आपल्याकडे आषाढ महिन्यात देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरु होतो. या चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्राधीन होतात आणि चार महिने ते निद्रिस्त असतात. या काळाला चातुर्मास म्हटले जाते. या चार महिन्याच्या काळात भगवान शिव सृष्टीचा कारभार बघतात. चातुर्मासाचा काळ हा कार्तिक महिन्यातील कार्तिकी एकादशीला संपतो. याच कार्तिकी एकादशीला देव उठनी एकादशी देखील म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णू निद्रेतून जागे होतात आणि पुन्हा त्यांचा सृष्टीच्या पालनाचा कारभार बघण्यास सुरुवात करतात. (Diwali)
चातुर्मासाच्या चार महिन्याच्या काळात लग्न आणि इतर कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. मात्र कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुळशीचे श्रीविष्णूसोबत लग्न लावले जाते आणि मग सर्व शुभ कार्य सुरु होतात. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला तुळशी विवाह असतो. यादिवशी भगवान विष्णू आणि आई तुळशीच्या शालिग्राम रूपाचा विवाह सोहळा पार पडतो. धार्मिक श्रद्धेनुसार, तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवनात आनंद, प्रेम आणि स्थिरता येतेसोबत सर्व अडथळे दूर होतात. (Marathi)
हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाहाला मोठे महत्त्व आहे. तुळशी विवाहापूर्वी देवउठणी एकादशीचे व्रत केले जाते. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. कार्तिक एकादशीचा दिवस अनेक ठिकाणी दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो. तुळशीचे लग्न अगदी थाटामाटात पार पडल्यानंतर अनेक शुभ कार्याला सुरुवात होते. तुळशी विवाहाची पौराणिक कथा आणि महत्व जाणून घेऊया. (Tulshi Vivah)

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी तिथी २ नोव्हेंबर २०२५ ला सकाळी ७:३१ वाजेपासून ३ नोव्हेंबर २०२५ पहाटे ५:०७ वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार तुळशी विवाह उत्सव रविवारी २ नोव्हेंबर २०२५ ला असणार आहे. कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला जातो. त्यानुसार ०२ नोव्हेंबरपासून ०५ नोव्हेंबपर्यंत तुळशी विवाह असणार आहे. (Marathi)
तुळशी विवाहाचे महत्त्व
तुळशी विवाहानंतर लग्नासारख्या शुभ कार्यांसाठी मुहूर्त सुरू होतात. या दिवसापासून लग्न, मुंज अशा अन्य शुभकाऱ्यांना प्रारंभ केला जातो. या विवाहामुळे कन्यादान केल्याचे पुण्य मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. तुळशीचे रोप हे पवित्र मानले जाते आणि विष्णूचा शालिग्राम अवतार याच्याशी तिचा विवाह लावणे हे एक महत्त्वाचे आध्यात्मिक कार्य मानले जाते. तुळशी विवाह कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी किंवा द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत केला जातो. तुळशी विवाहाचे महत्त्व हे तुळस आणि भगवान विष्णू यांच्याशी त्यांच्या शालिग्राम रूपात यांच्या विवाह सोहळ्यात आहे, जो कार्तिक महिन्यातील एकादशी किंवा द्वादशी ते पौर्णिमेदरम्यान साजरा होतो. (Marathi Trending Headline)
तुळशी विवाहामुळे कन्यादानाचे पुण्य मिळते, असे मानले जाते आणि यानंतर लग्नाचे शुभमुहूर्त सुरू होतात. तुळशी विवाह केल्याने विष्णूदेवाची कृपा आपल्यावर राहते. आणि जीवनात सुखसमृद्धी येते. धार्मिक मान्यतेनुसार, ज्या तरुण किंवा तरुणींमध्ये लग्नाशी संबंधित समस्या येतात आणि ज्यांना लवकर लग्न करण्याची इच्छा आहे, त्यांनी तर तुळशी विवाह विधी नक्कीच केला पाहिजे. यामुळे लग्नात येणाऱ्या बाधा दूर होऊ शकतात. तुळशी विवाह केल्याने व्यक्तीच्या कुटुंबात सुख-शांती तसेच समृद्धी आणि वैभव प्राप्त होते, असे म्हटले जाते. ज्या घरात तुळशी विवाह केला जातो त्या घरात कधीही दारिद्र्य येत नाही आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद नेहमी मिळतो. (Top Stories)
विवाहाच्या आदल्या दिवशी तुळशी वृंदावन किंवा तुळशीची कुंडी रंगवून सुंदर करतात. कुंडी किंवा वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा अन् आवळे ठेवतात. हा विवाह सोहळा गोरज मुहूर्तावर अर्थात सायंकाळी करतात. दिवाळी झाल्यानंतर दरवर्षी तुळशीचे लग्न थाटामाटात लावले जाते. घराच्या अंगणामध्ये असणाऱ्या तुळशी वृंदावनाला सजवण्यात येते. तुळशीच्या रोपट्याभोवती ओढणी किंवा लाल रंगाचे वस्त्र चढवा. तुळशी विवाहाला तुम्हाला तुमचे अंगण आकर्षक रांगोळ्यांनी सजवायचे असेल, तर छान रांगोळी काढावी. (Todays Marathi Headline)

