला विनय पत्रिका हा आणखी एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. तुलसीदास यांनी रामलीला नाट्य-प्रकारची सुरुवात केली, असे सांगितले जाते. हिंदी रामायणाशिवाय डोहावली, कवितावली, गीतावली, कृष्णावली आणि विनयपत्रिका असे ५ ग्रंथ लिहिले. सुप्रसिद्ध हनुमान चालीसा ही तुलसीदास यांचीच रचना आहे. तुलसीदासांनी वेद, उपनिषदे, गीता, भारतीय दर्शने, वाल्मीकि रामायण यांच्या आधाराने आपले विचार लोकांच्या पुढे ठेवले. (Latest Marathi News)

===================

हे देखील वाचा : Shravan : श्रावण विशेष : त्र्यंबकेश्वर मंदिराचा इतिहास

===================

तुलसीदासांची रामावर आणि हनुमानावर अपार श्रद्धा होती. त्यांना हनुमानाचे, शिवाचे आणि रामाचे साक्षात दर्शन झाले होते, अशीही भाविकांची श्रद्धा आहे. एका रात्री त्यांना प्रत्यक्ष शिव-पार्वतीने दर्शन देऊन सांगितले की, तुम्ही हिंदीतून लेखन करा. त्याला सामवेदासमान महती प्राप्त होईल. देवाला साष्टांग नमस्कार घालून त्यांनी हिंदीत रचना सुरू केली. श्रीरामचरितमानस लिखाणासाठी त्यांना प्रत्यक्ष भगवान श्रीराम यांनी आज्ञा केली होती असे मानले जाते. त्यांनी संस्कृतमधील वाल्मीकी रामायणाचे अवधी भाषेत रुपांतर करून त्याचे नाव ‘रामचरितमानस’ असे ठेवले. रामनवमीच्या दिवशीच तुलसीदासांनी रामचरितमान32स रचण्यास सुरुवात केली. तब्बल दोन वर्षे, सात महिने आणि २६ दिवसांनी म्हणजे रामविवाहाच्या दिवशीच रामचरितमानस लिहून पूर्ण झाले. संत तुलसीदास यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी १६८० मध्ये गंगा नदीच्या काठी आपला नश्वर देह सोडला. त्यांच्या पार्थिवावर वाराणसीतील गंगा नदीवरील आसी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.