दिवाळी झाल्यानंतर आपल्याकडे तुळशीचे लग्न लावण्याची मोठी परंपरा आहे. हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला तुळशी विवाह असतो. यादिवशी भगवान विष्णू आणि तुळशी यांचा विवाह सोहळा पार पडतो. धार्मिक श्रद्धेनुसार, तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवनात आनंद, प्रेम आणि स्थिरता येते सोबतच इतर सर्व अडथळे दूर होतात. दरवर्षी कार्तिक शुक्ल द्वादशी तिथीला तुळशी विवाह हा सण साजरा केला जातो. (Tulshi Vivah)
हिंदू पंचांगानुसार, २ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:३१ वाजल्यापासून कार्तिक शुक्ल द्वादशी तिथी सुरू होत आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ नोव्हेंबर रोजी समाप्त होईल. उदय तिथीनुसार २ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह साजरा केला जाईल. तुळशी विवाहाच्या दिवशी जर तुम्ही काही सोपे आणि साधे उपाय केले, तर यामुळे अनेक विवाह इच्छुक लोकांचे लग्न लवकर ठरेल, आनंदी वैवाहिक जीवन मिळेल आणि घरामध्ये लक्ष्मी देखील आनंदाने नांदेल. (Marathi News)
* तुळशी विवाहाच्या दिवशी सौभाग्याच्या वस्तू कुंकू, अलंकार, बांगड्या, लाल साडी , शेंदूर तुळशीच्या चरणी अर्पण कराव्या. असे केल्याने अखंड सौभाग्य लाभते. (Top Stories)
* तसेच, कच्चं दूध, मिठाईचा नैवेद्य दाखवावा. पूजेच्या नंतर या वस्तू एखाद्या गरीब सुवासिनीला अर्पण करा. यामुळे दूर्भाग्य दूर होऊन घरात सुख-समृद्धी येते.
* ॐ तुलसीदेव्यै च विद्महे, विष्णुप्रियायै च धीमहि, तन्नो वृन्दा प्रचोदयात् ।। तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी पूजेच्या दरम्यान या मंत्राचा जप करा. यामुळे सुखी वैवाहिक जीवांची प्राप्ती होते. (Todays Marathi HEadline)
* तुळशी विवाहाच्या दिवशी भगवान शालिग्राम आणि देवी तुळशीचा विवाह केला जातो. या दिवशी हा विवाह विधीनुसार संपन्न करावा. तसेच, तुळशी मंत्राचा जप करावा. यामुळे वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदते.

* तुळशी विवाहाच्या दिवशी तुमच्या जोडीदाराबरोबर मंगलाष्टकाचं पठण करावं. यामुळे पती-पत्नीच्या नात्यात गोडवा निर्माण होईल.
* तुळशी विवाहाच्या दिवशी पिवळ्या रंगाचा धागा घेऊन त्याला १०८ गाठी बांधा. त्यानंतर हा धागा तुळशीच्या रोपाला बांधा. त्यानंतर विधीवत पूजा करा.
* घरात सारखे वाद होत असतील, अशांत वातावरण निर्माण होत असेल, तर तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा संचारते आणि आर्थिक अडचणी हळूहळू दूर होऊ शकतात. (Marathi Trending Headline)
* बाळासाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्याने आवर्जून तुळशी विवाह सण साजरा करावा. भगवान शालिग्राम आणि तुळशीचे विधीवत लग्न लावल्यास घरात लवकरच पाळणा हलू शकतो.
* तुळशी विवाहाच्या दिवशी अविवाहित मुला-मुलींनी इच्छित वर-वधूच्या प्राप्तीसाठी उपवास करावा आणि तुळशी मातेची पूजा-अर्चा करावी. पूजेदरम्यान तुळशीला हळद मिश्रित दूध अर्पण करावे. (Top Marathi News)
* तुळशी विवाहाच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्यानंतर, सूर्य देवाची पूजा केली जाते. असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि वैवाहिक जीवन आनंदी होते असे मानले जाते. जे लोक हे लग्न त्यांच्या घरी करतात त्यांना भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचे विशेष आशीर्वाद मिळतात.
* तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचे पान स्वच्छ लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे. असे मानले जाते की या उपायाने आर्थिक समस्या दूर होतात आणि पैशाची कमतरता राहत नाही. (Latest Marathi Headline)
* या दिवशी भगवान विष्णूची पूजा करताना त्यांच्यासमोर कुंकू, पिवळे चंदन किंवा हळदीचा तिलक लावणे शुभ मानले जाते. यानंतर त्याला पिवळी फुले अर्पण केली जातात. असे केल्याने भगवान विष्णू लवकर विवाहाची कृपा देतात आणि विवाहातील अडथळे दूर होतात.
* तुळशी विवाहाच्या दिवशी श्री हरी विष्णू आणि तुळशीची विधिवत पूजा करावी. कच्च्या दुधात तुळस मिसळून भगवान विष्णूना अभिषेक करावा. अभिषेक करताना, तुलसी श्रीमहालक्ष्मीरविद्या यशस्विनी । धर्मया धर्मान्ना देवी देवीदेवमनः प्रिया । लाभे सूत्र भक्तिमंते विष्णुपदम् लभेते । तुलसी भूरमहलक्ष्मी: पद्मिनी श्रीहरहरप्रिया। या मंत्राचा उच्चार करावा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते आणि तुळशी मातेचा आशीर्वादही प्राप्त होतो. (Top Trending News)
=======
Tulshi Vivah : यंदा तुळशी विवाह कधी आहे? जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त
Devuthani Ekadashi : कार्तिक महिन्यात येणाऱ्या देवउठणी एकादशीचे महत्त्व आणि माहिती
=======
* तुळशीला केशर मिसळलेले दूध अर्पण करावे. असे मानले जाते की हा उपाय केल्याने व्यक्तीला इच्छित विवाह होतो आणि लवकरच लग्न होण्याची शक्यता असते.
* तुळशीविवाहाच्या दिवशी पूजा करताना पद्मासनात बसून ध्यान करावे. मानसिक शांती आणि आंतरिक आनंदासाठी हा एक शक्तिशाली उपाय आहे. तुळशी विवाहादरम्यान उपासना केल्याने मानसिक शांती आणि आनंद मिळतो आणि कुटुंबात शांती नांदते. (Social News)
(टीप: या ठिकाणी दिलेली माहिती केवळ माहितीसाठी दिली जात आहे.आम्ही कोणत्याही गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
