Home » Winter : शरीराला उबदार ठेवणाऱ्या ‘या’ चविष्ट सूप रेसिपी नक्की तरी करा

Winter : शरीराला उबदार ठेवणाऱ्या ‘या’ चविष्ट सूप रेसिपी नक्की तरी करा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Winter
Share

हिवाळा सुरु झाला असून, या ऋतूच्या सुरुवातीपासूनच कमालीची थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या १५/२० दिवसांमध्ये सर्वच शहरांचे तापमान कमालीचे कमी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे कपाटातून स्वेटर, शाल, टोपी असे सर्व कपडे बाहेर निघाले आहेत. वातावरणातील वाढत जाणारा गारवा आपल्या शरीरासाठी देखील त्रासदायक ठरू शकतो. कारण थंड वातावरणामुळे आपले शरीर आतून बाहेरून थंड होते आणि सर्दी, खोकला, ताप, घशाला संसर्ग होणे आदी त्रास डोके वर काढायला लागतात. यासाठीच थंडीच्या ऋतूमध्ये कायम आपले शरीर आपण गरम ठेवणे आवश्यक आहे.

हिवाळ्यामध्ये उष्ण पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणावर केले जाते. आज आम्ही तुमच्यासाठी हिवाळ्याच्या निमित्ताने सूपच्या काही सोप्या आणि चविष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत. जेवणाआधी, संध्याकाळी किंवा भूक लागेल तेव्हा तुम्ही सूप नक्कीच घेऊ शकता. चवीला अतिशय सुंदर, पौष्टिक आणि आरोग्यवर्धक पेय म्हणजे सूप. आपण कायमच सूपच्या विविध रेसिपी तरी करत असतो. मात्र आज हिवाळ्यामध्ये घेतले जाणारे सूप कोणते ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Marathi News)

मशरूम सूप
मशरूम सूप घेतल्याने व्हिटॅमिन डी कॅल्शियम शोषण वाढवून हाडांची ताकद दुप्पट करते. याव्यतिरिक्त, त्यात असलेले फॉस्फरस आणि पोटॅशियम हाडे आणि स्नायूंचा थकवा दूर करण्यास मदत करतात. हिवाळ्यात व्हिटॅमिन डीची कमतरता टाळण्यासाठी दररोज एक वाटी मशरूम सूप खूप प्रभावी आहे.

साहित्य
बटण मशरूम – २०० ग्रॅम, बटर – २ चमचे, मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा – १, लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या – २ ते ३, मैदा – १ टेबलस्पून, कुटलेली काळी मिरी – ५ ते ६ ,मशरूम स्टॉक, म्हशीचे दूध – १ वाटी, हेवी क्रीम किंवा व्हीप्ड क्रीम – २ टेबलस्पून, मीठ – चवीनुसार

कृती
मशरूम चांगले धुवा आणि त्यांचे लांब तुकडे करा. आता एक पॅन घेऊन त्यात चिरलेला लसूण व कांदा घाला आणि ढवळा. कांदे मऊ आणि पारदर्शक होईपर्यंत परतून घ्या. आता पॅनमध्ये चिरलेले मशरूम घाला आणि तपकिरी होईपर्यंत शिजवा. जेव्हा त्यातील पाणी सुकू लागेल तेव्हा त्यात मैदा घाला. पिठाचा कच्चा वास निघून जाईपर्यंत मंद आचेवर ढवळत राहा. आता त्यात कुटलेली काळी मिरी घाला आणि चांगले एकजीव करा. एक कप पाणी किंवा मशरूम स्टॉक घाला आणि चांगले मिक्स करा. त्यात दूध घाला आणि थोडा वेळ ढवळत राहा. नंतर मीठ घालून एकजीव करा. सूप घट्ट होईपर्यंत शिजवा. शेवटी त्यात क्रीम घाला आणि वरून कोथिंबीर टाकून सर्व्ह करा. (Winter Special)

Winter

______________________________________________________________________________________________________________________________________

स्वीट कॉर्न सूप
स्वीट कॉर्नमध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे हिवाळ्यात सर्दी, खोकला आणि थंडीशी लढण्याची शरीराची क्षमता वाढते. याशिवाय, हे पचन सुधारण्यासाठी मदत करते आणि ऊर्जा प्रदान करते.

