प्रत्येक मुलीला, महिलेला लांब आणि दाट केस हवेहवेसे वाटतात. निरोगी, लांबसडक केस हे कायमच स्त्रीच्या सौंदर्यात भर टाकण्याचे काम करतात. मग तो पुरुष असो वा स्त्री, सगळ्यांनाच लांब दाट केस आवडतात. पण मधल्या काही काळापासून केसांशी संबंधित अनेक समस्या वाढल्याचे दिसून येत आहे. याचे एक कारण म्हणजे खराब जीवनशैली आणि रासायनिक उत्पादनांचा जास्त वापर. केस म्हणजे व्यक्तिमत्वाची ओळख. केसांची वाढ चांगली व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा. (Hair Growth)
पण सध्या केसांशी संबंधित समस्या वाढत चालल्यात. या वाढत्या केसांच्या समस्यांचा परिणाम केसांच्या वाढीवर होताना दिसून येत आहे. त्यामुळे अनेक महिला केस लांबसडक आणि सुंदर व्हावे याकरता अनेक प्रयत्न करत असतात. अनेक महिलांना आपले केस लांब करायचे मात्र अनेक औषधं घेऊन देखील त्यांना पाहिजे तो परिणाम दिसून येत नाही. आज आम्ही तुमच्या याच समस्येवर काही घरगुती मात्र रामबाण उपाय घेऊन आलो आहोत. हे उपाय करून नक्कीच तुमची केस वाढीची समस्या सुटेल. ( Hair Care)
तेलाने मसाज करा
केसांना लांब करण्यासाठी नियमित केसांची तेलाने मॉलिश करावी. केसांना निरोगी ठेवण्यासाठी शाम्पू करण्याच्या १ ते २ तास आधी केसांमध्ये तेलाची मॉलिश करणे. तुम्ही नारळाचे तेल, बादाम तेल, रोजमेरी तेल, यांसारख्या तेलाचा वापर करू शकतात. (Lifestyle)
रोज केस धुवू नका
प्रदूषण आणि धूळ-मातीमुळे केस लवकर खराब होतात. त्यामूळे बरेचजण रोज केस धुतात. किंवा १ दिवस सोडून केस धुतात. केसांना अधिक धुतल्यास स्कैल्प कमजोर होते. आणि केसांचे मुळ पण प्रभावित होतात. म्हणून आठवड्यातून १ किंवा २ वेळेसच केस धुवावे. (Marathi)
वेळोवेळी केसांना ट्रिम करा
केसांना वाढण्यासाठी आपण वर्ष वर्षभर केसांना ट्रिम करत नाही. पण असे करणे चुकीचे आहे. कारण केसांच्या ग्रोथसाठी केसांना ट्रिम करणे गरजेचे आहे. म्हणून तुम्ही ३ ते ४ महिन्यांनी एकदा केसांना ट्रिम अवश्य करणे. (TOdays Marathi HEadline)

विविध बियांचे सेवन
केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक घटकांचा साठा भोपळ्याच्या बियांमधे भरपूर प्रमाणात आहे. यात झिंक, मॅग्नेशियम, लोह आणि प्रथिनं असतात, केसांच्या वाढीसाठी हे घटक फायदेशीर मानले जातात. भाजून किंवा सूपमधे आणि सॅलडमध्ये घालून खाऊ शकता. जवसाच्या बियांमधे ओमेगा-3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतं, केसांच्या रोमांचं यामुळे पोषण होतं. त्यामधे लिग्नान्स आणि अँटीऑक्सिडंट्स देखील मोठ्या प्रमाणात असतात, केसांच्या वाढीसाठी हे फायदेशीर आहेत. आहारात जवसाच्या बियांचा समावेश केल्याने केसांच्या वाढीला मदत होऊ शकते. स्मूदी आणि सॅलडमधे खाऊ शकता. (Social Updates)
ऐलोवेरा जेलचा वापर
केसांसाठी ऐलोवेरा खूप फायदेशीर समजले जाते. याचा गर किंवा जेल देखील तितकाच प्रभावी असते. यामुळे स्कॅल्प मॉइस्चराइज होते आणि केसांची खुंटलेली वाढ पुन्हा वेगाने सुरु होते. तुम्ही हे जेल स्कॅल्पवर लावून केवळ ३० मिनिटे ठेवायचे आहे. पाहिजे असल्यास तुम्ही यामध्ये तिळाचे तेल सुद्धा मिक्स करू शकता आणि केसांना लावू शकता. (Top Trending News)
कांद्याचा हेअर पॅक
कांद्याचा रस हा केसांवर एखाद्या जादूसारखा काम करतो. म्हणून अनेक लोकं आपल्या हेअर रुटीन मध्ये याचा वेगवगेळ्या प्रकारे वापर करतात. तुम्हाला जर मोठे केस हवे असतील तर कांद्याचा रस हा उत्तम उपाय आहे. तुम्ही तुमच्या हेअर मास्क मध्ये किंवा हेअर ऑईल मध्ये सुद्धा मिक्स करून लावू करू शकता. बदाम तेल, कांद्याची पेस्ट, व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करून हेअर पॅक बनवा आणि मग केसांवर लावा आणि 45 मिनिटांनी केस धुवून घ्या. (Top Marathi NEws)
गरम पाण्याचा वापर टाळा
आपण बऱ्याचदा केस धुताना गरम पाण्याचा वापर करतो. पण, गरम पाण्याचा वापर करणे टाळावे. केस धुण्यासाठी गरम पाणी वापरल्यास आपले केस लवकर कमकुवत होतात. तसेच केसांचा कोरडे पणा वाढतो आणि केस अधिक खराब होतात. त्यामुळे केस धुण्यासाठी थंड किंवा कोमट पाण्याचा वापर करावा. गरम पाणी वापरु नये. (Latest Marathi HEadline)
========
Health : पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भीमसेनी कापराचे आहेत इतरही अनेक फायदे
========
योग्य आहार घ्या
आपल्या आरोग्यासाठी ज्याप्रमाणे उत्तम आहार आवश्यक असतो. त्यानुसार, केस आणि त्वचेसाठी देखील उत्तम आहार महत्त्वाचा असतो. आहारातून मिळणाऱ्या प्रोटिनमुळे केस लांबसडक, सुंदर आणि जाड होण्यास मदत होते. याकरता तुम्ही तुमच्या आहारात अंडी, सॅल्मन घेऊ शकता. प्रोटीनसाठी मासे, लीन मीट, डेयरी प्रोडक्ट आणि टोफूचे सेवन करावे. (Top Stories)
राईस वॉटर
राईस वॉटर हे केसांच्या वाढीसाठी खरंच उपयुक्त आहे. आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा अप्लाय करूनच तुम्हाला महिन्याभरात खूप जास्त फरक दिसून येतो. राईस वॉटर बनवण्यासाठी आधी तांदूळ शिजवून घ्या. पाणी यात जरा जास्तच ठेवा कारण तेच तुम्हाला हवे आहे. आता कपड्याच्या मदतीने हे पाणी गाळून घ्या. नंतर स्प्रे बॉटल मध्ये भरून ठेवा. थंड झाल्यावर स्प्रे बॉटलच्या मदतीने स्कॅल्पवर लावा. आठवड्यातून २ ते ३ वेळा तरी लावा आणि ४५ मिनिटे असेच ठेवल्यावर शॅम्पूने हेअर वॉश करा. (Social NEws)
(टीप : कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
