रशियातील कामचटकालापासून 136 किलोमीटर पूर्वेला झालेल्या 8.8 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे जगभरात घबराट पसरली आहे. या भूकंपामुळे, रशियापासून जपान आणि अमेरिकेसह 18 देशांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या देशांच्या समुद्रकिना-यावर त्सुनामीचा अलर्ट जाहीर करणारे भोंगे वाजवण्यात येत असून लाखो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. पुढच्या 32 तासापर्यंत हा धोका रहाणार असल्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले आहे. (Japan’s Earthquake)

यात ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड सारख्या देशांचाही समावेश आहे. भूकंपामुळे रशियातील कामचटकालामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली असून जपान आणि अमेरिकेमध्येही तशीच परिस्थिती आहे. या देशांच्या समुद्रकिना-यावर त्सुनामीच्या प्रचंड लाटा आदळू लागल्या आहेत. भूकंपशास्त्रीय सर्वेक्षणानुसार, 8.8 तीव्रतेचा भूकंप हा 1952 नंतर कामचटका प्रदेशात आलेला सर्वात शक्तिशाली भूकंप आहे. 8.8 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर रशियामध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. रशियाच्या सरकारी टेलिव्हिजनवर एका शहराचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात इमारती आणि कचरा समुद्रात तरंगताना दिसत आहे. आता रशियासह त्सुनामीचा धोका सांगितलेल्या देशांच्या किना-यावर प्रचंड वेगानं समुद्राच्या लाटा मारा करीत आहेत. (Latest International News)
सेवेरो-कुरिलस्क या रशियन शहरात त्सुनामीच्या लाटा पोहचल्या आहेत. कुरील बेटाचा काही भाग या त्सुनामीच्या लाटांनी स्वाहा केला आहे. येथील प्रशासनानं आधीच अनेक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले असल्यामुळे मनुष्यहानी टळली आहे. मात्र हजारो नागरिकांची घरे आणि मालमत्ता पाण्याखाली गेली आहे. हा भाग रशियातील दुर्गम पॅसिफिक प्रदेश म्हणून ओळखला जातो. सेवेरो-कुरिलस्कजवळ 3 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या त्सुनामीच्या लाटा उसळल्या आहेत. सर्वात शक्तिशाली लाटेची उंची 15 फूटांपर्यंत पोहोचली होती. येथे भूकंपाचे अनेक धक्केही जाणवल्यानं अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. जुलैच्या सुरुवातीपासून, कामचटकालाजवळील समुद्रात पाच शक्तिशाली भूकंप झाले आहेत. त्यापैकी सर्वात मोठा भूकंप 7.4 तीव्रतेचा होता. तेव्हापासून या भागात आणखी तीव्रतेचा भूकंप येणार अशी भीती व्यक्त होत होती. (Japan’s Earthquake)
आता हिच भीती खरी ठरली आहे. रशियामधील या विध्वंसक भूकंपामुळे सर्वात जास्त भीतीदायक वातावरण तयार झाले आहे ते जपानमध्ये. जपानच्या समुद्रकिना-यावर 15 फूट उंच लाटा उसळत आहेत. पुढील 32 तास अशीच परिस्थिती रहाणार आहे, किंबहुना त्यात अधिक वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केल्यामुळे जपानमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या भूकंपानंतर जपानच्या टोकियो इलेक्ट्रिक पॉवर कंपनीने, फुकुशिमा दाईची आणि फुकुशिमा दैनी अणुप्रकल्पांमधील कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. 2011 मध्ये आलेल्या त्सुनामीमुळे जपानच्या फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पाचे नुकसान झाले होते. त्यामुळे या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आल्यावर लेगच हा प्लांट रिकामा करण्यात आला आहे. (Latest International News)

रशियाच्या कामचटकाला द्वीपकल्पाजवळ झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर अमेरिकेतही त्सुनामीचा धोका आहे. कॅलिफोर्निया, हवाई बेटांवर त्सुनामीच्या लाटांचा प्रकोप दिसू लागला आहे. कॅलिफोर्नियातील मोंटेरी काउंटी शेरीफ कार्यालयाने शक्य तितक्या लवकर स्थानिक परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकन तटरक्षक दलाने आता जबाबदारी घेत बंदरे रिकामी करण्याचे काम सुरु केले आहे. अमेरिकन तटरक्षक दलाने सर्व व्यावसायिक जहाजांना हवाईची बंदरे रिकामी करण्याचे निर्देश असून त्सुनामीचा इशारा मागे घेईपर्यंत कोणत्याही जहाजांना प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. हवाई बेटांवर त्सुनामीचा धोका अधिक असल्यामुळे येथील नागरिक ओआहू या उंच ठिकाणी जाण्यासाठी निघाले आहेत. मोठ्या संख्येनं एकाचवेळी नागरिक बाहेर पडल्यामुळे येथील सर्वच रस्ते जाम झाले आहेत. तर त्सुनामीच्या लाटा अमेरिकेतील अलास्कापर्यंत पोहोचल्या आहेत. (Japan’s Earthquake)
==============
Jodhpur : एलियन, भूकंप आणि कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाचं रहस्य!
=============
पेरूनेही त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. पेरुव्हियन नौदलाच्या त्सुनामी चेतावणी केंद्राने देशाच्या किनारी भागात धोक्याचा इशारा दिला असून तीन मीटरपेक्षा जास्त येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मेक्सिकोमध्येही लोकांना पॅसिफिक किनाऱ्यांपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय होनोलुलुमध्येही त्सुनामीचे सायरन सातत्यानं वाजवण्यात येत असून लोकांना उंच ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान रशियाच्या कामचटकाला द्वीपकल्पात झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने अमेरिकेतील भारतीय नागरिकांना संभाव्य त्सुनामीचा इशारा दिला आहे. कॅलिफोर्निया, अमेरिकेतील इतर पश्चिम किनारी राज्ये आणि हवाई येथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी हा इशारा जारी करण्यात आला आहे. (Latest International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