========

Egg-VS-Paneer : हाय प्रोटीन डाएटसाठी: अंड की पनीर? पौष्टिकतेचा महासंग्राम!

Winter Dite : हिवाळ्यात चणा आणि गूळ एकत्र खाणे किती फायदेशीर, तज्ज्ञांचे मत जाणून घ्या

========

साहित्य
स्वीट कॉर्न दाणे – १ कप, कॉर्नफ्लोअर – १ टेबलस्पून, पाणी – ३ कप, बारीक चिरलेला गाजर – २ टेबलस्पून, चिरलेली फुलकोबी – २ टेबलस्पून, चिरलेली मिरची – १ टीस्पून, आले-लसूण पेस्ट – १ टीस्पून, सोया सॉस – १ टीस्पून, मीठ – चवीनुसार, काळी मिरी पावडर – चवीनुसार, तूप किंवा बटर – १ टीस्पून

कृती
एका मिक्सरमध्ये अर्धा कप स्वीट कॉर्न मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा. उरलेले अर्धा कप स्वीट कॉर्न दाणे बाजूला ठेवा. एका पॅनमध्ये तूप किंवा बटर गरम करा. त्यात आले-लसूण पेस्ट घालून परता. नंतर बारीक चिरलेला गाजर, फुलकोबी, आणि मिरची घालून २-३ मिनिटे परतून घ्या. परतलेल्या भाज्यांमध्ये स्वीट कॉर्न पेस्ट आणि उरलेले दाणे घाला. त्यात 3 कप पाणी घालून चांगले हलवा. एका छोट्या वाटीत १ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर थोड्या पाण्यात मिसळून त्याचा गुळगुळीत द्राव तयार करा. हे मिश्रण सूपमध्ये घालून ढवळा, जेणेकरून सूपाला घट्टपणा येईल. सूपाला सोया सॉस, मीठ, आणि काळी मिरी पावडर घालून चांगले मिसळा. सूप ५-७ मिनिटे शिजवा. गरमागरम स्वीट कॉर्न सूप सर्व्हिंग बाऊलमध्ये काढा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. (Marathi News)

______________________________________________________________________________________________________________________________________

काबुली चणा कॉर्न सूप
संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी सूप बनवून प्यावे. सूप बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाहीत. कमीत कमी वेळामध्ये सूप तयार होते. हे सूप आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. तुम्ही बनवलेले सूप लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडेल.

साहित्य
काबुली चणे, कॉर्न, कोबी, गाजर, शिमला मिरची, लसूण, आल्याचे तुकडे, हिरव्या मिरच्या, जिरं, काळीमिरी पावडर, लिंबाचा रस

कृती
काबुली चणा कॉर्न सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम काबोली चणे आणि कॉर्न कुकरमध्ये टाकून व्यवस्थित उकडवून घ्या. त्यानंतर त्यांची जाडसर पेस्ट तयार करा. कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं, आलं, लसूण टाकून लाल रंग येईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्या. त्यानंतर त्यात कॉर्नचे मिश्रण, बारीक कापून घेतलेल्या सर्व भाज्या टाकून व्यवस्थित मिक्स करा. मिक्स करून झाल्यानंतर एक वाफ आल्यावर त्यात पाणी टाकून उकळी काढा. जास्त पाणी टाकू नये. त्यानंतर त्यात पुदिन्याची पाने, लिंबाचा रस, काळीमिरी पावडर टाकून मिक्स करा. (Top Marathi News)

______________________________________________________________________________________________________________________________________