प्रत्येकजण आवडी प्रमाणे तुळशीला सजवतो. काही जण तुळशीच्या रोपट्याला साडी देखील नेसवतात. तुळशीला नवरीसारखे सजवण्यात येते. तुळशीची गौरीप्रमाणे पूजा करतात. तिला साडी, चोळी, नथ, सोन्याचे दागिने घालतात. सोन्याचे मंगळसूत्र, चांदीची जोडवी, खणा-नाराळाने ओटी भरतात. तुळशीला नैवद्याचे गोड पदार्थ घराण्याच्या परंपरेनुसार केले जातात. लक्ष्मी-नारायणाची मूर्ती व तुलसीपत्रासोबत सोने आणि चांदीची तुळस आसनावर ठेवावी, यजमानाने म्हणजे श्रीकृष्णाने पत्नीसोबत उत्तराभिमुख आसनावर बसवावे. गोरज मुहूर्तावर वराचे पूजन करावे. तुळशीचा विवाह केल्याने भगवाण विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होते. (Top Trending Headline)
कारण, पोथी-पुराणात सांगितलेल्या कथेनुसार तुळस ही लक्ष्मीचे तर भगवान विष्णूने शाळीग्रामचे रुप धारण केले होते. त्यांनी असे का केले याचे उत्तर ब्रह्मवैवर्त पुरानातील कथेत मिळते. प्रसादासाठी मिठाई ठेवली जाते. महाराष्ट्रात तुळशीच्या विवाहासाठी बोरं, आवळा, चिंच या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर काही ठिकाणी मुळा, बीट, शिंगाडा, सीताफळ, पेरू आणि इतर फळंही ठेवतात. लग्नासाठी करतात तसे फराळाचं जिन्नस लाडू, चिवडा, पेढे, मिठाईचे पदार्थही घरी केले जातात किंवा विकत आणले जातात. तुळशी विवाहाची पूजा ही प्रत्येक जणं आपल्या पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीप्रमाणे आणि रीतीप्रमाणे संपन्न करतात. (Latest Marathi News)
पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, एकेकाळी जालंधर नावाच्या राक्षस होता. हा राक्षस खूप क्रुर आणि अत्याचारी होता. त्याच्या अत्याचाराने त्रासलेल्या देवांनी विष्णूजवळ जाऊन आपली व्यथा मांडली. पण जालंधरला हरविणे कठिन होते. कारण, त्याची पत्नी वृंदा ही एक पतिव्रता आणि पवित्र स्त्री होती जी, आपल्या पतीवर खूप प्रेम करायची. एकदा देव आणि दानवांमध्ये युद्ध झाले, त्या युद्धात जालंधरलाही जावे लागले. तेव्हा वृंदाने आपल्या पतीला सांगितले की, युद्धात तुमच्या विजयासाठी मी विधी करीन आणि तुम्ही परत येईपर्यंत मी माझा संकल्प सोडणार नाही. (Top Marathi News)
यानंतर जालंधर युद्धावर गेला आणि वृंदाच्या व्रताच्या प्रभावामुळे जालंधरने देवांना वेठीस धरले. जालंधरला पराभूत करणे फार कठीण असल्याचे देवांच्या लक्षात आले. हे देवांना समजल्यावर ते श्रीहरी विष्णूंकडे गेले. तेव्हा श्रीहरी विष्णू जालंधरचे रूप घेऊन वृंदाच्या महालात पोहोचले. वृंदाने आपल्या पतीला पाहताच ती ताबडतोब पूजेतून उठली आणि जालंधरच्या रूपातील विष्णूंच्या चरणांना स्पर्श केला. अशाप्रकारे वृंदाचा पूजा न सोडण्याचा संकल्प भंग झाला आणि युद्धात जालंधरचा वध झाला. यानंतर जालंधरचे मस्तक वृंदाच्या महालात पडले. (Latest Marathi Headline)
वृंदाला समजले नाही की, जमिनीवर पडलेले डोके जर तिच्या नवऱ्याचे असेल तर तिच्या समोर कोण आहे? त्यानंतर भगवान विष्णू त्यांच्या प्रत्यक्ष रूपात आले. आपला विश्वासघात झाला हे लक्षात आल्याने वृंदा खूप दुखी झाली आणि तिने श्रीहरी विष्णूला शाप दिला, वृदाच्या शापामुळे श्रीहरी विष्णू दगडात रुपांतरीत झाले. मात्र श्रीहरी विष्णू दगडात रुपांतरीत होताच सर्वत्र हाहाकार माजला. तेव्हा माता लक्ष्मीने श्रीहरी विष्णूजींना शापातून मुक्त करण्यासाठी वृंदाला प्रार्थना केली. (Top Trending News)
=========
Devuthani Ekadashi : कार्तिक महिन्यात येणाऱ्या देवउठणी एकादशीचे महत्त्व आणि माहिती
Tulshi Vivah : यंदा तुळशी विवाह कधी आहे? जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त
=========
माता लक्ष्मीच्या प्रथनेनंतर वृंदाने श्रीहरी विष्णूला शापातून मुक्त केले आणि स्वत: पतीचे मस्तक घेऊन सती झाली. मान्यतेनुसार, ज्या ठिकाणी वृदाने स्वतःला आग्निच्या स्वाधिन केले त्या ठिकाणी तिच्या राखेतून एक रोप उगले. ज्याला विष्णूंनी तुळशी असे नाव दिले आणि असेही सांगितले की, या दगडात शालिग्राम नावाने माझे वास्तव राहील. ज्याची नेहमी तुळशीजीसोबत पूजा केली जाईल. तसेच विष्णूने तुळशीला वरदानही दिले की तुळशीशिवाय अन्नही स्वीकारणार नाही. तेव्हापासून तुळशीजींची पूजा सुरू झाली आणि कार्तिक महिन्यातील द्वादशी तिथीला शालिग्रामजींसोबत तुळशीचा विवाहाची प्रथा देखील सुरू झाली. (Social News)
(टीप: या ठिकाणी दिलेली माहिती केवळ माहितीसाठी दिली जात आहे.आम्ही कोणत्याही गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
