Home » तुळशी विवाहाचे महत्व आणि कथा

तुळशी विवाहाचे महत्व आणि कथा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Tulsi Vivah
Share

आपल्या हिंदू धर्मामध्ये चातुर्मास असलेल्या काळात कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य समजले जाते. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या चार महिन्याचा काळ म्हणजेच चातुर्मास समजला जातो. दिवाळी नंतर कार्तिक महिन्यात येणारी एकादशी अर्थात कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो आणि शुभ कार्य करण्यास सुरुवात होते. मात्र त्याआधी या एकादशीच्या दिवशी आपल्याकडे तुळशी विवाह करण्याची परंपरा आहे.

कार्तिक एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. या दिवसानंतर शुभ कार्य आणि लग्नसराईला सुरुवात होते. असे म्हटले जाते या दिवशी उपवास करुन भगवान विष्णूची आराधना केल्याने जीवनातील अनेक पापे नष्ट होतात तसेच दु:ख देखील दूर होते. कार्तिक एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या काळात एका तुळशी विवाहचा कार्यक्रम केला जातो. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचे भगवान विष्णूसोबत लग्न लावले जाते. या तुळशी विवाहाची देखील एक पौराणिक कथा आहे. जाणून घेऊया त्या कथेबद्दल.

तुळशी विवाह कथा
पौराणिक कथेनुसार एकदा शिवाने आपले तेज समुद्रात टाकून दिले. त्याच्या पोटी महातेजस्वी बालक जन्माला आले. हे बालक पुढे जालंधर नावाचा पराक्रमी राक्षसी राजा बनला. त्याच्या राज्याचे नाव जालंधर नगरी होते.

दैत्यराज कालनेमी यांची कन्या वृंदा हिचा विवाह जालंधरशी झाला होता. जालंधर हा महाराक्षस होता. आपल्या पराक्रमासाठी त्यांने माता लक्ष्मी प्राप्त करण्याच्या इच्छेने युद्ध केले. पण त्याचा जन्म सागरातून झाल्याने देवी लक्ष्मीने त्याला भाऊ म्हणून स्वीकारले. तेथून पराभूत झाल्यानंतर देवी पार्वतीला प्राप्त करण्याच्या इच्छेने तो कैलास पर्वतावर गेला.

त्याने शंकराचे रुप धारण करुन देवी पार्वतीच्या जवळ गेला. परंतु, त्यांच्या तपस्येने आणि सामर्थ्याने लगेलच ओळखून त्या अंतर्ध्यान झाल्या. देवी पार्वतीने क्रोधित होऊन संपूर्ण कथा भगवान विष्णूला सांगितली. जालंधरची पत्नी वृंदा ही अतिशय धार्मिक होतील. जालंधर तिच्या पुण्यधर्माच्या सामर्थ्याने मारला गेला नाही. जालंधरचा नाश करण्यासाठी वृंदाचा पतिव्रता धर्म मोडणे आवश्यक होते.

त्यामुळे भगवान विष्णू ऋषींच्या अवतारात जंगलात पोहोचले. वृंदा त्या जंगलातून एकटीच जात होती. विष्णूसोबत दोन राक्षस होते ज्यांना बघून ती घाबरली. ऋषींनी वृंदासमोर क्षणार्धात दोघांचेही वध केले. त्यांची शक्ती पाहून वृंदाने कैलास पर्वतावर महादेवाशी युद्ध करत असलेल्या आपल्या पतीबद्दल विचारले. ऋषींनी आपल्या भ्रमाच्या सापळ्यातून दोन वानर प्रकट केले. एका माकडाच्या हातात जालंधरचे डोके आणि दुसऱ्याच्या हातात धड होते. पतीची ही अवस्था पाहून वृंदा बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यावर तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी ऋषी देवाकडे विनवणी केली.

भगवंतांनी पुन्हा आपल्या भ्रांतीने जालंधरचे मस्तक शरीराला जोडले, पण त्यांनी स्वतःही त्याच्या शरीरात प्रवेश केला. वृंदाला या फसवणुकीची किंचितही जाणीव झाली नाही. वृंदा परमेश्वरासोबत पत्नीप्रमाणे वागू लागली, त्यामुळे तिचे पावित्र्य नष्ट झाले. हे घडताच वृंदाच्या पतीचा जालंधर युद्धात पराभव झाला. जेव्हा वृंदाला ही सर्व लीला कळली तेव्हा तिला राग आला आणि तिने भगवान विष्णूला हृदयहीन शिला असल्याचा शाप दिला. विष्णूने आपल्या भक्ताचा शाप स्वीकारला आणि शाळीग्राम दगडात ते विलिन झाले.

विश्वाचा निर्माता दगड झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली होती. असे झाल्याने सर्व देवतांनी वृंदाची भगवान विष्णूंना शापातून मुक्त करू द्या अशी प्रार्थना केली. वृंदाने विष्णूला शापातून मुक्त केले आणि स्वत: आत्मदाह केला. जिथे वृंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रोप उगवले होते.
भगवान विष्णू वृंदाला म्हणाले: हे वृंदा. तुझ्या पवित्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस. आता तुळशीच्या रूपाने तू सदैव माझ्यासोबत असशील. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देव-उठनी एकादशीचा दिवस तुळसी विवाह म्हणून साजरा केला जातो. जो तुळशीचा विवाह माझ्या शाळीग्राम रूपाशी करेल, त्याला परलोकात विपुल यश मिळेल, अपार कीर्ती मिळेल असा आशीर्वाद दिला.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.