टोमॅटो सूप
टोमॅटोमध्ये व्हिटामिन ए, बी, सी आणि सोडियम, सल्फर, जस्त, पोटॅशियम यासारखी खनिज घटक देखील आढळतात असतात. टोमॅटो सूपमध्ये हलके तळलेले ब्राऊन ब्रेडचे तुकदे टाकून, तुम्ही सूपची चव आणखी वाढवू शकता. टोमॅटो सूप आपल्या शरीरास आतून उबदार ठेवते. तसेच वजन कमी करून, हृदय निरोगी ठेवण्याचे काम देखील करते. टोमॅटोमध्ये पोटॅशिअम आणि मँगनीज भरपूर प्रमाणात असते.

साहित्य
२ टेबलस्पून बटर किंवा ऑलिव्ह ऑईल, १ कांदा चिरलेला, ३-४ बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, २ कप ताजे टोमॅटो, अर्धा टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून गरम मसाला, ५ ते ६ काजू, १ कप क्रीम, मीठ ,मिरपूड

कृती
गॅस चालू करून त्यावर एक मोठा पॅन ठेवा. गरम झाल्यावर त्यात बटर घाला. आता तमालपत्र, कांदा आणि लसूण घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. नंतर त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घाला. टोमॅटो थोडे शिजल्यावर त्यात अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, ५ ते ६ काजू आणि चवीनुसार मीठ घाला. टोमॅटो नीट शिजले की गॅस बंद करा. हे बनवलेले मिश्रण थंड होऊ द्या. त्यातून तमालपत्र काढा आणि या मिश्रणात १ ग्लास पाणी घालून गुळगुळीत पेस्ट मिक्सरमध्ये बनवून घ्या. आता पुन्हा एकदा गॅस चालू करा, पॅन घ्या आणि त्यात मिक्सरमध्ये बनवलेली टोमॅटो पेस्ट घाला. त्यात बटरचा तुकडा आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर घाला. आवडत असल्यास तुम्ही दूध किंवा मलई घालून हे सूप खाऊ शकता. (Latest Marathi Headline)

Winter

______________________________________________________________________________________________________________________________________

गाजर सूप
गाजरामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स असल्याने ते शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. त्यामुळे सर्दी, खोकला आणि इतर संसर्गांपासून संरक्षण मिळते. गाजरामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. या सूपच्या नियमित सेवनाने पोटाच्या समस्या, गॅस आणि बद्धकोष्ठता दूर होऊ शकते. गाजराच्या सूपमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते. हे सूप प्यायल्याने पोट बराच काळ भरलेले राहते, ज्यामुळे भूक कमी लागते आणि वजन कमी करण्यास मदत होते. (Top Trending News)

========

Winter Recipe : खास हिवाळ्यातच खाल्ले जाणारे स्पेशल पदार्थ

========

साहित्य
६ कापलेले गाजर, २ इंच बारीक चिरलेलं आलं, २ मोठे चमचे नारळाचं दूध, ४ बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या, ३ कप व्हेज स्टॉक, १ बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ, १ मोठा चमचा नारळाचं दूध

कृती
एक पॅन मध्यम आचेवर ठेवा. त्यात तेल गरम करा आणि त्यात लसूण, आलं आणि चिरलेला कांदा घाला. लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत परता. आता पॅनमध्ये चिरलेलं गाजर घाला आणि चांगले मिसळा. हे ३-४ मिनिटे शिजू द्या आणि नंतर त्यात व्हेज स्टॉक घाला. गाजर व्हेज स्टॉक मध्ये अर्धा तास शिजू द्या. जेव्हा गाजर पूर्णपणे मऊ होतील, तेव्हा पॅन आचेवरून उतरवा. ते एका ग्राइंडिंग जारमध्ये घालून घट्टसर सूपमध्ये वाटून घ्या. सूप एका भांड्यात काढा, चवीनुसार मीठ आणि शेवटी नारळाचं दूध मिसळा. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.