Home » तुळशी विवाहाची पौराणिक कथा

तुळशी विवाहाची पौराणिक कथा

प्रत्येक वर्षातील कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात्या एकादशीला भगवान विष्णूचे शालीग्राम रुप आणि देवी तुळशीचा विवाह मोठ्या धुमधामात साजरा केला जातो.

by Team Gajawaja
0 comment
tulsi vivah 2023
Share

प्रत्येक वर्षातील कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात्या एकादशीला भगवान विष्णूचे शालीग्राम रुप आणि देवी तुळशीचा विवाह मोठ्या धुमधामात साजरा केला जातो. काही लोक द्वादशीच्या तिथीला तुळशी विवाह करतात. तुळस भगवान विष्णुला फार प्रिय आहे. तुळशीशिवाय भगवान विष्णू भोग स्विकार करत नाहीत. पण तुम्हाला याची पौराणिक कथ माहितेय का? खरंतर भगवान विष्णुंपूर्वी तुळशीचा विवाह राक्षस कुलातील एका असुरासोबत झाला होता. ऐवढेच नव्हे तर तुळशीचा जन्म राक्षस कुळात झाला होता. राक्षस कुळात जन्मल्यानंतरही भगवान विष्णुला तुळस का प्रिय आहे हे जाणून घेऊयात. (Tulsi Vivah 2023)

असे मानले जाते की, तुळस आधीच्या जन्मात एक मुलगी होती. तिचे नाव वृंदा असे होते आणि राक्षस कुळात तिचा जन्म झाला होता. राक्षस कुळात जन्मलेली ती लहानपणापासून भगवान विष्णुची भक्त होती. जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तिचा विवाह राक्षस कुळातील दानव राजा जलंधर सोबत झाला होता. राक्षस जालंधरची उत्पत्ती समुद्रातून झाली होती. वृंदा ही फार पवित्र स्री होती. ती आपल्या पतिची नेहमीच सेवा करायची.

जेव्हा एकदा देवता आणि दानवांमध्ये युद्ध झाले तेव्हा जलंधर युद्धावर जात होता तेव्हा वृंदाने म्हटले की, तुम्ही युद्धावर जात आहात. जो पर्यंत तेथे असाल तो पर्यंत मी पूजेला बसून तुमच्या यशासाठी अनुष्ठान करेन. जो पर्यंत तुम्ही परतत नाही तो पर्यंत हा संकल्प सोडणार नाही. त्यानंतर जलंधर युद्धासाठी निघून गेला आणि वृंदा व्रताचे संकल्प करत पूजेला बसली. तिच्या व्रताला प्रसन्न होओऊन देवतांना सुद्धा जालंधरला हरवता आले नाही. सर्व देवतांचा जेव्हा पराभव होऊ लागला तेव्हा सर्वजण भगवान विष्णूकडे पोहचले आणि त्याच्याकडे प्रार्थना केली.

भगवान विष्णुने यावर उत्तर देत असे म्हटले की, वृंदा माझी भक्त आहे. त्यामुळे तिला फसवू शकत नाही. यावर देवतांनी असे म्हटले की, भगवान दुसरा कोणता उपाय असेल तर सांगा. पण आमची मदत जरूर करा. यावर भगवान विष्णुंनी जलंधराचे रुप धारण केले आणि वृंदेच्या महलात पोहचले. वृंदाने जसे आपल्या पतिला पाहिले तेव्हा ती पूजेवर लगेच उठी आणि लगेच तिने त्याचे चरणस्पर्श केले. येथेच वृंदाचा संकल्प मोडला गेला, तेथे युद्धात देवतांनी जलंधरला ठार केले. याच दरम्यान त्याचे शीर छाटल्यानंतर ते महलात पडले तेव्हा वृंदाने आश्चर्याने भगवान विष्णुंकडे पाहिले तेव्हा तिने त्यांना जलंधरच्या रुपात पाहिले. (Tulsi Vivah 2023)

तुलसीने भगवान विष्णुंना दिला होता श्राप
यावर भगवान विष्णु आपल्या रुपात आले आणि काहीच बोलू शकले नाही. वृंदाने रागात भगवान विष्णुंना श्राप दिला की, ते दगड होतील. यामुळे ते लगेच दगड झाले. सर्व देवतांमध्ये यामुळे हाहाकार उडाला. देवतांच्या प्रार्थननेनंतर वृंदाने आपला श्राप परत घेतला. त्यानंतर तिने आपल्या पतिने शीर घेत सती झाली. त्याच्या राखेपासून एक झाड तयार झाले तेव्हा भगवान विष्णुंनी त्या झाडाचे नाव तुळस असे ठेवले आणि म्हटले की, मी या दगडाच्या रुपात राहिन. ज्याला शालिग्रामच्या नावाने तुळशीसोबत पूजा केली जाईल.

ऐवढेच नव्हे तर त्यांनी असे म्हटले की, एखाद्या शुभ कार्यात सुद्धा तुळशीच्या भोगापूर्वी काहीच स्विकार करणार नाही. तेव्हापासूनच तुळशीची पूजा केली जाते. कार्तिक महिन्यात तुळशी विवाह पार पाडला जातो. त्याचसोबत देव-उठनी एकादशीच्या दिवशीलाच तुळशी विवाहच्या रुपात साजरा केला जातो.


हेही वाचा- घरात दररोज ‘या’ दिशेला लावा दिवा, होईल धनवर्षाव


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.