कार्तिकी एकादशीला तुळशी विवाहाची सुरु होते. चातुर्मासामध्ये सर्व शुभ कार्य बंद असतात. मात्र कार्तिक महिन्यातील कार्तिकी एकादशीला तुळशी विवाह करून चातुर्मासाची सांगता होते आणि शुभ कार्यांची सुरुवात देखील होते. त्यामुळे तुळशी विवाहाला मोठे महत्त्व देण्यात आले आहे. कार्तिकी एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या काळात तुळशी विवाह संपन्न केला जातो. तुळशी विवाहाच्या दिवशी भगवान विष्णू यांच्या शाळीग्राम रूपाचे तुळशीसोबत लग्न लावले जाते. या प्रथेला देखील मोठे धार्मिक कारण आहे. (Tulshi Vivah)
यंदा द्वादशी तिथी २ नोव्हेंबर रविवारी सकाळी ७ वाजून ३१ मिनिटांनी सुरू होईल आणि ३ नोव्हेंबर सोमवारी सकाळी ५ वाजून ०७ मिनिटांपर्यंत राहील. त्यामुळे, तुळशी विवाह २ नोव्हेंबर रविवारी साजरा केला जाईल. यादिवशी दिवसभरात कधीही तुलसी विवाह करू शकता, पण संध्याकाळी प्रदोष काळ (सूर्यास्तानंतर २.५ तास) किंवा रात्री अधिक शुभ मानला जातो. सकाळी किंवा संध्याकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत. पुराणांनुसार, वृंदा ही विष्णूची भक्त होती. तिचा पती जलंधर याचा वध विष्णूने केला, ज्यामुळे ती सती गेली आणि तिच्या अस्थींमधून तुळशीचे झाड झाले. तुळशी विवाहाने विष्णू जागृत होतात आणि भक्तांना कन्यादानाचे फळ मिळते. तुळशी विवाह कसा करायचा? याचा विधी काय आहे? चला जाणून घेऊया. (Marathi News)
तुळशी विवाहाच्या आदल्या दिवशी तुळशी वृंदावन रंगवून सुशोभित करतात. तुळशी विवाहासाठी हळद, शालीग्राम, गणेशमूर्ती, श्रृंगाराचं साहित्य, विष्णू मूर्ती, बताशा, फळे, फुले, धूप-दीप, हळद, हवन साहित्य, ऊस, लाल ओढणी, अक्षता, कुंकू, हळद, अक्षता, तीळ. तूप, आवळा, मिठाई, तुळस यासह पूजेसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची तयारी करून ठेवावी. या लग्नादरम्यान बोर भाजी आवळा कृष्ण देव सावळा असा जयघोष केला जातो. तुळशीच्या रोपट्याभोवती ओढणी किंवा लाल रंगाचे वस्त्र लावावे. (Todays Marathi Headline)

तुळशीला साडी, चोळी, नथ आदी दागिने घालावे. तुळशी विवाहासाठी दारासमोर छान अशी सुंदर रांगोळी काढावी. तुळशी वृंदावन, तसेच कुंडी रंगवून त्यावर राधा-दामोदरचे चित्र काढावे. तुळशी वृंदावनाला गेरू-चुन्याने रंगरंगोटी करावी. तुळशीला नवीन साडी नेसवण्याची परंपरा असल्याने तिच्यावर कोरे वस्त्र पांघरावे. त्यावर मांडव म्हणून उसाची किंवा धांड्याची छोटी खोपटी लावावी. वृंदावनाभोवती रांगोळी काढावी, फुले, मंगल घड्यांचे मंडप तयार करावे. शेजारी शालिग्राम किंवा बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी. (Marathi Trending Headline)
तुळशीला नवरीसारखे सजवण्यात येते. तुळशीची गौरीप्रमाणे पूजा करतात. तिला साडी, चोळी, नथ, सोन्याचे दागिने घालतात. सोन्याचे मंगळसूत्र, चांदीची जोडवी, खणा-नाराळाने ओटी भरतात. तुळशीला नैवद्याचे गोड पदार्थ घराण्याच्या परंपरेनुसार केले जातात. लक्ष्मी-नारायणाची मूर्ती आणि तुलसीपत्रासोबत सोने किंवा चांदीची तुळस आसनावर ठेवावी. गोरज मुहूर्तावर वराचे पूजन करावे. (Top Stories)
सुरुवातीला गणपती पूजन करावे. विष्णूला जागे करण्यासाठी प्रार्थना करावी. कर्त्याने तुळशीचे कन्यादान करावे. बाळकृष्ण किंवा शालीग्राम आणि तुळशीमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणत फेरे घ्यावे. मंगलाष्टकानंतर आरती, नैवेद्य दाखवा. तूपाचा दिवा लावा. तुळशीपत्रे आणि पान वाटावे. विवाहानंतर तुळशीला ब्राह्मण दान करा किंवा वृंदावनात ठेवा. संध्याकाळी तूपाचा दिवा लावून पूजा करावी. (Marathi Top Headline)
तुळशीचा विवाह केल्याने भगवाण विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होते. कारण, पोथी-पुराणात सांगितलेल्या कथेनुसार तुळस ही लक्ष्मीचे तर भगवान विष्णूने शाळीग्रामचे रुप धारण केले होते. त्यांनी असे का केले याचे उत्तर ब्रह्मवैवर्त पुरानातील कथेत मिळते. मुहूर्तानुसार बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरुन मगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. नंतर ब्राह्मण भोजन करवून मग स्वत: अन्न ग्रहण करण्याची पद्धत असते. (Latest Marathi News)
तुळशी विवाह झाल्यानंतर श्री तुळशी नामाष्टकाचा जप करावा. हा जप केल्याने अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते. या नामाष्टकाचा पाठ तुळशीच्या पूजेसोबत केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि धनलाभाचे योग जुळून येतात. या स्तोत्राचा जप केल्याने पापांचा नाश होतो. तुळशीला भगवान विष्णूचे निवासस्थान मानले जाते. त्यामुळे तुळशीची पूजा आणि नामाष्टकाचा जप केल्याने मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो. (Top Trending News)
=======
Tulshi Vivah : यंदा तुळशी विवाह कधी आहे? जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त
Tulshi Vivah : जाणून घ्या तुळशी विवाहाचे महत्त्व आणि कथा
=======
श्री तुळशी नामाष्टक स्तोत्रम्
वृंदा, वृन्दावनी, विश्वपुजिता, विश्वपावनी ।
पुष्पसारा, नंदिनी च तुलसी, कृष्णजीवनी ॥
एत नाम अष्टकं चैव स्त्रोत्र नामार्थ संयुतम ।
य:पठेत तां सम्पूज्य सोभवमेघ फलं लभेत ॥
वृन्दायै नमः ।
वृन्दावन्यै नमः ।
विश्वपूजितायै नमः ।
विश्वपावन्यै नमः ।
पुष्पसारायै नमः ।
नन्दिन्यै नमः ।
तुलस्यै नमः ।
कृष्णजीवन्यै नमः ॥ (Social News)
(टीप: या ठिकाणी दिलेली माहिती केवळ माहितीसाठी दिली जात आहे.आम्ही कोणत्याही गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
 
			         
														